Wednesday, October 21, 2026

IND vs NZ 1st T20 Live Streaming : भारत न्यूझीलंड टी20 मालिका कुठे पाहता येणार? A to Z डिटेल्स जाणून घ्या

भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर असून पहिल्यांदा टी20 मालिका होणार आहे. पाच सामन्यांच्या टी20 मालिकेकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. ही मालिका 22 ऑक्टोबरपासून असून कुठे पाहता येणार वगैरे सर्वकाही जाणून घ्या.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांची टी20 मालिका 22 ऑक्टोबरपासून होत आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ सज्ज झाला असून जोरदार सराव करत आहे. मात्र हा दौरा वाटतो तितका सोपा नाही. कारण भारतीय संघाचा टी20 मालिकेत कस लागणार आहे. तसा पाहिलं तर भारतीय संघाचा न्यूझीलंडमधील टी20 रेकॉर्ड चांगला आहे. मात्र सध्याच्या संघात न्यूझीलंडमध्ये खेळण्याचा अनुभव असलेले खेळाडू फार कमी आहेत. त्यामुळे भारतीय संघाची परीक्षा असणार आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. पण तिथली वेळ आणि तिथलं वातावरण पाहता भारतीय खेळाडूंसाठी कठीण पेपर असेल. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी20 सामना कुठे आहे. कोणत्या मैदानात आणि कुठे हा सामना पाहता येईल? सर्वकाही जाणून घ्या

भारत आणि न्यूझीलंड पहिला टी20 सामना कधी?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी20 सामना 22 ऑक्टोर 2026 रोजी खेळवला जाणार आहे. पाच सामन्यांच्या टी20 मालिका असून या मालिकेची सांगता 1 नोव्हेंबरला होणार आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यात कोण आघाडी घेणार? याकडे लक्ष आहे.

पहिला टी20 सामना कुठे खेळला जाणार?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी20 सामना न्यूझीलंडमधील क्राइस्टचर्च येथील हॅगली ओव्हल या मैदानात खेळला जाणार आहे. या मैदानातील खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना मदत करणारी आहे. त्यामुळे भुवनेश्वर कुमारच्या कामगिरीकडे लक्ष असेल.

भारत न्यूझीलंड सामना किती वाजता सुरू होईल?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी20 सामन्या स्थानिक वेळेनुसार रात्री 8 वाजता असेल. पण भारतीय वेळेनुसार दुपारी 12.30 वाजता सामन्याला सुरूवात होईल. तर नाणेफेकीचा कौल हा दुपारी 12 वाजता होईल.

भारत न्यूझीलंड सामना कुठे पाहता येईल?

भारत न्यूझीलंड पहिल्या टी20 सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या टीव्ही चॅनेल्सवर होईल. याशिवाय ऑनलाईन प्रक्षेपण सोनी लिव्ह एप आणि वेबसाईटवर असेल.

भारत आणि न्यूझीलंड संघ

भारतीय टी 20 संघ : श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), वैभव सूर्यवंशी, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा (उपकर्णधार), अक्षर पटेल, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, नमन धीर, प्रिन्स यादव, मयंक यादव, अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव. न्यूझीलंड टी 20 संघ : मिचेल सँटनर (कर्णधार), फिन ऍलन (विकेटकीपर), मायकल ब्रेसवेल, जोश क्लार्कसन, डेव्हॉन कॉनवे, जेकब डफी, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, बेव्हॉन जेकब्स, काईल जेमिसन, ऍडम मिल्ने, डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, टिम सेफर्ट (विकेटकीपर), नॅथन स्मिथ, ब्लेअर टिकनर.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >