'जेलर 2' मध्ये मोहनलालचा बॉडी डबल वापरल्याचे सत्य समोर; अखेर तो कलाकार आला समोर!

रजनीकांतच्या 'जेलर 2' चित्रपटातील मोहनलालच्या बॉडी डबल वादावर मिमिक्री कलाकार जोबी कोडकाराने मौन सोडत सत्य सांगितले आहे.

रजनीकांत यांच्या बहुचर्चित 'जेलर 2' चित्रपट रिलीज झाल्यापासूनच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात जगभरात 500 कोटींचा टप्पा पार केला आहे. मात्र, या यशाच्या जोडीलाच चित्रपटातील एका दृश्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. क्लायमॅक्समधील एका महत्त्वाच्या कार ड्रायव्हिंग सीनमध्ये मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांच्याऐवजी बॉडी डबल वापरल्याची चर्चा सोशल मीडियावर वेगाने पसरली होती, ज्यामुळे चाहत्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता.



नेमका काय होता वाद आणि कोणाचा झाला वापर?


चित्रपटात मोहनलाल यांनी 'मॅथ्यू' ही भूमिका साकारली असून, सिक्वलमध्ये ते क्लायमॅक्समध्ये पाहायला मिळतात. दरम्यान, मिमिक्री कलाकार जोबी कोडकारा याने मॅथ्यूच्या लूकमधील स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. यानंतर चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली की क्लायमॅक्समध्ये मोहनलाल यांच्यासाठी बॉडी डबलचा वापर करण्यात आला आहे. मात्र, या वादावर आता खुद्द जोबी कोडकारा याने मौन सोडत संपूर्ण सत्य समोर आणले आहे.



जोबी कोडकाराचा मोठा खुलासा


एका मुलाखतीत बोलताना जोबीने स्पष्ट केले की, चित्रपटात त्याचा चेहरा कुठेही दिसत नाही. केवळ एक-दोन शॉट्समध्ये त्याचे हात आणि पाय कॅमेऱ्यात टिपले गेले आहेत. क्लायमॅक्समधील विमानतळाच्या दृश्यात गिअर बदलताना आणि अ‍ॅक्सेलरेटर दाबतानाचे हेच शॉट्स असल्याचे त्याने सांगितले. वेळेच्या तीव्र अडचणींमुळे प्रॉडक्शन टीमने आपली मदत घेतल्याचे त्याने मान्य केले. मात्र, चित्रपट रिलीज झाल्यानंतर उत्साहाच्या भरात सेटवरील स्वतःचे फोटो सोशल मीडियावर शेअर करणे हीच आपली सर्वात मोठी चूक असल्याचे त्याने कबूल केले.



चेतन डिसूझांचे स्पष्टीकरण आणि स्टायलिस्टची नाराजी


याआधी अ‍ॅक्शन दिग्दर्शक चेतन डिसूझा यांनीदेखील स्पष्ट केले होते की, क्लायमॅक्समधील मूळ कार स्टंट सीन खुद्द मोहनलाल यांनीच स्वतः केला आहे. दुसरीकडे, चित्रपटात मोहनलाल यांचा स्क्रीन टाइम अपेक्षेपेक्षा खूपच कापण्यात आल्यामुळे त्यांच्या स्टायलिस्टने थेट निर्मात्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या सर्व वादानंतरही प्रेक्षकांचा या ॲक्शनपटला उत्सफूर्त प्रतिसाद मिळत असून कमाईचे नवनवीन विक्रम प्रस्थापित होत आहेत.

Comments
Add Comment

KSBKBT2 off air: 'क्योंकि सास भी कभी बहू थी 2' संपला; स्मृती इराणी-एकता कपूर भावुक

‘क्योंकि सास भी कभी बही थी 2’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. स्मृती इराणी यांनी या मालिकेतून छोट्या

सुवर्णमंदिरात सारा अली खान भावुक; आयुष्मान खुरानासमोरच अश्रू अनावर, VIDEO व्हायरल!

नुकतेच अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता आयुष्मान खुराना यांनी त्यांच्या आगामी 'उडता तीर' चित्रपटाच्या

Kartik Sabesh Death: आधी काका, नंतर पुतण्या, प्रसिद्ध तामिळ अभिनेत्याचं 37 व्या वर्षी निधन; कुटुंबीयांवर कोसळला दुहेरी दु:खाचा डोंगर

मुंबई: तामिळ इंडस्ट्रीतून दु:खद बातमी समोर येत आहे. अभिनेता कार्तिक सबेश याचे सोमवारी रात्री उशिरा निधन झासे आहे.

Deepika-Ranveer: दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगने जाहीर केलं दुसऱ्या मुलीचं नाव; ‘देवी’च्या फोटोने वेधलं चाहत्यांचं लक्ष!

मुंबई : बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या घरी पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण आहे. या

Tiger Shroff Shooting Case: टायगर श्रॉफवरील गोळीबारात वापरलेली बाईक पोलिसांच्या रडारवर; मालकाने सांगितला संपूर्ण घटनाक्रम

मुंबई: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर मुंबईतील जुहू परिसरात रविवारी संध्याकाळी फुटबॉल मैदानावर बाहेर पडत

Tiger Shroff Car Attack : थरारक हल्ल्यानंतर टायगर श्रॉफची पहिली प्रतिक्रिया ! डावीकडून 3 तर समोरून 2 गोळ्या पुढे...

Tiger Shroff Car Attack: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनं मनोरंजनविश्वात खळबळ उडाली होती.