सात महिन्यांपासून सासवड नगरपालिकेतल्या कर्मचाऱ्यांना वेतनच नाही, कामगार मंत्र्यांनी दोषींवर कारवाईचे दिले निर्देश

सात महिन्यांपासून सासवड नगरपालिकेतल्या 230 कर्मचाऱ्यांना वेतनच नसल्यामुळे कामगार मंत्र्यांनी दोषींवर कारवाईचे निर्देश दिले आहेत. शिवाय, संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे देखील निर्देश त्यांनी दिले आहेत.

मुंबई: सासवड नगरपालिकेतील 230 कंत्राटी कामगारांना किमान वेतन, भविष्य निर्वाह निधी (पीएफ), कर्मचारी राज्य विमा (ईएसआय) आणि अन्य वैधानिक लाभ मिळत आहेत किंवा नाहीत, याची विशेष चौकशी करण्याचे निर्देश कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी दिले आहेत. सोबतच त्यांचे सात महिन्यांचे थकीत वेतन तातडीने देण्याची सोय सुद्धा करण्यात यावी निर्देश कामगार मंत्र्यांनी आज दिले आहे.



आज कामगार आयुक्त कार्यालयात झालेल्या आयोजित बैठकीमध्ये कामगार मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना सासवड नगरपालिकेतील कंत्राटी कामगारांचे वेतन करण्याबद्दलचे निर्देश दिले आहेत. शिवाय, सर्व कंत्राटी कर्माचाऱ्यांना सॅलरी देऊन दोषींवर कारवाई करण्याचे निर्देशही कामगार मंत्र्यांनी झालेल्या बैठकीमध्ये दिली आहे. कामगार आयुक्त कार्यालयात झालेल्या नियोजित बैठकीत आमदार विजय शिवतारे, कामगार विभागाच्या अपर मुख्य सचिव आय ए कुंदन, उपसचिव दीपक पोकळे, उपसचिव स्वप्नील कापडणीस उपस्थित होते.


 


दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश दिल्यानंतर कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, " सासवड नगरपालिकेत एकूण 230 कंत्राटी कामगार गेल्या 28 वर्षांपासून सेवा बजावत आहेत. त्यांच्या कामाचे स्वरूप नियमित असूनही या कामगारांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेतलेले नाही. नगरपालिकेने मंजूर केलेल्या वेतनातून वेगवेगळ्या कारणांनी तब्बल 30 ते 40 टक्के सॅलरीतली रक्कम कपात केली जात असल्याची तक्रार कामगारांनी केली आहे. याच आधारावर दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे."



2022 पासून अनेक कामगारांचा पीएफ नियमितपणे जमा झालेला नाही. शिवाय, ईएसआय, किमान वेतन, साप्ताहिक सुटी, वैधानिक लाभ मिळत नसल्याच्या ही तक्रारी आलेले आहेत. नगरपालिका ही मूळ नियोक्ता संस्था असल्यामुळे संबंधित ठेकेदारांकडून कामगार कायद्यांचे पालन होत आहे किंवा नाही, याची तपासणी करणे ही नगरपालिकेची कायदेशीर जबाबदारी आहे. त्यामुळे सासवड नगरपालिकेकडून या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल तातडीने मागवावा, अशा सूचनाही कामगार मंत्री ॲड फुंडकर यांनी दिल्या.

Comments
Add Comment

Ashish Shelar: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे भाजपला अमान्य, मंत्री आशिष शेलार यांचं वक्तव्य

मुंबई: मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी माध्यमांसमोर ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपची सत्यता तपासून तिची सखोल चौकशी

सौर ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून पशुसंवर्धन विभागाचे वीज बिल शून्यावर आणणार, मंत्री पंकजा मुंडे यांचा शब्द

मुंबई: सौर ऊर्जेचा प्रभावी वापर वाढविण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने पावले उचलली आहेत. त्याचाच भाग म्हणून

Saptashrungi Devi: सप्तशृंग गडावर खासगी वाहनांना प्रवेशबंदी; कोजागिरी पौर्णिमेनिमित्त प्रशासनाचा निर्णय, चेक करा एका क्लिकवर

नाशिक: नाशिकमधील सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रातील काना कोपऱ्यातून लाखो भाविक

मनोज जरांगे पाटील यांच्याकडील क्लिपची एसआयटीमार्फत सखोल चौकशी व्हावी; भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांची मागणी

'एआय' च्या जमान्यात बनावट ऑडिओ क्लिप्स आणि व्हिडिओ वेगवेगळ्या स्वरूपात बाजारात येत असल्याने मनोज जरांगे पाटील

महाराष्ट्रातील शाळांना 'या' तारखेपासून दिवाळीची सुट्टी; शिक्षण विभागाचे परिपत्रक जाहीर

राज्य सरकारच्या माध्यमिक शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील शाळांच्या सत्रांची रचना आणि विविध

Simhastha Kumbhmela 2027: कुंभमेळ्याआधी त्र्यंबकेश्वरमध्ये मोठी तयारी, ज्योतिर्लिंग मंदिर परिसरातील रस्ता दुरुस्तीला NMA ची मंजुरी

नाशिक: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरच्या श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर