मुंबई: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर मुंबईतील जुहू परिसरात रविवारी संध्याकाळी फुटबॉल मैदानावर बाहेर पडत असताना तिघांनी हल्ला केला. या गोळीबाराच्या घटनेमध्ये अभिनेत्याला कोणतीही दुखापत झाली नाही. या घटनेमध्ये हल्लेखोरांनी जी बाईक वापरली होती, तिची चौकशी केली आहे. या बाईकचे मालक आता चौकशीच्या फेऱ्यामध्ये अडकले आहेत. ह्या बाईकचे एक- दोन नाही तर, चार मालक आहेत. नेमकं संपूर्ण प्रकरण काय आहे, जाणून घेऊया...
Tiger Shroff Car Attack: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनं मनोरंजनविश्वात खळबळ उडाली होती. एका पार्कच्या गेटबाहेर टायगरच्या ...
मुंबई पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांनी वापरलेल्या बजाज पल्सर बाईकच्या मालकाचा शोध घेतला आहे. बाईकचा तिसरा मालक, रज्जाब अली शेख यांनी या प्रकरणावर ANI News ला मुलाखत दिली आहे. एएनआय न्यूजसोबत बोलताना बाईकच्या मालकांनी सांगितले की, "बाईक विकण्याच्या उद्देशाने आम्ही ती बाहेर ठेवली होती. माझ्या पुतण्याने बाईक विकायची म्हणून तिला बाहेर ठेवले. बाईक खरेदी करणारा व्यक्ती आणि आमचा ओळखीचा व्यक्ती असल्यामुळे ते आमच्याकडे आले. 25,000 ते 26,000 पर्यंत बाईक विक्री करण्याचा सौदा करण्यात आला होता. तर आम्ही ती विकुन टाकली."
#WATCH | Mumbai | Firing incident targeting actor Tiger Shroff | Mumbai Police has traced the ownership trail of the Bajaj Pulsar motorcycle used by the shooters.
Rajjab Ali Shaikh, the third owner of the bike, says, "The bike was kept outside, intended for sale. My nephew decided to sell it... Through a chain of acquaintances, someone reached out, expressing interest in buying the bike. The buyer arrived, and since everyone was connected through mutual friends, the deal went through, and we sold it for Rs 25,000-26,000... When the incident came out in the media, the police arrived at our home. That’s when we realized that the person we sold it to, or perhaps someone else, might have used it; we didn’t even know who had used it. It’s only now becoming clear that it was indeed our bike."
He adds, "The Mumbai Police came and questioned us. We told them everything; we shared the complete truth as it happened. We assured them that if any further action is required, we are fully prepared to cooperate whenever they need us... It was a Pulsar... I request people to ensure all the paperwork is completed thoroughly whenever selling their bike... It is a source of great distress; we are very worried... We sold the vehicle, and it ended up being used for the wrong purposes... The police have been very supportive, and we intend to cooperate with the Mumbai Police... If they ask us to act as witnesses, we will certainly do so... We are the third owners, and we sold it for the fourth time..."
— ANI (@ANI) October 20, 2026
"जेव्हा अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबाराची घटना आम्ही माध्यमांमध्ये पाहिली, त्यानंतर आमच्या घरी पोलीस आले. तेव्हा आमच्या लक्षात आले की, ज्या व्यक्तीला आम्ही बाईक विकली किंवा इतर कोणता तरी व्यक्ती असेल त्याने ती बाईक वापरली. ती खरोखरच आमची बाईक होती का? हे आम्हाला कळत नव्हतं. पण झालेल्या सर्व चौकशीमध्ये लक्षात आले की, आम्ही ज्याला बाईक विकली, तोच गुन्हेगार होता. मुंबई पोलीस आले आणि त्यांनी आमची चौकशी केली. आम्ही त्यांना सर्व खरोखर माहिती सांगितली. संपूर्ण घटनाक्रम आम्ही त्यांच्यासमोर मांडला. आम्ही नेहमीच पोलिसांना चौकशीमध्ये सहकार्य करू, यामध्ये कोणतीही शंका नाही."
Jailer 2 Box Office Collection : सुपरस्टार रजनीकांतच्या ‘जेलर 2’ या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर दमदार घोडदौड सुरू आहे. पहिल्या दिवसापासूनच या सिनेमाने प्रेक्षकांचे लक्ष ...
"आमची बजाज पल्सर ही बाईक होती. मी ही बाईक विकताना सर्व कागदपत्रे व्यवस्थित पूर्ण केली आहेत. बाईक विकली आहे, पण आमच्यासाठी खूप त्रासदायक बाब ठरली आहे. आम्ही गाडी विकली खरं पण तिचा वापर चुकीच्या कामांसाठी झाला. आम्ही कायमच मुंबई पोलिसांना खूप सहकार्य केले आहे आणि कायमच सहकार्य करत राहू. जर त्यांनी आम्हाला साक्षीदार म्हणून काम करण्यास सांगितले, तर आम्ही ते सुद्धा नक्कीच करू... आम्ही तिचे तिसरे मालक आहोत, आणि आम्ही ती चौथ्यांदा विकली... आम्ही त्याला सर्व कागदपत्रे त्याच्या स्वाधीन केले आहेत. "