Raj Babbar: ज्येष्ठ अभिनेते राज बब्बर दिवंगत पत्नीच्या आठवणीत भावूक; म्हणाले, "...तिची प्रचंड आठवण येतेय"

दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या 71 व्या जयंतीनिमित्त ज्येष्ठ अभिनेते राज बब्बर यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये ते पत्नीच्या आठवणीत व्याकूळ झालेय.

मुंबई: दिवंगत प्रसिद्ध मराठमोळी आणि बॉलिवूड अभिनेत्री स्मिता पाटील यांची काल 71 वी जयंती होती. स्मिता पाटील आज जरीही हयात नसल्या तरीही त्या त्यांच्या दमदार अभिनयाच्या माध्यमातून चाहत्यांमध्ये जिवंत आहेत. स्मिता यांच्या जयंतीनिमित्त ज्येष्ठ अभिनेते आणि राजकारणी राज बब्बर यांनी काही खास आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर करत स्मिता यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. राज बब्बर यांनी शेअर केलेली इन्स्टा पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.



स्मिता यांचा फोटो शेअर करत राज यांनी त्यांच्या, अभिनय कौशल्याचं, सौंदर्याचं आणि स्वभावाचं कौतुक केलं आहे. राज यांनी शेअर केलेल्या पोस्टवर चाहत्यांकडून त्यांच्या सौंदर्याचं कौतुक केलं जात आहे. इतकंच नाही तर, चाहत्यांकडून स्मिता पाटील यांना आदरांजली देखील वाहिली जात आहे. राज यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, "स्मितामध्ये एक संवेदनशीलता होती. जरी तिचा जीवनप्रवास दुर्दैवाने कमी दिवसांचा असला तरीही, तिने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर एक ठसा उमटवला आहे. तिने फक्त वेगवेगळ्या भूमिका केल्या नाही तर, त्यामध्ये जीव ओतून काम केले आहे. खरं वाटेल अशा पद्धतीने आपलं काम केले आहे. मला तिची आठवण येतेय. तिचा प्रेमळ स्वभाव, दमदार अभिनय आणि तिला खास बनवणारी प्रत्येक गोष्ट आजही मला आठवतेय."


 


"स्मिताच्या जयंतीनिमित्त मला आज तिची प्रचंड आठवण येतेय. तिचा कलात्मक वारसा आजही प्रत्येक पिढीला प्रेरणा देतो, भावूक करतो आणि मनामध्ये घर निर्माण करून जातो. कलाकाराला जेव्हा देवाचं बोलावणं येतं, तेव्हा त्याला हे जग सोडून जावंच लागतं. पण स्मिताने तिच्या कारकिर्दित प्रत्येकाच्या मनामध्ये स्वत:ची एक विशेष जागा निर्माण केली आहे.", अशी प्रतिक्रिया राज बब्बर यांनी आपल्या पोस्टच्या शेवटच्या भागामध्ये लिहिली आहे. स्मिता पाटील यांच्या मुलगा आणि प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता प्रतीक बब्बरनेही इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केली आहे. त्याने त्याच्या लग्नामध्ये आईचा खास फोटो लावला होता. त्यासोबतचा फोटो शेअर केलेला आहे. आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना प्रतीक भावूक झाला होता.



आज जरीही स्मिता पाटील हयात नसल्या तरीही त्यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर अधिराज्य केले आहे. वेगवेगळ्या शैलीचा अभिनय करत स्मिता यांनी प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केले आहे. अभिनय कौशल्य, सौंदर्य आणि कामाप्रती असलेली निष्ठा हे तिन्ही कौशल्य स्मिता यांच्याकडे असल्यामुळे स्मिता यांचं कौतुक संपूर्ण भारतीय कलाविश्व करतं.

Comments
Add Comment

Neeti Mohan: प्रसिद्ध बॉलिवूड सिंगर नीती मोहनवर कोसळला दु:खाचा डोंगर, वडिलांचं छत्र हरपलं

मुंबई: प्रसिद्ध बॉलिवूड गायिका नीती मोहनवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गायिका नीती मोहन, कॉरियोग्राफर शक्ती मोहन

Academy Museum Gala 2026: ग्लॅमरचा तडका! सेलिब्रिटींच्या लूकची सर्वत्र चर्चा

प्रियांका चोप्रा म्युझियम २०२६ च्या गालामध्ये डीप नेकलाइन असलेलया विवियन वेस्टवुड कूटूरच्या अप्रतिम गाऊन

Ramayan: रामायण 'राइज ऑफ अ लिजेंड' रचणार इतिहास! भारतासाठी ठरला अभिमानाचा क्षण

भारतासाठी अभिमानाचा क्षण! भारतीय सिनेमाचा भव्य आविष्कार आणि दिवाळीचा उत्साह आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवत,

Nayyi Naveli : ‘नई नवेली’ची बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी; दोन दिवसांत जगभरात 10.3 कोटींची कमाई

Entertainment News: अभिनेत्री यामी गौतमच्या ‘नई नवेली’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा

Rakhi Sawant : आत्महत्या प्रकरणात राखी सावंतविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट; न्यायालयात गैरहजर राहिल्याने कारवाई

Entertainment News: अभिनेत्री राखी सावंत हिच्या अडचणीत वाढ झाली आहे. उत्तर प्रदेशातील झाशी येथील न्यायालयाने 2010 मधील

Madhuri Dixit: 'धक धक गर्ल'चा गुलाबी साडीत घायाळ करणारा लूक, पाहा Photos

[caption id="attachment_1067345" align="aligncenter" width="800"] अभिनेत्री माधुरी दीक्षितने आपल्या सौंदर्याच्या जोरावर बॉलिवूड इंडस्ट्रीवर अधिराज्य