
कुडाळ तालुक्यातील कडावल वर्दे रस्त्यावर शनिवारी (१७ ऑक्टोबर) एकतर्फी प्रेमातून २० वर्षीय तरुणीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वर्दे येथील खालची पालववाडी येथे राहणाऱ्या हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत असलेल्या दामिनी पालव या तरुणीची भररस्त्यात चाकू भोसकून हत्या करण्यात आली. या प्रकरणी हत्या करून फरार झालेल्या आरोपी साहिल धुरी याला सिंधुदुर्ग पोलिसांनी आपल्या राहत्या घरातून ताब्यात घेतले आहे.
वेंगुर्ल्यात राहणाऱ्या साहिल धुरीला पोलिसांनी रविवारी पहाटे ताब्यात घेतले. साहिलने चौकशीत खुनाची कबुली दिल्याचे स्पष्ट झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वर्दे कडावल येथून सुमारे ७० किमी अंतरावर असलेल्या ओढ्याच्या बाजूला दामिनीचा मृतदेह आढळला. १७ ऑक्टोबर रोजी जवळपास पावणे पाचच्या सुमारास दामिनी ही महाविद्यालयाच्या गणवेशावर गावात परतली होती. संध्याकाळी पावणे सहा, सहाच्या सुमारास दामिनी कडावल येथून एसटी बसमधून उतरली. त्यानंतर तिने आईला फोन करून वडापाव आणू का, असे विचारले. माय लेकींमधील हा संवाद नेहमीसारखाच होता. परंतु दोघींमधील हा संवाद शेवटचा ठरेल असे कोणालाच वाटले नव्हते.
बीड जिल्ह्यातील पंढरपूर खामगाव पालखी मार्गावर भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. रविवारी (१८ ऑक्टोबर) सकाळी झालेल्या या अपघातात पाच जणांचा मृत्यू ...
दामिनीचं घर बस स्थानकापासून २ किमी अंतरावर असल्याची माहिती आहे. बसमधून उतरल्यावर चालत घराकडे जात असताना बाईकवर दबा धरून बसलेल्या साहिलने तिची वाट अडवली. त्यानंतर त्यांच्यात वाद झाला आणि साहिलने दामिनीवर चाकूने सपासप वार करून तिची हत्या केली. दामिनीचा मृतदेह त्याने जवळच्या ओढ्यालगत फेकून दिला आणि तो दुचाकीवरून पसार झाला. हा प्रकार घडला तेव्हा जवळच्या शेतात काम करणाऱ्या लहान मुलाने दामिनीचा मृतदेह पहिला आणि गावात जाऊन घडलेला प्रकार सांगितला. यानंतर गावकरी आणि पोलिसांना तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या हत्येचे नेमके कारण समोर आले नसले तरी एकतर्फी प्रेमातून हत्या झाली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
तिचे वडील किरण पालव शेतकरी असून संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह हा शेतीवर चालतो. दामिनी ही वर्देकर पाटकर महाविद्यालयात हॉटेल मॅनेजमेंटच्या शेवटच्या वर्षाला शिकत होती. दोन दिवसांनी ती नोकरीच्या मुलाखतीसाठी मुंबईला जाणार असल्याची माहिती तिच्या कुटुंबीयांनी दिली. तिची लहान बहीण सावंतवाडी येथे पॉलीटेक्निकचे शिक्षण घेत आहे. दामिनीच्या अशा दुर्दैवी अंताने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.




