नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता
मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या (Winter Assembly)पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळातील फेरबदलांची चर्चा पुन्हा सुरू झाली असून, दसरा मेळाव्यानंतर शिवसेनेतील अकार्यक्षम मंत्र्यांना बाजूला करून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मंत्र्यांच्या कामकाजाचा आढावा घेण्याची तयारी केल्याचे राजकीय वर्तुळातून सांगितले जात आहे. अपेक्षित कामगिरी न करणाऱ्या मंत्र्यांना डच्चू देऊन तरुण आणि सक्रिय आमदारांना मंत्रिपदाची संधी देण्याबाबत हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे.
जयपूर: राजस्थानमधील कोटा जिल्ह्यात शनिवारी सकाळी एक अत्यंत हृदयद्रावक आणि भीषण रस्ता अपघात घडला. या भीषण अपघाताच्या घटनेमुळे मध्यप्रदेशामध्ये ...
राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होऊन दोन वर्षांचा कालावधी पूर्ण होत असताना शिंदे हे आपल्या पक्षातील काही मंत्र्यांच्या कामकाजाबाबत नाराज असल्याचे सांगितले जाते. मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेऊन त्यानुसार पुढील निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी प्रशासकीय कामकाजाला गती देणे आणि पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवणे, या दृष्टीने मंत्रिमंडळात बदल करण्याचा विचार सुरू असल्याचे राजकीय सूत्रांचे म्हणणे आहे. या संभाव्य फेरबदलात काही राज्यमंत्र्यांना पदोन्नती देऊन कॅबिनेट मंत्रिपदाची संधी मिळू शकते, अशीही चर्चा आहे. त्यामुळे शिवसेनेतील मंत्रिपदाची समीकरणे बदलण्याची शक्यता असून, नव्या नेतृत्वाला पुढे आणण्याचा प्रयत्न होऊ शकतो. दसऱ्यानंतर मंत्रिमंडळात ‘भाकरी फिरवली’ जाणार का, याकडे पक्षातील आमदारांचे लक्ष लागले आहे.
आगामी राजकीय आव्हानांना सामोरे जाण्यासाठी पक्षांतर्गत समन्वय राखणे, कामकाजाचा वेग वाढवणे आणि सक्रिय नेतृत्वाला संधी देणे, या बाबी संभाव्य फेरबदलामागे असल्याचे मानले जात आहे. मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा, संभाव्य पदोन्नती किंवा मंत्रिपदावरून गच्छंती याबाबत सध्या अधिकृत तपशील समोर आलेला नसला, तरी दसरा मेळाव्यानंतर प्रत्यक्षात कोणते बदल होतात, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.