Sunday, October 18, 2026

Neeti Mohan: प्रसिद्ध बॉलिवूड सिंगर नीती मोहनवर कोसळला दु:खाचा डोंगर, वडिलांचं छत्र हरपलं

Neeti Mohan Father Dies:

मुंबई: प्रसिद्ध बॉलिवूड गायिका नीती मोहनवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गायिका नीती मोहन, कॉरियोग्राफर शक्ती मोहन आणि मुक्ती मोहन यांच्या वडीलांचे निधन झाले आहे. बृज मोहन असं त्यांचं नाव होतं, ते 74 वर्षांचे होते. नीती मोहनच्या वडीलांचं निधन 15 ऑक्टोबरला झाले. बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिकेने आपल्या वडिलांच्या निधनाची बातमी काही तासांपूर्वी इन्स्टाग्रामवर शेअर केलेली आहे. नीतीने ही दु:खद बातमी शेअर करताच चाहत्यांसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींकडून आणि गायकांकडून नीतीच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. सर्वांनीच आम्ही मोहन कुटुंबीयांच्या दु:खात सामील आहोत, असं म्हणत नीतीला आणि तिच्या कुटुंबीयांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.

काही तासांपूर्वी नीती मोहनने इन्स्टाग्रामवर वडीलांचा फोटो शेअर करत, चाहत्यांना वडीलांच्या निधनाची दुःखद बातमी दिली आहे. गायिकेने भावनिक पोस्ट शेअर करत, लिहिले की, "अत्यंत दुःखाने आणि जड अंतःकरणाने ही बातमी तुम्हाला सांगत आहोत. आमचे वडील, ब्रिज मोहन शर्मा यांचे निधन झाले आहे. त्यांना 15 ऑक्टोबर 2026 रोजी देवाज्ञा झाली. गुरूवारी त्यांनी ह्या जगाचा अखेरचा निरोप घेतला. आईने एक प्रेमळ पती, मी आणि माझ्या भावंडांनी वडील गमावले आहेत. ते आमच्या कुटुंबाचे मार्गदर्शक आणि आधारस्तंभ होते. त्यांचे ज्ञान, दयाळूपणा, मूल्ये आणि त्यांचं निखळ प्रेम कायमच आमच्या हृदयात कायम राहील. जरी आता ते आपल्यात नसले तरी, त्यांचे आशीर्वाद, त्यांनी शिकवलेले धडे आणि सुंदर आठवणी आयुष्यभर आपल्याला मार्गदर्शन करत राहतील."

 
 
View this post on Instagram
 

A post shared by NEETI MOHAN (@neetimohan18)

"त्यांच्या जाण्याने एक आमच्या कुटुंबामध्ये एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे आणि ती केव्हाही न भरून निघणारी आहे. पण त्यांच्या प्रती असलेलं प्रेम कायमच आमच्या हृदयात जिवंत राहील, यामध्ये शंका नाही. बाबांच्या आत्म्यास शांती लाभो. बाबा, तुमची खूप आठवण येईल." दरम्यान, नीतीने शेअर केलेल्या पोस्टवर श्रेया घोषाल, कपिल शर्मा, वरून धवन, नेहा धुपिया, पलक मुच्छल, गौहर खान, रुत्विक धंजानी, करण ग्रोव्हर, प्रसिद्ध बिझनेस वुमन अनन्या बिर्ला यांसह अनेक गायकांनी आणि सेलिब्रिटींनी अभिनेत्रीच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली आहे. दरम्यान, नीतीच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचे तर, नीती मोहनसह त्या चार बहिणी आहे. नीती एक प्रसिद्ध बॉलिवूड सिंगर असून तिच्या इतरत्र दोन इंडस्ट्रीमध्ये कोरियोग्राफर आहेत. तर तिची चौथी बहिण लाईमलाईटपासून फार दूर आहे. नीती, शक्ती आणि मुक्ती या तिघींही बहिणींना केव्हाही त्यांच्या कुटुंबीयांनी आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी नकार दिला नाही. नीतीच्या वडिलांच्या अचानक एक्झिटने मोहन कुटुंबीयांना फार मोठा धक्का बसला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा