IND vs NZ पहिल्या टी20 सामन्यात 225 धावांचा यशस्वी पाठलाग करून भारताने नोंदवले विक्रम, काय ते जाणून घ्या
न्यूझीलंडने पहिल्या टी20 सामन्यात विजयासाठी दिलेलं 225 धावांचं लक्ष्य भारताने 6 गडी गमवून गाठलं. या विजयासह भारताने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये ऐतिहासिक नोंद केली आहे. चला जाणून घेऊयात..
October 22, 2026 08:50 PM
IND vs NZ पहिल्या टी20 सामन्यात 225 धावांचा यशस्वी पाठलाग करून भारताने नोंदवले विक्रम, काय ते जाणून घ्या (Photo : @BCCI Twitter)
भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत पहिला विजय मिळवला आहे. यासह मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. खरं तर न्यूझीलंडने दिलेलं 225 धावांचं आव्हान कठीण होतं. पण भारताने 4 गडी आणि 2 चेंडू राखून हा विजय मिळवला. यासह टी20 क्रिकेटमध्ये ऐतिहासिक नोंद केली आहे. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट इतिहासातील भारताचा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग आहे. टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये न्यूझीलंडविरुद्ध कोणत्याही संघाने केलेला हा दुसरा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग आहे. यापूर्वी 2018 मध्ये ऑकलंड येथे ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडविरुद्ध 244 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. दरम्यान, भारताने 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध विशाखापट्टणममध्ये 209 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. त्यानंतर रायपूर्वी 2026 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध 209 धावांचं लक्ष्य गाठलं होतं.2019 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 208 धावा, 2009 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 207 धावा आणि 2020 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध 204 धावांचं लक्ष्य गाठलं होतं.
न्यूझीलंडची पराभवाची मालिका
न्यूझीलंड संघाने त्यांच्या मायभूमीत भारताविरुद्ध खेळलेल्या शेवटच्या 8 टी20 सामन्यांपैकी सात सामने गमावले आहेत. यात एकमेव अपवाद 2022 मधील नॅपियर येथील सामना होता. हा सामना डकवर्थ-लुईस नियमानुसार बरोबरीत सुटला होता.
नमन धीरच्या नावावर विक्रम
दुसरीकडे, टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करताना भारताकडून सातव्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना नमन धीरने केलेली नाबाद 42 धावांची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली आहे. यापूर्वी हा विक्रम इरफान पठाणच्या नावावर होता. त्याने श्रीलंकेविरुद्ध 2009 मध्ये नाबाद 33 धावांची खेळी केली होती.
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका होत आहे. या मालिकेत दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर 1-1 अशी स्थिती झाली आहे. पहिल्या ...
पहिल्याच चेंडूवर षटकार मारण्याचा संयुक्त विक्रम
या सामन्यात तीन फलंदाजांनी पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. यात न्यूझीलंडच्या डॅरिल मिचेल, बेव्हन जेकॉब्स आणि भारताच्या अभिषेक शर्माचा समावेश आहे. या तिघांनी अगदी पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. पुरुषांच्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात अशी कामगिरी होण्याची ही केवळ पाचवी वेळ असून हा एक संयुक्त विक्रम ठरला आहे. पूर्ण सदस्य देशांमध्ये याआधी फक्त 2018 मध्ये हॅमिल्टन येथे न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड सामन्यात अशी कामगिरी झाली होती.