Nitesh Rane: ‘गुन्हेगारांना वाचवण्यात मविआच्या नेत्यांची पीएचडी...’ मंत्री नितेश राणेंकडून विरोधकांची कान उघडणी

अभिनेता टायगर श्रॉफवर जुहूमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेवरून सध्या राज्यातील राजकारण कमालीचं तापलं आहे. विरोधक आणि सत्ताधारी या घटनेवरून एकमेकांवर टीकेची चिखलफेक केली जात आहे.

मुंबई: अभिनेता टायगर श्रॉफवर जुहूमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेवरून सध्या राज्यातील राजकारण कमालीचं तापलं आहे. विरोधक आणि सत्ताधारी या घटनेवरून एकमेकांवर टीकेची चिखलफेक केली जात आहे. दरम्यान, आज दुपारी (19 ऑक्टोबर- सोमवार) मंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत घेत, टायगर श्रॉफच्या गोळीबाराच्या घटनेवरून मविआच्या नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पोलिसांकडून गुन्ह्यांचा तपास केला जात असल्याचे सांगत त्यांनी मविआच्या काळातील कायदा- सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले. यावेळी त्यांनी खा.संजय राऊत, खा.सुप्रिया सुळे आणि काँग्रेसच्या नेत्यांवरही निशाणा साधला.


यावेळी पत्रकार परिषदेमध्ये, नितेश राणे यांनी आरोपींचा लवकरात लवकर शोध घेण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. इतकंच नाही तर, अभिनेत्याच्या हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची 12 पथकं रवाना करण्यात आली आहे. शिवाय, महाराष्ट्र आणि राजस्थानातून आरोपींसह आरोपींच्या संपर्कात असणाऱ्या इतर जणांनाही ताब्यात घेतलं जाणार असल्याची त्यांनी माहिती दिली आहे. यावेळी मंत्री नितेश राणे यांनी, मविआच्या काळामध्ये त्यांच्या सरकारने गुन्हेगारांना संरक्षण दिल्याचा आरोप केला आहे. “टायगर श्रॉफवर गोळीबार झाल्यावर मविआमधली सर्व बेडकं बाहेर येऊन फार डराव डराव करायला लागलेली आहेत. जेव्हा तुमचं सरकार होतं, तेव्हा केलेली सर्व कारनामे, पराक्रम कदाचित हे सगळे नेते मंडळी विसरले असतील. टायगर श्रॉफवर गोळीबार झाला. त्यानंतर पोलिसांचे 12 पथक त्या शुटरला शोधण्यासाठी गेले आहेत. त्यातील काही शुटरला पकडलेले पण आहे. राजस्थान आणि महाराष्ट्रातून काही लोकांना पकडलेले आहे.”



मंत्री नितेश राणे विरोधकांवर टीका करताना पुढे म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस यांच्या काळात अशा कुठल्याही घटना घडल्यानंतर अत्यंत तत्परतेने पोलीस खाते काम करते. त्याच्या पाच टक्के तरी मविआच्या काळात काम व्हायचं का? म्हणजे कारवाई करणं आणि तपास करणे ही लांबचीच गोष्ट आहे. मात्र गुन्हेगारांना वाचवण्यात महाविकास आघाडीच्या सरकारने पीएचडी केलेली होती.” त्यानंत पत्रकार परिषदेमध्ये मंत्री नितेश राणे यांनी दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपशील देत मविआच्या नेत्यांना टार्गेट केले आहे. सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियन यांच्या मृत्यूच्या प्रकरणांचा उल्लेख करत राणेंनी ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला. या प्रकरणांमध्ये लपवाछपवी झाल्याचा दावा करत त्यांनी तत्कालीन ठाकरे सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.


पुढे पत्रकार परिषदेत मंत्री नितेश राणे म्हणाले, “संजय राजाराम राऊतने स्वतःच्या मालकाच्या अंगावर जे सुशांत सिंग आणि दिशा सालियनच्या खुनाचे भरवटलेले आणि रक्ताने भरवटलेले जे कपडे आहेत, ते पहिले साफ करावे. स्वतःच्या मालकावर आणि त्याच्या मुलावर खून आणि बलात्कारचे आरोप आहेत. सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियन यांच्या वडिलांनी केलेले आहेत हे आरोप, मविआच्या काळात मनसुख हिरेन हत्याकांड, मोठ्या उद्योगपतींच्या घराबाहेर जिलेटिनच्या काड्या ठेवणं, सुशांत सिंगचा खून, दिशा सालियनचा खून आणि गँगरेप, स्वतःच तेव्हा मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे आणि स्वतःचा मुलगा जो तेव्हा कॅबिनेट मंत्री पण होता त्याचं नाव त्या खून प्रकरणात येते आणि मग त्याला वाचवण्यासाठी. किती मोठा कव्हर अप झाला? या गोष्टी आमच्या देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यात होत नाही.”



“कोण हे करण्याची हिंम्मत करत नाही. आमच्या सरकारच्या काळात आजही जिथे कुठे क्राईम घडेल तिथे लगेच पोलीस ॲक्शन मोडमध्ये जातात. तुमच्यासारखे लपवा लपवी करायला जात नाही.” असं म्हणत मविआच्या सर्व नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांना उद्देशून त्यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अटकेचा संदर्भ दिला. “सुप्रिया ताईंना थोडं आठवण करून देईन. तुमच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादीचा गृहमंत्री होता. ज्याला अटक झाली आणि जेलमध्ये जायला लागले.”, अशी टीका मंत्री नितेश राणे यांनी सुप्रिया सुळेंवर केली. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील कायदा- सुव्यवस्थेवर नियंत्रण ठेवल्याचा दावा करत राणे यांनी पुण्यातील एका अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या प्रकरणाचा दाखला दिला.


“गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेवर अंकुश ठेवला आहे. पुण्याची एका चिमुकलीची बलात्काराची केस घडली. आरोपीला लगेच फाशीची शिक्षा ठोठावली गेली गेली. अशी शंभर उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकतो.” दिशा सालियन प्रकरणावरून नितेश राणे यांनी एकंदरितच विरोधकांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे, “दिशा सालियन प्रकरणात मविआ सरकारने लपवालपवी केली. ती केस उघडली आहे, आता बघा तुमच्या मालकाचा मुलगा दिवाळीचे फटाके मातोश्रीवर फोडतो का? तिहाड- ऑर्थर रोडला फोडतो ते.” केंद्र सरकारच्या नक्षलवादविरोधी कारवाईचाही त्यांनी उल्लेख केला. “केंद्र सरकारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशातील नक्षलवाद पूर्ण संपवलेला आहे. आज नक्षलमुक्त भारतच्या दिशेने आपण चाललेलो आहे. मग त्यांना ह्या दोन चार लोकांना निपटवण्यामध्ये किती वेळ लागतोय? फक्त प्रत्येक गोष्टीची तारीख ठरलेली आहे. प्रत्येक गोष्टीची एक प्रक्रिया असते.”

Comments
Add Comment

मंत्री नितेश राणे यांचा ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावर गंभीर आरोप; ‘शरिया समर्थन’ आणि फ्रान्सच्या मुद्द्यावरून निशाणा

मुंबई : विजयादशमीनिमित्त शिवाजी पार्क येथे होणाऱ्या ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री

DCM Eknath Shinde: सरनाईकांच्या विजयाची जबाबदारी आमची; शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न नक्की सोडवणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची ग्वाही

अमरावती, ता 18 : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांनी शाळा आणि शिक्षकांसाठी

Deputy Chief Minister Eknath Shinde: अमरावती शिक्षक मतदारसंघात शिंदेंचा ‘डॅमेज कंट्रोल’; सरनाईकांसाठी बंडखोरी शमवली

अमरावती, ता 18 : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांच्या प्रचाराला

निवडणूक आयुक्तांविरोधातील मोर्चात टीपू सुलतानच्या घोषणा कशासाठी? - मंत्री नितेश राणेंचा सवाल

मुंबई : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे

हिंदूराष्ट्राला इस्लामिक बनवण्यासाठी हलालच्या पैशांचा वापर; मंत्री नितेश राणे यांचा हल्लाबोल

मुंबई : “हलाल प्रमाणपत्रांच्या माध्यमातून गोळा होणारा पैसा हिंदू समाजाला दुर्बल करण्यासाठी आणि भारताला

परकीय शक्तींच्या मदतीने देशात अराजकता पसरवण्याचे विरोधकांचे मनसुबे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जहरी टीका

मुंबई: “विरोधक सुप्रीम कोर्टावर मोर्चे काढतात, चाल करुन जातात, पंतप्रधानांच्या घरासमोर आंदोलन करतात, दिल्लीत