OTT वर नव्या रोमँटिक कॉमेडीचा धुमाकूळ! 6 भागांची सिरीज टॉप 10 मध्ये

दर आठवड्याला ओटीटी प्लॅटफॉर्मवर काही ना काही नवीन प्रदर्शित होत असतं. रोमँटिक सिनेमा किंवा सिरीज हे प्रेक्षकांच्या खास आवडीचे असतात. जर त्यात कॉमेडीचा टच असेल तर त्याला आणखी मागणी वाढते. अशीच रोमँटिक कॉमेडी असलेली मालिका नुकतीच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली असून तिच्या आकर्षक कथानकांची सर्वत्र प्रशंसा होत आहे. एवढंच नाही तर प्रदर्शित होताच या मालिकेने डिजिटल प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घातला आहे. सहा भागांची ही मालिका सध्या टॉप 10 मध्ये ट्रेंडिंग असून तिला IMDb वरून देखील उत्तम रेटिंग मिळाले आहे.


बाबू देगला दिग्दर्शित आणि हर्षा चेमुडू अभिनित 'लीस्ट एलिजिबल बॅचलर' ही रोमँटिक कॉमेडी वेब सिरीज नेटफ्लिक्सच्या टॉप 10 च्या ट्रेंडिंग यादीत आहे. ही सिरीज 09 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाली असून तिला IMDb वर 7.8 चे रेटिंग मिळाले आहे. ही सहा भागांची कथा एका तरुणाभोवती फिरते, ज्याच्यावर त्याच्या कुटुंबाकडून लग्नासाठी दबाव असतो. मात्र लोक त्याच्या बाह्यरुपावरून त्याचे मूल्यमापन करत असल्यामुळे त्याला वधू शोधण्यात अडचणी येतात. करिअर घडवण्यासाठी तो हैदराबादला जातो आणि एका कॉर्पोरेट ऑफिसमध्ये नोकरी मिळवतो.



त्याच्या कामाच्या ठिकाणी असलेली बॉस ही तीच मुलगी आहे जिच्याशी घरच्यांनी त्याचं लग्न ठरवलं आहे. हे कळल्यावर ते ऑफिसमध्ये कोणालाही न सांगता एकत्र राहायचं ठरवतात. त्यांच्यात खरं प्रेम फुलणार का? की लिव्ह इन रिलेशनशिपची त्यांची कल्पना अयशस्वी ठरेल? हे मालिका पाहिल्यावरच कळेल. बाबू देगला दिग्दर्शित ही 06 भागांची मालिका कॉमेडी आणि रोमान्सने परिपूर्ण असून यात हर्ष चेमुडू सोबत ऐश्वर्या होळक्कल आणि जीवन कुमार यांच्या प्रमुख भूमिका आहेत.


Comments
Add Comment

‘रणबाली’ची बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी दमदार सुरुवात, दुसऱ्या दिवशी किती कमाई?

विजय देवराकोंडा आणि रश्मिका मंदाना यांचा पीरियड अ‍ॅक्शन ड्रामा 'रणबाली' या चित्रपटाच्या देशांतर्गत कमाईत

Neeti Mohan: प्रसिद्ध बॉलिवूड सिंगर नीती मोहनवर कोसळला दु:खाचा डोंगर, वडिलांचं छत्र हरपलं

मुंबई: प्रसिद्ध बॉलिवूड गायिका नीती मोहनवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गायिका नीती मोहन, कॉरियोग्राफर शक्ती मोहन

Raj Babbar: ज्येष्ठ अभिनेते राज बब्बर दिवंगत पत्नीच्या आठवणीत भावूक; म्हणाले, "...तिची प्रचंड आठवण येतेय"

मुंबई: दिवंगत प्रसिद्ध मराठमोळी आणि बॉलिवूड अभिनेत्री स्मिता पाटील यांची काल 71 वी जयंती होती. स्मिता पाटील आज

Academy Museum Gala 2026: ग्लॅमरचा तडका! सेलिब्रिटींच्या लूकची सर्वत्र चर्चा

प्रियांका चोप्रा म्युझियम २०२६ च्या गालामध्ये डीप नेकलाइन असलेलया विवियन वेस्टवुड कूटूरच्या अप्रतिम गाऊन

Ramayan: रामायण 'राइज ऑफ अ लिजेंड' रचणार इतिहास! भारतासाठी ठरला अभिमानाचा क्षण

भारतासाठी अभिमानाचा क्षण! भारतीय सिनेमाचा भव्य आविष्कार आणि दिवाळीचा उत्साह आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवत,

Nayyi Naveli : ‘नई नवेली’ची बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी; दोन दिवसांत जगभरात 10.3 कोटींची कमाई

Entertainment News: अभिनेत्री यामी गौतमच्या ‘नई नवेली’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा