CSMT स्थानकातून एक वर्षाच्या चिमुरडीचं अपहरण, भीक मागण्यासाठी महिलेचा धक्कादायक प्रकार!

भिक मागण्यासाठी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरून एका वर्षाच्या मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी 22 वर्षीय महिलेला अटक करण्यात आली.

मुंबई: शुक्रवारी पहाटे मुंबई सीएसएमटी (CSMT) स्थानकाच्या मुख्य सभागृहामध्ये ट्रेनची वाट पाहत बसलेल्या असताना आई-वडिलांसोबत झोपलेल्या एका वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण करण्यात आले आहेत. 24 तासांच्या आत, रेल्वे पोलिसांनी (GRP) एका तरुणीला अटक करत प्रकरणाचा छडा लावला आहे. GRP पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी 22 वर्षीय पूजा शिंदे अपहरण केलेल्या बाळाकडून भीक मागून घेत होती. या प्रकरणी रेल्वे न्यायालयाने पूजा शिंदेला पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा छडा लावल्यानंतर पोलिसांनी सुखरूप त्या चिमुरडीला तिच्या आई- वडिलांच्या स्वाधीन केले.



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळचे धाराशिवचे असलेलं हे कुटुंब मुंबईमध्ये आले होते. हे कुटुंब शेतात मोल- मजुरीचे काम करतात. 15 ऑक्टोबर रोजी, हे कुटुंब मुंबईहून धाराशिवला जाण्यासाठी लातूर एक्स्प्रेसने प्रवास करणार होते. गुरूवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ती चिमुरडी आपल्या आई- वडीलांसोबत मुंबई सीएसएमटी स्थानकावर पोहोचली. त्यानंतर काही वेळाने हे कुटुंब सीएसएमटी स्थानकाबाहेर जेवणासाठी बाहेर आले. जेवण करून हे कुटुंब रात्री 10 वाजता पुन्हा स्थानकावर आले. जेवण केल्यानंतर आराम करायचा म्हणून हे कुटुंब मुंबई सीएसएमटी स्थानकाच्या मुख्य सभागृहामध्ये असलेल्या बाकाजवळ विश्रांती घेतली. दुसऱ्या दिवशी पहाटे, 5.25 वाजता पोलिसांच्या शिट्ट्यांच्या आवाजाने त्यांना जाग आली.



जाग आल्यानंतर त्या दोघांच्याही जवळ एक वर्षांची चिमुकली नव्हती. त्यानंतर त्यांनी संपूर्ण रेल्वे स्थानकावर मुलीचा शोध देखील घेतला, पण ती मुलगी काही मिळाली नाही. शेवटी त्या चिमुकलीच्या आई- वडीलांनी कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांकडे धाव घेतली. चिमुकलीच्या आई- वडीलांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तिथले सीसीटीव्ही फुटेज चेक केले. त्यात एक तरूणी चिमुकलीचे अपहरण करताना आढळून आली. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासत CSMT लोहमार्ग पोलीस आणि लोहमार्ग गुन्हे शाखेच्या पथकाने सर्व स्थानकांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासत, आरोपी महिलेचा शोध घेतला. तब्बल 14 तासांच्या शोध मोहिमेनंतर पोलिसांना अपहरण करणाऱ्या महिलेचा शोध लागला. पूजा शिंदेला अटक करत त्या चिमुरडीची पोलिसांनी सुखरूप सुटका केली.



दरम्यान, GRP पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यामध्ये पूजा शिंदे त्या चिमुरडीला घेऊन भीक मागताना दिसत आहे. तिने मुलीचे रूप बदलण्यासाठी तिचे केस कापले होते. मुलगी सुखरूप असून तिला तिच्या आई- वडीलांच्या स्वाधीन केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. GRP पोलिसांनी पूजा शिंदेवर भारतीय न्याय संहितेच्या कलम 139 (1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कलमानुसार, तिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने पूजा शिंदेला पोलीस कोठडी सुनावली असून घटनेसंबंधित पुढील तपास केला जात आहे.

Comments
Add Comment

Mumbai Crime News : ओला कारमधून उतरले अन् थेट गोळीबार! वडाळ्यात नेमकं काय घडलं?

वडाळा: मुंबईतील वडाळा पश्चिम परिसरात एसआयडब्ल्यूएस कॉलेजजवळ शनिवारी रात्री गोळीबाराची घटना घडली. ओला कॅबमधून

Flex Free Mumbai : फ्लेक्समुक्त मुंबई… महापौर निघाल्या मैलाचा दगड पार करायला!

सचिन धानजी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी अनधिकृत फ्लेक्स बॅनर्स, पोस्टर्स आणि स्टिकर्स हटविण्यासाठी

BMC Banner Removal Drive : मागील १५ दिवसांमध्ये ५२ हजार ४४८ बॅनर, फ्लेक्स, पोस्टर्स हटवले

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईचे विद्रूपीकरण रोखण्यासाठी आणि सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत जाहिरात फलक

Mumbai Footpath Encroachment : पदपथांचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार, महापालिका आयुक्तांनी दिले कारवाईचे थेट आदेश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) पदपथांचा कोणत्याही प्रकारे व्यावसायिक वापर होता कामा नये, काटेकोर दक्षता घ्यावी.

BMC : मुंबईतील ५०० किलोमीटर रस्ते अतिक्रमणमुक्त,‘पादचारी प्रथम’ विशेष अभियानात आतापर्यंत हटवली २८०३ अतिक्रमणे

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेने ‘पादचारी प्रथम’ (पेडिस्ट्रीयन फर्स्ट) हे विशेष अभियान हाती असून या

कांदिवली रेल्वे स्थानकात हायव्होल्टेज ड्रामा! हुज्जत घालताना महिला टीसीचे कपडे फाटले; GRP, RPF पोलिसांचा हस्तक्षेप

मुंबई: पश्चिम रेल्वे मार्गावर महिला टीसीची आणि विनातिकिट प्रवास करणाऱ्या महिलेमध्ये जोरदार वाद झाल्याची घटना