Thursday, October 22, 2026

Bhatsa Dam Water Level : भातसा धरणातील पाणीसाठ्यात तफावत, दहा दिवसांत तब्बल २४ टक्क्यांनी घटला

भाजपच्या तेजिंदर सिंग तिवाना यांनी जलअभियंता विभागाच्या निदर्शनास आणून दिली छपाईतील चूक

मुंबई (विशेष प्रतिनिधी)

मुंबई महानगरपालिकेच्या आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत भातसा धरणातील पाणीसाठ्याच्या आकडेवारीतील गंभीर तफावत स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवक आणि सदस्य तेजिंदर सिंग तिवाना यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत अहवालांमधील विसंगत आकडेवारीकडे लक्ष वेधून घेतले. प्रशासनाच्या या चुकीच्या आकडेवारीवरून नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता वर्तवत ही छपाईतील चूक त्वरीत सुधारली जावी अशी मागणी हरकतीच्या मुद्द्याद्वारे केली आहे.

तिवाना यांनी महापालिकेच्यावतीने पाणी साठ्याबाबत

०३ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या अहवालातील आकडेवारी समितीपुढे मांडली. त्यात भातसा धरणातील उपयुक्त पाणीसाठा ९८.१३ टक्के म्हणजे ७,०३,५९४ दशलक्ष लीटर दर्शवण्यात आला होता. तर १० ऑक्टोबर २०२६ रोजी संपलेल्या आठवड्याच्या अहवालानुसार अवघ्या एका आठवड्यात भातसा धरणातील उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी थेट ६९.२९ टक्के एवढी दर्शवली अशी दर्शवली आहे.

अवघ्या एका आठवड्याच्या कालावधीत झालेली ही प्रचंड तफावत आणि घसरण अतिशय भीतीदायक व संशयास्पद आहे. यावरून मुंबईकरांच्या मनात तीव्र भीती व संभ्रमाचे वातावरण निर्माण होईल असे तिवाना यांनी स्पष्ट करत "ही केवळ छपाईची चूक आहे की धरणातून मोठी पाणीगळती होत आहे, अथवा प्रशासनाकडून पाणीसाठ्याची खरी माहिती लपवली जात आहे असा सवाल प्रशासनाला केला. प्रशासनाने यावर तात्काळ स्पष्टीकरण देऊन मुंबईकरांना आणि स्थायी समितीला योग्य व अचूक माहिती द्यावी, अशी जोरदार मागणी त्यांनी केली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >