मंत्री नितेश राणे यांचा ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावर गंभीर आरोप; ‘शरिया समर्थन’ आणि फ्रान्सच्या मुद्द्यावरून निशाणा

शिवाजी पार्कवरील ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याआधी मंत्री नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. मेळाव्याच्या टीझरमधील ‘संविधान संरक्षणार्थ’ या शब्दप्रयोगावर आक्षेप घेत त्यांनी ठाकरे गटावर ‘शरिया समर्थनाचा’ आरोप केला. फ्रान्स आणि युरोपमधील परिस्थितीचा संदर्भ देत त्यांनी महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेबाबतही भाष्य केले. या वक्तव्यामुळे दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चेला वेग आला आहे.

मुंबई : विजयादशमीनिमित्त शिवाजी पार्क येथे होणाऱ्या ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत आक्रमक शब्दांत टीका केली आहे. मेळाव्याच्या टीझरमधील ‘संविधान संरक्षणार्थ’ या शब्दप्रयोगावर आक्षेप घेत, हा मेळावा संविधान रक्षणासाठी नसून शरिया समर्थनासाठी असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. तसेच, फ्रान्स आणि युरोपमधील आंदोलनांचा संदर्भ देत, महाराष्ट्रात अशा प्रकारच्या परिस्थितीला थारा देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.



‘रक्ताचा रंग भगवा राहिलेला नाही’


शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यातून कायम हिंदुत्वाची रोखठोक भूमिका मांडली होती, मात्र सध्याच्या ठाकरे गटाची भूमिका त्याहून पूर्णपणे वेगळी असल्याचा दावा मंत्री नितेश राणे यांनी केला. यावेळी बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले, “ठाकरेंच्या मेळाव्याच्या टीझरमध्ये ‘संविधान संरक्षणार्थ’ ऐवजी ‘शरिया समर्थनात’ असे वाक्य असायला हवे होते. आजचा ठाकरेंचा मेळावा हा शरियाच्या समर्थनात आहे. जे शरियाला मानणारे आहेत, त्यांना समर्थन करण्यासाठीच हा मेळावा होत आहे. ठाकरेंना या देशामध्ये शरिया कायदा आणायचा आहे आणि संविधान संपवायचे आहे.” पुढे बोलताना त्यांनी, “तिथे आता ‘जय श्रीराम’ किंवा ‘जय महाराष्ट्र’ हे नारे नाही तर ‘सर तन से जुदा’चे नारे ऐकायला मिळतील. उद्या तिथे ‘पाकिस्तान झिंदाबाद’ ऐकायला मिळाले तरी आश्चर्य वाटायला नको. ठाकरेंच्या मेळाव्यामध्ये कोणाच्याच रक्ताचा रंग भगवा राहिलेला नाही, सगळे हिरवेगार झाले आहेत. त्यामुळे ‘अल्लाहु अकबर’ म्हणतच त्यांचा उद्याचा दसरा मेळावा होईल,” अशी टिकेची झोड उठवली.



फ्रान्स आणि युरोपमधील स्थितीचा दाखला


देशाच्या, राष्ट्राच्या किंवा सनातन हिंदू धर्माच्या विरोधात कोणी आंदोलन किंवा कृत्य केल्यास पोलीस कठोर कारवाई करतील, असा इशाराही मंत्री नितेश राणे यांनी दिला. सोशल मीडियावर चालणाऱ्या विविध ट्रेण्ड्सवर बोलताना त्यांनी युरोपमधील परिस्थितीचा दाखला दिला. “असे ट्रेण्ड चालवायचे असतील तर फ्रान्समध्ये काय चाललंय ते बघा, युरोप आगीत जळतोय. बांगलादेशी आणि रोहिंग्या लोकांना ज्यांनी आश्रय दिला, तिथे आज स्थानिकांवर हल्ले आणि जाळपोळ सुरू आहे. कालचे फ्रान्स आम्ही उद्याची मुंबई होऊ देणार नाही. यासाठीच राज्यात आणि देशात हिंदुत्ववादी सरकारची गरज असते,” असे ते म्हणाले. फ्रान्समधील आंदोलनाची सुरुवात शिक्षणापासून झाली होती, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

Comments
Add Comment

Nitesh Rane: ‘गुन्हेगारांना वाचवण्यात मविआच्या नेत्यांची पीएचडी...’ मंत्री नितेश राणेंकडून विरोधकांची कान उघडणी

मुंबई: अभिनेता टायगर श्रॉफवर जुहूमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेवरून सध्या राज्यातील राजकारण कमालीचं तापलं

DCM Eknath Shinde: सरनाईकांच्या विजयाची जबाबदारी आमची; शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न नक्की सोडवणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची ग्वाही

अमरावती, ता 18 : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांनी शाळा आणि शिक्षकांसाठी

Deputy Chief Minister Eknath Shinde: अमरावती शिक्षक मतदारसंघात शिंदेंचा ‘डॅमेज कंट्रोल’; सरनाईकांसाठी बंडखोरी शमवली

अमरावती, ता 18 : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांच्या प्रचाराला

निवडणूक आयुक्तांविरोधातील मोर्चात टीपू सुलतानच्या घोषणा कशासाठी? - मंत्री नितेश राणेंचा सवाल

मुंबई : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे

हिंदूराष्ट्राला इस्लामिक बनवण्यासाठी हलालच्या पैशांचा वापर; मंत्री नितेश राणे यांचा हल्लाबोल

मुंबई : “हलाल प्रमाणपत्रांच्या माध्यमातून गोळा होणारा पैसा हिंदू समाजाला दुर्बल करण्यासाठी आणि भारताला

परकीय शक्तींच्या मदतीने देशात अराजकता पसरवण्याचे विरोधकांचे मनसुबे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जहरी टीका

मुंबई: “विरोधक सुप्रीम कोर्टावर मोर्चे काढतात, चाल करुन जातात, पंतप्रधानांच्या घरासमोर आंदोलन करतात, दिल्लीत