Mumbai Crime News : ओला कारमधून उतरले अन् थेट गोळीबार! वडाळ्यात नेमकं काय घडलं?
ओला कॅबमधून आलेल्या तीन जणांनी एका तरुणावर तीन गोळ्या झाडल्या.
October 18, 2026 12:08 PM
धक्कादायक! वडाळा परिसरात गोळीबार; तरुणावर तीन गोळ्या झाडल्या, एका तासात दोघांना अटक (Photo X)
वडाळा: मुंबईतील वडाळा पश्चिम परिसरात एसआयडब्ल्यूएस कॉलेजजवळ शनिवारी रात्री गोळीबाराची घटना घडली. ओला कॅबमधून आलेल्या तीन जणांनी एका तरुणावर तीन गोळ्या झाडल्या. मात्र, या हल्ल्यात तरुण सुखरूप बचावला. घटनेची माहिती मिळताच माटुंगा पोलिसांनी तपास सुरू केला आणि एका तासाच्या आत दोन संशयितांना अटक केली. त्यांच्याकडून पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. (Wadala Firing)
सचिन धानजी
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी अनधिकृत फ्लेक्स बॅनर्स, पोस्टर्स आणि स्टिकर्स हटविण्यासाठी महापौरांनी "शाडू बाप्पा दहा दिवस – ...
ओला कॅबमधून आलेल्या तिघांकडून गोळीबार
मिळालेल्या माहितीनुसार, वडाळा पश्चिम येथील आर. ए. किडवाई रोडवरील चार रस्ता परिसरात एसआयडब्ल्यूएस कॉलेजजवळ ही घटना घडली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, तिघे जण ओला कॅबमधून आले आणि रस्त्यावरून चालत असलेल्या एका व्यक्तीवर तीन गोळ्या झाडल्या. गोळीबारानंतर परिसरात घबराट पसरली. (Mumbai Crime)
घटनेची माहिती मिळताच माटुंगा पोलीस, गुन्हे शाखा युनिट 4 आणि परिमंडळ 4 चे पोलीस उपायुक्त अनुराग जैन घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तपासासाठी तातडीने पावले उचलली.
एका तासात दोन संशयितांना अटक
पोलिसांनी संबंधित कॅबचालकाची चौकशी केली. मात्र, गोळीबाराच्या घटनेची आपल्याला माहिती नसल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला. अवघ्या एका तासाच्या आत अँटॉप हिल परिसरातून दोघांना अटक करण्यात आली. (Crime News)
अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे हमजा खान आणि अली उर्फ दाऊद खान अशी आहेत. दोघेही वडाळा येथील हिम्मत नगर परिसरातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांच्याकडून दोन पिस्तूल, त्यापैकी एक गावठी कट्टा, तसेच जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
वैयक्तिक वादातून गोळीबार झाल्याचा संशय
गोळीबारात बचावलेल्या व्यक्तीची ओळख सोहेब अशी झाली असून तो वडाळा टीटी येथील संगम नगर परिसरातील रहिवासी आहे. आरोपी आणि पीडित हे उत्तर प्रदेशातील प्रतापगडचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
प्राथमिक तपासानुसार, वैयक्तिक वैमनस्यातून हा गोळीबार झाला असावा, असा पोलिसांचा संशय आहे. मात्र, हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास माटुंगा पोलीस आणि गुन्हे शाखेकडून सुरू आहे.