Simhastha Kumbhmela 2027: कुंभमेळ्याआधी त्र्यंबकेश्वरमध्ये मोठी तयारी, ज्योतिर्लिंग मंदिर परिसरातील रस्ता दुरुस्तीला NMA ची मंजुरी

Trimbakeshwar Temple: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरच्या श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर परिसरातील रस्ता दुरुस्तीच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे.

नाशिक: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरच्या श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर परिसरातील पायाभूत सुविधांच्या विकासकामांना गती मिळणार आहे. मंदिर परिसरातील रस्ता दुरुस्तीच्या कामाला राष्ट्रीय संस्मारक प्राधिकरणाने (National Monument Authority – NMA) मंजुरी दिली असल्याची माहिती, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे. मंदिर परिसरातील विकास कामांच्या माध्यमातून भाविकांकरिता मंदिर परिसरातील वाहतूक, सुरक्षितता आणि सुविधांच्या सुधारणेच्या दृष्टीने मंदिर प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.



त्र्यंबकेश्वर मंदिर आणि परिसरातील पायाभूत सुविधांच्या विकास कामांचा आढावा घेण्यासाठी गुरूवार 22 ऑक्टोबर रोजी, राष्ट्रीय संस्मारक प्राधिकरणाच्या माध्यमातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त, नाशिकचे जिल्हाधिकारी, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे अधिकारी तसेच संबंधित वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी सहभागी होते.


पायाभूत सुविधांच्या विकास कामांच्या आढावा बैठकीत, राष्ट्रीय संस्मारक प्राधिकरणाकडे सादर करण्यात आलेल्या मंदिर परिसरातील विकासकामांच्या चार प्रस्तावांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये रस्ता दुरुस्ती, अत्याधुनिक प्रतीक्षा कक्ष, शौचालय सुविधा, आच्छादित मार्ग आणि विधी भवन इमारतीची दुरुस्ती- नूतनीकरण या कामांचा समावेश होता.



विकास कामांविषयी झालेल्या सविस्तर चर्चेनंतर मंदिर परिसरातील रस्ता दुरुस्तीच्या कामाला तात्काळ मंजुरी देण्यात आली. त्यामुळे या कामाच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. नियोजित कामांमधून रस्त्यांची आवश्यक दुरुस्ती, रुंदीकरण व सुशोभीकरण करण्याच्या दृष्टीने पुढील कार्यवाही करता येणार आहे. यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांची वाहतूक अधिक सुलभ करण्यास मदत होणार आहे.


मंदिर परिसरातील भाविकांसाठी अत्याधुनिक प्रतीक्षा कक्ष आणि शौचालय सुविधा उपलब्ध करणे, आच्छादित मार्ग विकसित करणे तसेच विधि भवन इमारतीची दुरुस्ती आणि नूतनीकरण करणे या उर्वरित तीन प्रस्तावांवरही बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. या कामांसाठी आवश्यक तांत्रिक दस्तऐवज सादर केल्यानंतर पुढील अंतिम मंजुरी देण्यात येईल, असे राष्ट्रीय संस्मारक प्राधिकरणाकडून स्पष्ट करण्यात आले.


सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या अनुषंगाने त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील पायाभूत सुविधा सक्षम करणे, भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे आणि दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळणे यासाठी विविध विकासकामांचे नियोजन करण्यात येत आहे. रस्ता दुरुस्तीच्या कामाला मिळालेली मंजुरी या नियोजनातील महत्त्वाचा टप्पा असून, उर्वरित प्रस्तावांना अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर मंदिर परिसरातील सुविधांच्या विकासाला आणखी गती मिळण्याची अपेक्षा असल्याचे जिल्हाधिकारी प्रसाद यांनी म्हटले आहे.

Comments
Add Comment

मनोज जरांगे पाटील यांच्याकडील क्लिपची एसआयटीमार्फत सखोल चौकशी व्हावी; भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांची मागणी

'एआय' च्या जमान्यात बनावट ऑडिओ क्लिप्स आणि व्हिडिओ वेगवेगळ्या स्वरूपात बाजारात येत असल्याने मनोज जरांगे पाटील

महाराष्ट्रातील शाळांना 'या' तारखेपासून दिवाळीची सुट्टी; शिक्षण विभागाचे परिपत्रक जाहीर

राज्य सरकारच्या माध्यमिक शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील शाळांच्या सत्रांची रचना आणि विविध

मुख्यमंत्री फडणवीसांचा जलप्रकल्पांवर भर; सौरऊर्जा आणि पाणी पुनर्वापराला प्राधान्य

महाराष्ट्रातील नागरी पायाभूत सुविधा आणि जलप्रकल्प आर्थिकदृष्ट्या सक्षम व दीर्घकालीन शाश्वत करण्यासाठी

विद्याविहार, शीव आणि गोरेगावमधील वाहतूक कोंडी फुटणार, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे लोकार्पण; ‘५९ मिनिटांत मुंबई’चे उद्दिष्ट दृष्टिपथात

मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या वेगवान विकासामुळे ‘५९ मिनिटांत मुंबई’ हे उद्दिष्ट साध्य

Devendra Fadnavis : वाढवण बंदरानजीक रासायनिक उद्योगांचे मोठे केंद्र उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई : जागतिक रासायनिक उत्पादन क्षेत्रात भारताला महत्त्वाचे स्थान मिळविण्याची संधी असून, संशोधन, आधुनिक

द्रौपदी मुर्मू यांना महाराष्ट्राच्या संस्कृतीची अनमोल भेट; काय आहे पैठणीचं वैशिष्ट्य?

नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी सुरु असताना, काल (२१ ऑक्टोबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि