‘आम्ही जग सोडून जात आहोत’; गुरुग्राममध्ये आयटी कपलचा दुर्दैवी अंत

हरियाणातील गुरुग्राम येथे घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे. तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारे एक जोडपे बुधवारी एम३एम मरिना रेसिडेन्सी या त्यांच्या भाड्याच्या घरात मृतावस्थेत आढळले. पतीने पत्नीची हत्या करून नंतर आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. 'आम्ही हे जग सोडून जात आहोत' असा संदेश असलेला ईमेल सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ३० वर्षीय मोहम्मद अस्लमने आपल्या मालकाला पाठवला. यानंतर ही घटना उघडकीस आली.


अस्लमने सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास आपल्या मालकाला ईमेल पाठवला आणि त्यात आपल्या कुटुंबियांचे आणि घरमालकाचे फोन नंबर दिले होते. हा संदेश मिळाल्यानंतर त्याच्या सहकाऱ्याने घरमालकाला याची कल्पना दिली. घटनेची माहिती मिळताच घरमालक सोसायटीच्या तोवर ७मधील त्या जोडप्याच्या घरी गेला. घरमालकाला अस्लम गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला तर त्याची बायको फरहाना मानेवर जखमांसह मृतावस्थेत पडली होती. घरमालक पोहोचला तेव्हा अपार्टमेंचा दरवाजा उघड होता, असे सांगण्यात आले आहे.



तपासणीदरम्यन तपस अधिकाऱ्यांना 'आपण हे जग सोडून जात आहोत' असा संदेश असलेली एक चिठ्ठी सापडली. फरहानाच्या कपड्यांवर 'माझं तुझ्यावर प्रेम आहे' हे शब्ददेखील हाताने लिहिले होते. पोलिसांनी अपार्टमेंटमधून तीन लॅपटॉप, दोन मोबाईल फोन, एक दोरी, एक डायरी, एक कात्री आणि एक पेनड्राइव्ह जप्त केले. घटनेचा क्रम निश्चित करण्यास मदत व्हावी म्हणून या वस्तू फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आल्या आहेत.


केरळमधील तंत्रज्ञान व्यावसायिक असलेले अस्लम आणि फरहाना हे तीन महिन्यांपूर्वी बंगळुरूहून गुरुग्रामला स्थलांतरित झाले होते. या जोडप्याचं २०२३ मध्ये लग्न झालं होतं. फरहाना एका आयटी फर्मसाठी वर्क फ्रॉम होम करायच्या. कुटुंबातील सदस्यांच्या म्हणण्यानुसार, त्या जोडप्यामध्ये घनिष्ट नाते होते. त्यांच्या वैवाहिक जीवनात मतभेद असल्याची कोणतीही माहिती नसल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार अस्लम सुमारे दीड वर्षांपासून नैराश्यावर उपचार घेत होता. दोघांच्या मृत्यूमागचं नेमकं कारण काय? याचा पोलीस तपास घेत आहेत.

Comments
Add Comment

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डी. लिट. प्रदान

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सावंगी मेघे (वर्धा) येथील अदानी इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड

सिद्धु मुसेवालाच्या छोट्या भावामुळे आई- वडिलांविरोधात तक्रार दाखल, नेमकं काय घडलं?

मुंबई: प्रसिद्ध पंजाबी गायक आणि रॅपर सिद्धु मुसेवाला आज या जगात नाही, जरीही तो आज आपल्यात नसला तरीही तो त्याच्या

Vivek Oberoi Dubai House Tour: मुंबई ते दुबई! विवेक ओबेरॉयच डोळे दिपवून टाकणारं घर पाहिलात का?

[caption id="attachment_1067306" align="alignnone" width="850"] बॉलीवूड अभिनेता आणि दुबईतील बिझनेसमन विवेक ओबेरॉय सध्या आपल्या दुबईतील व्हिलामुळे

निवडणूक आयुक्तांविरोधातील मोर्चात टीपू सुलतानच्या घोषणा कशासाठी? - मंत्री नितेश राणेंचा सवाल

मुंबई : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे

रेशनवरून वाद, नॉमिनेशनचा फटका! नकुलनंतर आता कोणाची होणार बिग बॉसच्या घरातून एक्झिट?

कलर्स टीव्हीवरील लोकप्रिय शो 'बिग बॉस २०' हा स्पर्धकांमधील अटीतटीच्या स्पर्धेमुळे आणि घरातील वादांमुळे सतत

जन आरोग्य योजनेत महागड्या चाचणीचा समावेश, 63 उपचारांचा 'अतिरिक्त निदान प्रक्रिया' म्हणून योजनेत समावेश

मुंबई: कर्करोगाचे अचूक निदान, आजाराचा टप्पा निश्चित करणे आणि उपचारांचा परिणाम तपासण्यासाठी महत्त्वाची असलेली