Wednesday, October 21, 2026

IND vs NZ: टीम इंडियाने न्यूझीलंडमध्ये जिंकले सर्वाधिक सामने, तरीही पहिल्या सामन्यात धाकधूक! असं का?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका होत आहे. या मालिकेतील पहिला सामना 22 ऑक्टोबरला होत आहे. या सामन्यात भारताची परीक्षा असणार आहे. असं का ते समजून घ्या

वेस्ट इंडिजविरुद्धची टी20 मालिका 2-2 ने बरोबरीत सुटल्यानंतर आता भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज आहे. भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर असून पाच सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला टी20 मालिका क्राइस्टचर्च येथे 22 ऑक्टोबरला खेळला जाणार आहे. भारतीय संघ जवळपास 4 वर्षांनी न्यूझीलंडच्या भूमीत टी20 मालिका खेळणार आहे. त्यामुळे ही मालिका खूपच महत्त्वाची आहे. त्यात भारतीय संघात बरेच बदल झाले आहे. चार वर्षापूर्वी खेळलेले बहुतांश खेळाडू या संघात नाहीत. तेव्हा खेळलेल्या संघातील फक्त दोन ते तीन खेळाडू या मालिकेचा भाग आहेत. त्यामुळे ही मालिका वाटते तितकी सोपी नाही. कारण सध्याच्या संघात असलेले वरिष्ठ खेळाडू हे न्यूझीलंडच्या भूमीत खेळलेले नाहीत. त्यामुळे अनुभवाची उणीव यावेळी भारतीय संघात आहे.

न्यूझीलंडच्या भूमीत अनुभवाची उणीव!

अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, गुरनूर ब्रार, तिलक वर्मा, संजू सॅमसन, इशान किशन यांना न्यूझीलंडमध्ये खेळण्याचा थोडा फार अनुभव आहे. तर अर्शदीप सिंह, श्रेयस अय्यर, भुवनेश्वर कुमार यासारखे वरिष्ठ खेळाडू आहे. या खेळाडूंनी न्यूझीलंडमध्ये थोडं फार क्रिकेट खेळलं आहे. यात अर्शदीप सिंग आणि श्रेयस अय्यरने हेगले ओव्हलमध्ये फक्त एक वनडे सामना खेळला होता. या सामन्यात दोघंही अपयशी ठरले होते. त्यामुळे ही मालिका भारतासाठी लिटमस टेस्ट असणार आहे.

क्राइस्टचर्च मैदानात कशी आहे स्थिती?

न्यूझीलंड आणि भारत यांच्यात पहिल्यांदाच क्राइस्टचर्च मैदानात सामना होत आहे. यापूर्वी या मैदानात भारताने एक कसोटी आणि एक वनडे सामना खेळला आहे. दुसरीकडे, या मैदानात न्यूझीलंडने एकूण 13 टी20 सामने खेळले आहेत. यात सहा सामन्यात विजय आणि सहा सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. दुसरीकडे, न्यूझीलंडच्या भूमीत भारतीय संघाचा टी20 रेकॉर्ड चांगला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात एकूण 12 टी20 सामने खेळले आहेत. त्यापैकी 7 सामन्यात भारताने, तर न्यूझीलंडने फक्त 4 सामन्यात विजय मिळवला आहे. एक सामना टाय झाला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा