Ketan Agrawal murder case : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी मान्य केल्यानंतर संबंधित विभागाला आवश्यक निर्देश देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे: पुण्यातील रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल हत्या प्रकरणात ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी मुलाच्या हत्येप्रकरणी निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी मान्य केल्यानंतर संबंधित विभागाला आवश्यक निर्देश देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ( Ujjwal Nikam)



लोहगड किल्ल्यावर घडली होती घटना


मिळालेल्या माहितीनुसार, 18 जून रोजी केतन अग्रवाल (26) याचा लोहगड किल्ल्यावर मृत्यू झाला होता. या प्रकरणात त्याची मंगेतर सिया गोयल (19), तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी आणि चेतनचा मित्र रितेश संजय हांगे यांच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत. केतनला किल्ल्यावरून ढकलून त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. सुरुवातीला ही घटना अपघात असल्याचे भासवण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला आहे.



5,053 पानांचे आरोपपत्र दाखल


पुणे ग्रामीण पोलिसांनी तपास पूर्ण करून वडगाव मावळ न्यायालयात 5,053 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात डिजिटल पुरावे, तांत्रिक विश्लेषण अहवाल आणि 100 हून अधिक साक्षीदारांच्या जबाबांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे.


या प्रकरणात सरकारी पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडण्याची जबाबदारी उज्ज्वल निकम यांच्यावर असेल. त्यांच्या नियुक्तीमुळे खटल्यातील पुढील कायदेशीर घडामोडींकडे लक्ष लागले आहे.



इंटरनेटवरील शोधांचाही तपासात उल्लेख


आरोपपत्रानुसार, सिया आणि चेतन यांनी लोहगड किल्ल्यावरून पडून झालेल्या अन्य एका महिलेच्या मृत्यूच्या घटनेबाबत इंटरनेटवर माहिती शोधली होती. तसेच देशभरात चर्चेत आलेल्या सोनम रघुवंशी हत्याप्रकरणाची माहितीही त्यांनी मिळवल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे. गुन्ह्यांशी संबंधित माहिती आणि हत्येवर आधारित चित्रपट पाहिल्याचाही उल्लेख आरोपपत्रात असल्याचे सांगण्यात आले आहे.


या प्रकरणातील आरोप न्यायालयात सिद्ध होणे अद्याप बाकी आहे. आता विशेष सरकारी वकिलांच्या नियुक्तीनंतर न्यायालयीन प्रक्रियेला वेग येतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Comments
Add Comment

FDA Raids: रिलायन्स, ब्लिंकिट आणि झोमॅटोला FDA चा दणका, संचालकांसह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

मुंबई: अन्न- औषध प्रशासनाने मुदत संपलेले, खराब झालेले आणि विक्रीसाठी नाकारलेले खाद्यपदार्थांची अफरातफर करून

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डी. लिट. प्रदान

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सावंगी मेघे (वर्धा) येथील अदानी इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड

शिक्षकांना निवडणूक प्रचाराला जुंपणाऱ्या संस्थाचालकांची ‘एसआयटी’ चौकशी करणार; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा

मुंबई : शिक्षकांना निवडणूक प्रचारासाठी काम करण्यास भाग पाडणाऱ्या आणि उमेदवाराला मतदान न केल्यास नोकरीवरून

पुण्यात भरधाव कारचा थरार! एमआयटी कॉलेज रोडवर 3 ते 4 दुचाकींना धडक; 24 वर्षीय चालक पोलिसांच्या ताब्यात

पुणे : पुण्यातील कोथरूड परिसरात भरधाव कारने अनेक दुचाकींना धडक दिल्याची घटना समोर आली आहे. एमआयटी

Pune Weather : उकाड्यापाठोपाठ पुण्यात पुन्हा मुसळधार पावसाची एन्ट्री; हवामान विभागाकडून 'यलो अलर्ट' जारी

पुणे : गेल्या काही दिवसांपासून वाढलेली ऑक्टोबर हीट आणि प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांसाठी एक

नाचणीची भाकरी, भाजी अन् बांधावरील गप्पा; ग्रामस्थांशी संवाद साधत पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले जलसंधारण चळवळीला बळ

सिंधुदुर्ग : दुष्काळी परिस्थितीचा सामना करताना पाण्याचा प्रत्येक थेंब अडविणे, जमिनीत जिरविणे आणि उपलब्ध