FDA Action: छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यातही FDA ची धडक कारवाई, रिलायन्स स्टोरेज आणि ब्लिंकिटच्या कोल्ड स्टोरेजवर धाड सत्र

अन्न- औषध प्रशासनाने सणासुदीच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये, 'सेफ फुड, सेफ महाराष्ट्र' या मोहिमेंतर्गत कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

महाराष्ट्र: छत्रपती संभाजीनगर, पुण्यासह इतरत्र जिल्ह्यामध्ये अन्न- औषध प्रशासनाने धडक कारवाई करत लाखोंचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर FDA कडून राज्यामध्ये, 'सेफ फुड, सेफ महाराष्ट्र' या मोहिमेंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. रिलायन्स स्टोरेज, ब्लिंकिट स्टोरेज, कोल्ड स्टोरेज, विना लेबल साठवलेला अन्न साठा याठिकाणी अन्न- औषध प्रशासनाने कारवाई केली आहे.


पैठण तालुक्यातील कोल्ड स्टोरेजमध्ये नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन केल्यामुळे कारवाई करण्यात आली. उत्पादनांच्या गरजेनुसार आवश्यक असलेले तापमान राखण्यासाठी सक्षम यंत्रणा (Freezers/Chillers) कार्यरत नव्हती. कोल्ड रूमची कोणतीही देखभाल केली जात नसून, माल पॅलेटवर योग्य पद्धतीने न ठेवता अस्ताव्यस्त साठवलेला होता. परिसरात कीटक नियंत्रणाची (Pest Control) कोणतीही अधिकृत उपाययोजना केलेली नव्हती आणि स्वच्छतेचे कोणतेही नियम पाळले जात नव्हते. कारवाईमध्ये तब्बल 1 लाख 65 हजार 805 किलोचा 3 कोटी 89 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.



गंगापूर तालुक्यातही कारवाई केली. व्यवसाय परिसरात मुख्य व दर्शनी भागात अद्ययावत FSSAI परवाना प्रदर्शित करण्यात आलेला नव्हता. अन्न साठवणुकीच्या जागेत कमी प्रकाश, तसेच कर्मचाऱ्यांसाठी हात धुण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती. शीतगृहातील तापमानाची नोंद ठेवणारी कोणतीही अधिकृत यंत्रणा किंवा तापमान रेकॉर्ड बुक उपलब्ध नव्हती. 'फर्स्ट इन, फर्स्ट आउट' (FIFO) या साठवणूक व विक्रीच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत होते. कचरा आणि अन्नकचऱ्याची वेळेवर विल्हेवाट न लावल्यामुळे संपूर्ण परिसरात अस्वच्छता पसरली होती. कारवाईत जप्त करण्यात आलेल्या गूळ, मनुका आणि पाश्चराईज्ड बटर हे तिन्ही 31,675 किलोचा 30 लाख 7 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


छत्रपती संभाजीनगरातील चाकणमध्ये, रिलायन्स रिटेल शॉपमध्ये, FDA च्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीमध्ये, कालबाह्य आणि खराब झालेल्या अन्न पदार्थांची अंतिम विल्हेवाट किंवा नाश केल्याबाबत समाधानकारक व्यावसायिकाला व्यवस्थित माहिती देता आली नाही. संपूर्ण गोदामात उंदरांची विष्ठा, मुदतबाह्य आणि खराब उत्पादने विलगीकरणाशिवाय एकत्र व काही ठिकाणी विक्रीसाठी प्रदर्शित, फरशीच्या फटींमध्ये झुरळे आणि कर्मचारी दुकानाच्या थुंकत असल्याचे आढळले. विल्हेवाट संस्थेसोबतचा करार सादर केला, मात्र प्रत्यक्ष विल्हेवाटीचे पडताळणीयोग्य पुरावे सादर झाले नाहीत. सहायक आयुक्त (अन्न) तथा पदनिर्दिष्ट अधिकारी, परिमंडळ-05, पुणे यांनी दि. 15 ऑक्टोबर रोजी, परवाना निलंबित केला.



तर, निघोजेमध्ये ब्लिंकिट कॉमर्सच्या कोल्ड स्टोरेजमध्ये, अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी तपासणी केली. कोल्ड रूमचे तापमान 58 पेक्षा जास्त व शीतसाखळीचे अभिलेख नसणे, अन्न व अन्न पदार्थ एकत्र, Tata Salt (50 किलो),सुजी (60 किलो) थेट जमिनीवर, गळती असलेली पाकिटे, झुरळांचा प्रादुर्भाव तसेच सुमारे 600 कर्मचाऱ्यांपैकी केवळ 5 कर्मचाऱ्यांची FoSTaC प्रमाणपत्रे आढळली. मे. वाय. के. ट्रेडर्स यांच्याशी करार सादर केला, मात्र मुदतबाह्य मालाची प्रत्यक्ष विल्हेवाट कुठे, केव्हा व किती प्रमाणात झाली याचे पुरावे सादर केले नाहीत. पदनिर्दिष्ट अधिकारी, परिमंडळ-05 यांनी 15 ऑक्टोबरला कोल्ड स्टोरेजचा परवाना निलंबित केला. सणासुदीच्या काळात अन्नपदार्थांची मागणी वाढत असल्याने शीतगृहे, गोदामे व उत्पादन आस्थापनांच्या तपासण्या राज्यभर सुरू राहणार आहेत.

Comments
Add Comment

Amrit Bharat Express: मुंबई ते अयोध्या 11 जनरल डब्यांसह अमृत भारत एक्स्प्रेस… महाराष्ट्रात कुठे कुठे असेल थांबा?

मुंबई: दिवाळी आणि छठ पूजा या सणानिमित्त मुंबईहून उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर प्रवासी जात असतात. दरवर्षीची

Nashik Maha Goda Aarti: रामकुंडावर 31 ऑक्टोबरला केली जाणार ‘महा गोदा आरती’, नाशिक जिल्ह्यातील गावकरी घेणार सहभाग

नाशिक: नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे येत्या 31 ऑक्टोबर 2026 रोजी ऐतिहासिक सिंहस्थ कुंभमेळ्याचा भव्य शुभारंभ केला

Beed Accident : तुळजापूरला चाललेल्या भाविकांवर काळाचा घाला; पंढरपूर खामगाव पालखी मार्गावर भीषण अपघात

बीड जिल्ह्यातील पंढरपूर खामगाव पालखी मार्गावर भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. रविवारी (१८ ऑक्टोबर) सकाळी

Nashik Accident News: भीषण अपघात! भरधाव कारची पोलिसांसह भाविकांना जोरदार धडक; पोलीस उपनिरीक्षकांचा जागीच मृत्यू

Nashik Accident News: नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या नांदुरी येथे रविवारी, 18 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री

Ketan Agrawal murder case : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

पुणे: पुण्यातील रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल हत्या प्रकरणात ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची विशेष

FDA Raids: रिलायन्स, ब्लिंकिट आणि झोमॅटोला FDA चा दणका, संचालकांसह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

मुंबई: अन्न- औषध प्रशासनाने मुदत संपलेले, खराब झालेले आणि विक्रीसाठी नाकारलेले खाद्यपदार्थांची अफरातफर करून