नाशिक: नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे येत्या 31 ऑक्टोबर 2026 रोजी ऐतिहासिक सिंहस्थ कुंभमेळ्याचा भव्य शुभारंभ केला जाणार आहे. ध्वजारोहण सोहळ्याच्या माध्यमातून कुंभमेळ्याचा शुभारंभ केला जाणार आहे. कुंभपर्वाच्या प्रारंभानिमित्त नाशिकच्या रामकुंडावर भव्य ‘महा गोदा आरती’चे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विश्वविक्रम नोंदवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या आरतीमध्ये नाशिक जिल्ह्यातील 650 गावांमधून तब्बल 6500 जनजातीय बांधव सहभागी होणार आहेत. धार्मिक परंपरेसोबतच गोदावरी आणि स्थानिक जलस्रोतांच्या संवर्धनाचा संदेश जनमानसात पोहोचविणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. या प्रमुख उद्देशाच्या माध्यमातून नाशिकच्या रामकुंडावर भव्य दिव्य गोदा आरती केली जाणार आहे.
बीड जिल्ह्यातील पंढरपूर खामगाव पालखी मार्गावर भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. रविवारी (१८ ऑक्टोबर) सकाळी झालेल्या या अपघातात पाच जणांचा मृत्यू ...
या कार्यक्रमाच्या माहिती देण्यासाठी आज (रविवार- 18 ऑक्टोबर) दुपारी 3 वाजता, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या सभागृहात संयुक्त पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह आणि नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री यांनी यावेळी कार्यक्रमाच्या तयारीची माहिती दिली. रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे अध्यक्ष जयंतराव गायधनी, महंत भक्तीचरणदास महाराज, उपाध्यक्ष शांताराम भानुसे, नरसिंहकृपा प्रभू, सचिव मुकुंद खोचे, प्रवक्ते प्रदीप आबा बच्छाव, प्रसिद्धीप्रमुख राजेंद्र फड आदी उपस्थित होते. महा गोदा आरतीमध्ये जनजातीय समाजाचा व्यापक सहभाग असणार आहे. नाशिक जिल्ह्यातील 650 गावांमधून प्रत्येकी 10 अशा सुमारे 6500 बांधवांचा सहभाग नियोजित करण्यात आला आहे. प्रत्येक गावातून सहा पुरुष आणि चार महिला सहभागी होतील. निफाड, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, सुरगाणा, हरसूल यांसह जिल्ह्यातील विविध तालुक्यातील गावांचा या उपक्रमात समावेश असेल.
Nashik Accident News: नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या नांदुरी येथे रविवारी, 18 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री भीषण अपघात घडला. भरधाव कारने ...
रामकुंडावरील महा गोदा आरतीनंतर या 650 गावांमध्येही आरतीचे आयोजन करण्यात येणार आहे. गोदावरी नदीसह स्थानिक नद्या, नाले, तलाव आणि पारंपरिक जलस्रोतांचे संरक्षण, पाण्याचे प्रदूषण रोखणे आणि निसर्गसंवर्धनाबाबत जनजागृती करणे, हा या उपक्रमामागील व्यापक हेतू आहे. धार्मिक श्रद्धेला पर्यावरण संवर्धनाच्या कृतीशी जोडून नदी आणि जलस्रोतांप्रती सामूहिक जबाबदारीची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. मोठ्या संख्येने सहभागी होणाऱ्या बांधवांच्या सोयीसाठी स्वतंत्र व्यवस्थापन करण्यात येत आहे. सहभागींसाठी केटीएचएम महाविद्यालयात खानपान आणि कपडे बदलण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. सहभागींचे समन्वयन, कार्यक्रमस्थळी ने-आण आणि आवश्यक मूलभूत सुविधांची उपलब्धता यासाठी संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय साधण्यात येत आहे.
पुणे: पुण्यातील रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल हत्या प्रकरणात ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली ...
31 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा प्रोटोकॉलनुसार प्रवेश व्यवस्था, मान्यवरांच्या हालचाली, गर्दीचे नियोजन आणि अन्य आवश्यक बाबींसाठी संबंधित सुरक्षा व प्रशासकीय यंत्रणांकडून समन्वयाने तयारी करण्यात येत आहे. 31 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजून 2 मिनिटांनी नाशिक येथील रामकुंड आणि त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थ येथे एकाच वेळी ध्वजारोहण होणार आहे. या सोहळ्याने सिंहस्थ कुंभपर्वाच्या प्रारंभाला औपचारिक स्वरूप मिळणार असून, त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजता रामकुंडावर महा गोदा आरती होणार आहे.