बुद्धभूमी फाउंडेशनच्या जमिनीचा वाद मिटणार? विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंचे महत्त्वाचे निर्देश

कल्याण तालुक्यातील चिकणघर येथील बुद्धभूमी फाउंडेशनच्या जमिनीचा प्रश्न सामोपचाराने सोडवण्याचे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले. जमिनीची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे, सातबारा उताऱ्यावरील नोंदी आणि बुद्धभूमी आंतरराष्ट्रीय बौद्ध पर्यटन केंद्राच्या विकासाबाबत विधानभवनात उच्चस्तरीय बैठक पार पडली.

मुंबई : कल्याण तालुक्यातील मौजे चिकणघर येथील बुद्धभूमी फाउंडेशनच्या दीर्घकालीन ताब्यातील जमिनीचे संरक्षण, अनधिकृत टी.डी.आर. आणि नोंदी रद्द करणे तसेच या ठिकाणी 'बुद्धभूमी आंतरराष्ट्रीय बौद्ध पर्यटन केंद्र' विकसित करण्यासंदर्भात विधानभवनात एका उच्चस्तरीय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली ही महत्त्वाची बैठक पार पडली.


या बैठकीत बोलताना विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी स्पष्ट केले की, बुद्धभूमी फाउंडेशनच्या जमिनीचा वाद कोणत्याही संघर्षाशिवाय सामोपचाराने व लवकरात लवकर सोडविला जावा. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लागल्यास परिसराचा सांस्कृतिक व धार्मिक विकास वेगाने होण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले. या जमिनीच्यासंदर्भातील कायदेशीर बाबींची पूर्तता करत ही जमीन कायमस्वरूपी भाडेतत्त्वावर देण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करावा, अशा स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच, या जमिनीसंदर्भातील कायदेशीर व योग्य ती नोंद सातबारा उताऱ्यावर घेण्यासाठीची प्रक्रियाही विनाविलंब पूर्ण करावी, असे निर्देश त्यांनी दिले.



यावेळी बैठकीमध्ये एमएमआरडीएद्वारे (MMRDA) परिसरात करण्यात आलेल्या विविध विकासकामांचा आणि त्यामुळे निर्माण झालेला प्रश्नांचाही आढावा घेण्यात आला. एमएमआरडीएच्या कामांमुळे बुद्धभूमी फाउंडेशनच्या जमिनीचे किंवा मालमत्तेचे काही नुकसान झाले असल्यास, त्याची पाहणी करून ते नुकसान संबंधित कंत्राटदाराकडून तातडीने भरून घेण्यात यावे, असे निर्देशही अण्णा बनसोडे यांनी दिले. या निर्णयामुळे फाउंडेशनला मोठा दिलासा मिळणार असून रखडलेल्या विकासाला गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


या बैठकीला कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) यांचे वरिष्ठ अधिकारी तसेच बुद्धभूमी फाउंडेशनचे पदाधिकारी व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून या प्रकल्पाच्या मार्गातील अडथळे दूर करावेत, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Comments
Add Comment

दक्षिण अफ्रिकेचं कमबॅक, ऑस्ट्रेलियाला एक डाव आणि 31 धावांनी नमवलं! WTC गुणतालिकेत असा बदल

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका होत आहे. या मालिकेत दुसऱ्या कसोटी

Saptashrungi Devi: सप्तशृंग गडावर खासगी वाहनांना प्रवेशबंदी; कोजागिरी पौर्णिमेनिमित्त प्रशासनाचा निर्णय, चेक करा एका क्लिकवर

नाशिक: नाशिकमधील सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रातील काना कोपऱ्यातून लाखो भाविक

मनोज जरांगे पाटील यांच्याकडील क्लिपची एसआयटीमार्फत सखोल चौकशी व्हावी; भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांची मागणी

'एआय' च्या जमान्यात बनावट ऑडिओ क्लिप्स आणि व्हिडिओ वेगवेगळ्या स्वरूपात बाजारात येत असल्याने मनोज जरांगे पाटील

Mumbai Prohibitory Orders: बृहन्मुंबई हद्दीत 25 ऑक्टोबरपर्यंत जमावबंदी आदेश जारी

मुंबई, दि. 22 : बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस

महाराष्ट्रातील शाळांना 'या' तारखेपासून दिवाळीची सुट्टी; शिक्षण विभागाचे परिपत्रक जाहीर

राज्य सरकारच्या माध्यमिक शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील शाळांच्या सत्रांची रचना आणि विविध

Simhastha Kumbhmela 2027: कुंभमेळ्याआधी त्र्यंबकेश्वरमध्ये मोठी तयारी, ज्योतिर्लिंग मंदिर परिसरातील रस्ता दुरुस्तीला NMA ची मंजुरी

नाशिक: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरच्या श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर