BMC : मुंबईतील ५०० किलोमीटर रस्ते अतिक्रमणमुक्त,‘पादचारी प्रथम’ विशेष अभियानात आतापर्यंत हटवली २८०३ अतिक्रमणे

आतापर्यंत २,८०३ अतिक्रमणे तसेच फेरीवाले हटवण्‍याची कार्यवाही करण्यात आली आहे.

मुंबई (विशेष प्रतिनिधी)


मुंबई महानगरपालिकेने ‘पादचारी प्रथम’ (पेडिस्ट्रीयन फर्स्ट) हे विशेष अभियान हाती असून या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात मुंबईतील २६ प्रशासकीय विभागांतील ३९९ पदपथांवरील अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत. या कारवाईत तब्बल ५०० किलोमीटर लांबीचे रस्ते पादचाऱ्यांसाठी अडथळामुक्त करण्यात आले आहेत. आतापर्यंत २,८०३ अतिक्रमणे तसेच फेरीवाले हटवण्‍याची कार्यवाही करण्यात आली आहे.


मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांची मासिक आढावा बैठक शनिवारी १७ ऑक्‍टोबर २०२६ रोजी वरळी येथील कमांड अँड कंट्रोल सेंटर येथे पार पडली. या आढावा बैठकीत महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पादचारी प्रथम या अभियानाची माहिती घेतली. यावेळी अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, सह आयुक्त (दक्षता) डॉ. एम. देवेंदर सिंह, उप आयुक्‍त (आयुक्‍त कार्यालय) प्रशांत गायकवाड यावेळी उपस्थित होते. तसेच, सर्व सह आयुक्त, उप आयुक्त, सहायक आयुक्त, खाते प्रमुख आदी उपस्थित होते.



सुगम्‍य पदपथ धोरणांतर्गत मुंबईकरांना पदपथांवरून सुरक्षितपणे आणि विनाअडथळा चालता यावे, या उद्देशाने मुंबई महानगरपालिकेने ‘पादचारी प्रथम’ (पेडिस्ट्रीयन फर्स्ट) हे विशेष अभियान हाती घेतले आहे. पादचा-यांना विनासायास प्रवास करता यावा यासाठी पदपथांवरील अतिक्रमणे हटवणे, आवश्यकतेनुसार पदपथ रुंद करणे, पदपथांची दुरुस्ती करणे तसेच रस्ते आणि परिसर स्वच्छ ठेवणे, यावर या अभियानांतर्गत भर देण्यात येत आहे.


स्थानिक परिस्थिती आणि नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन पदपथ अतिक्रमणमुक्त करावेत. केवळ दिखाऊ कारवाई न करता, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर व परिणामकारक कारवाई करून पादचाऱ्यांसाठी पदपथ कायमस्वरूपी मोकळे ठेवावेत, असे निर्देश यावेळी आश्विनी भिडे यांनी दिले. त्‍यात प्रामुख्‍याने रूग्‍णालये, शाळा - महाविद्यालये, रेल्‍वे - बस स्‍थानके यांसह सार्वजनिक ठिकाणांचा समावेश आहे. मुंबईतील पदपथ पादचाऱ्यांसाठी सुरक्षित, स्वच्छ आणि अडथळामुक्त ठेवण्याच्या दृष्टीने ‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत ही कारवाई पुढेही सुरू राहणार आहे. पदपथ हे केवळ पादचाऱ्यांच्या सुरक्षित आणि सुलभ प्रवासासाठी आहेत. त्यामुळे पदपथांवर दुकाने, स्टॉल्स उभारणे किंवा विविध प्रकारचे साहित्य ठेवून पादचाऱ्यांच्या मार्गात अडथळे निर्माण करणे खपवून घेतले जाणार नाही. अतिक्रमण करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा महानगरपालिका आयुक्‍त आश्विनी भिडे यांनी दिला.



पदपथांवरील अनधिकृत पार्किंगला आळा घाला


पदपथांवर दुचाकींच्या अनधिकृत पार्किंगला आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात. यासाठी वाहतूक पोलिसांशी समन्वय साधून नियमित देखरेख व प्रभावी कारवाई करावी. परिसरात सार्वजनिक वाहनतळासाठी आरक्षित जागा असल्यास तिचा विकास करून नागरिकांसाठी उपलब्ध करून द्यावी. पदपथांची रुंदी आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून आवश्यक त्या ठिकाणी नियोजनबद्ध वाहनतळाचे मार्किंग करावे. तसेच, रस्त्याच्या कडेला वाहनतळासाठी योग्य जागा उपलब्ध असल्यास स्वतंत्र पार्किंग-बे विकसित करून अनधिकृत पार्किंगला प्रतिबंध घालावा, असे निर्देश भिडे यांनी दिले.

Comments
Add Comment

BMC Banner Removal Drive : मागील १५ दिवसांमध्ये ५२ हजार ४४८ बॅनर, फ्लेक्स, पोस्टर्स हटवले

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईचे विद्रूपीकरण रोखण्यासाठी आणि सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत जाहिरात फलक

Mumbai Footpath Encroachment : पदपथांचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार, महापालिका आयुक्तांनी दिले कारवाईचे थेट आदेश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) पदपथांचा कोणत्याही प्रकारे व्यावसायिक वापर होता कामा नये, काटेकोर दक्षता घ्यावी.

कांदिवली रेल्वे स्थानकात हायव्होल्टेज ड्रामा! हुज्जत घालताना महिला टीसीचे कपडे फाटले; GRP, RPF पोलिसांचा हस्तक्षेप

मुंबई: पश्चिम रेल्वे मार्गावर महिला टीसीची आणि विनातिकिट प्रवास करणाऱ्या महिलेमध्ये जोरदार वाद झाल्याची घटना

जन आरोग्य योजनेत महागड्या चाचणीचा समावेश, 63 उपचारांचा 'अतिरिक्त निदान प्रक्रिया' म्हणून योजनेत समावेश

मुंबई: कर्करोगाचे अचूक निदान, आजाराचा टप्पा निश्चित करणे आणि उपचारांचा परिणाम तपासण्यासाठी महत्त्वाची असलेली

Eknath Shinde : दसरा मेळाव्यानंतर शिवसेनेतील अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू ? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मागवले रिपोर्टकार्ड

नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या (Winter Assembly)पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळातील

मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयातील स्वयंपाकघराचा परवाना निलंबित, FDA ची कारवाई

अन्न आणि औषध प्रशासन विभागाने (FDA) शुक्रवारी (१६ ऑक्टोबर) मुलुंड येथील फोर्टिस रुग्नालयातील स्वयंपाक घराचा परवाना