Rakhi Sawant : आत्महत्या प्रकरणात राखी सावंतविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट; न्यायालयात गैरहजर राहिल्याने कारवाई

टीव्ही शोमध्ये एका स्थानिक रहिवाशाबद्दल कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी हे प्रकरण सुरू आहे

Entertainment News: अभिनेत्री राखी सावंत हिच्या अडचणीत वाढ झाली आहे. उत्तर प्रदेशातील झाशी येथील न्यायालयाने 2010 मधील आत्महत्या प्रकरणात राखी सावंतविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. टीव्ही शोमध्ये एका स्थानिक रहिवाशाबद्दल कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी हे प्रकरण सुरू आहे. राखी वारंवार न्यायालयात हजर न राहिल्याने शुक्रवारी हे वॉरंट जारी करण्यात आल्याची माहिती जिल्हा सरकारी वकील मृदुलकांत श्रीवास्तव यांनी दिली. (Rakhi Sawant)


नेमके प्रकरण काय?


हे प्रकरण झाशीतील हंसारी प्रेमनगर परिसरात राहणाऱ्या लक्ष्मण अहिरवार यांच्या मृत्यूशी संबंधित आहे. लक्ष्मण यांनी 10 नोव्हेंबर 2010 रोजी कथितरीत्या आत्महत्या केली होती. त्यांच्या आई सावित्री यांनी प्रेमनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.



तक्रारीनुसार, ऑक्टोबर 2010 मध्ये प्रसारित झालेल्या ‘राखी का इन्साफ’ या टीव्ही शोमध्ये राखी सावंत यांनी लक्ष्मण यांच्याबद्दल कथित अपमानास्पद आणि आक्षेपार्ह भाषा वापरली होती. त्यामुळे लक्ष्मण यांना अपमानित वाटल्याचा आरोप करण्यात आला आहे.

वैवाहिक वादानंतर शोमध्ये सहभाग


फिर्यादी पक्षाच्या म्हणण्यानुसार, लक्ष्मण आणि त्यांची पत्नी अनिता यांना वैवाहिक वादानंतर शोमध्ये बोलावण्यात आले होते. दोघांमधील वादानंतर अनिता माहेरी परतली होती. या प्रकरणाची पुढील सुनावणी 1 डिसेंबर रोजी होणार असल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले.

गोविंदावरील वक्तव्यामुळेही चर्चेत


दरम्यान, राखी सावंत अलीकडेच अभिनेता गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता आहुजा यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे चर्चेत आली होती. गोविंदा यांचे कथित संबंध आणि त्यांची सह-अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकर यांच्याबाबतही तिने प्रतिक्रिया दिली होती.

राखीने गोविंदा यांना पत्नीशी योग्य वागण्याचे आवाहन केले होते. तसेच कोमलवर बदनामी केल्याचा आरोप करत तिला इशाराही दिला होता. या वक्तव्यांमुळे मनोरंजन क्षेत्रात तिची चर्चा सुरू आहे. (Entertainment News)

 
Comments
Add Comment

Madhuri Dixit: 'धक धक गर्ल'चा गुलाबी साडीत घायाळ करणारा लूक, पाहा Photos

[caption id="attachment_1067345" align="aligncenter" width="800"] अभिनेत्री माधुरी दीक्षितने आपल्या सौंदर्याच्या जोरावर बॉलिवूड इंडस्ट्रीवर अधिराज्य

सिद्धु मुसेवालाच्या छोट्या भावामुळे आई- वडिलांविरोधात तक्रार दाखल, नेमकं काय घडलं?

मुंबई: प्रसिद्ध पंजाबी गायक आणि रॅपर सिद्धु मुसेवाला आज या जगात नाही, जरीही तो आज आपल्यात नसला तरीही तो त्याच्या

रेशनवरून वाद, नॉमिनेशनचा फटका! नकुलनंतर आता कोणाची होणार बिग बॉसच्या घरातून एक्झिट?

कलर्स टीव्हीवरील लोकप्रिय शो 'बिग बॉस २०' हा स्पर्धकांमधील अटीतटीच्या स्पर्धेमुळे आणि घरातील वादांमुळे सतत

Radhika Apte New Series: रहस्य, थरार आणि सत्तेचा खेळ! राधिका आपटेच्या ‘अक्का’ची पहिली झलक समोर

अभिनेत्री राधिका आपटे आणि कीर्ती सुरेश लवकरच ‘अक्का’ या आगामी सीरिजमध्ये एकत्र दिसणार आहेत. 1980 च्या दशकातील

Sita As A Warrior : 'रामायण' चित्रपटाच्या नव्या प्रोमोत साई पल्लवीचा धडाकेबाज ॲक्शन अवतार; प्रेक्षकांनी मानले दिग्दर्शकाचे आभार

मुंबई : रणबीर कपूर, (Ranbir Kapoor) यश (Yash) आणि साई पल्लवी (Sai Pallavi) यांची प्रमुख भूमिका असलेला 'रामायण' (Ramayan) हा चित्रपट सध्या

Kareena-Saif Love Story : ...तर माझे किती पैसे वाचले असते, करीनाला असं का म्हणाला सैफ अली खान ?

Kareena And Saif : बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडप्यांमध्ये करीना कपूर आणि सैफ अली खान यांचे नाव आवर्जून घेतले जाते. लग्नाला १४