
मुंबई (विशेष प्रतिनिधी)
मुंबईतील वाढत्या प्रदुषणाच्या मुद्यावरून पुन्हा एकदा तीव्र चिंता व्यक्त केली जात असतानाच आता अंधेरी आणि माहिममध्ये बांधकामांमध्ये कोणत्याही प्रकारे नियमांचे पालन केली जात नसल्याची तक्रारच नगरसेवकांनी स्थायी समितीच्या बैठकीत मांडली. इमारत पुनर्विकास प्रकल्पांमध्ये जुने इमारत बांधकाम पाडताना कोणत्याही प्रकारची पर्यावरणाच्यादृष्टीकोनातून काळजी घेतली जात नाही. परिणामी धुळीचे साम्राज्य पसरले जात असल्याची नाराजीच नगरसेवकांनी मांडली आहे.
मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत उबाठाचे शैलेश फणसे यांनी अंधेरी पश्चिम येथील बांधकाम व्यावसायिक पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून बनवलेल्या नियमांचे पालन करत नसल्याचे सांगितले. लोखंडवाला परिसरात जुने इमारत बांधकाम पाडताना कोणत्याही प्रकारची काळजी न घेतल्याने परिसरात धुळीचे साम्राज्य पसरलेले आहे. या धुळीमुळे समोरचा माणूस दिसत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे यासाठी पुन्हा एकदा नियमावली बनवा किंवा कडक करावा अशी मागणी फणसे यांनी करून एका बाजुला पर्यावरणाच्या दृष्टीने धुळ रोखण्यासाठी रस्ते पाण्याने धुण्यासाठीचा टँकरचा प्रस्ताव दप्तरी दाखल केला. पण दुसरीकडे अशाप्रकारे धुळीचे साम्राज्य तयार होते आहे आणि त्याकडे आपल्या प्रशासनाचे लक्ष नाही. त्यामुळे यावर कारवाई होत नाही तोवर हरकतीचा मुद्दा राखून ठेवण्याची मागणी फणसे यांनी केली.
मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत भातसा धरणातील पाणीसाठ्याच्या आकडेवारीतील गंभीर तफावत स्थायी ...
तर त्यानंतर भाजपच्या शीतल गंभीर यांनी माटुंगा पश्चिम येथील टी.एच.कटारिया मार्गावर जुनी इमारत पाडण्याचे काम होत आहे. हे पाडकाम करताना कोणत्याही प्रकारे पाणी शिंपडले जात नाही किंवा परिसर बंदिस्त केला जात नाही. त्यानंतर महापालिकेला याबाबत कल्पना दिल्यानंतर काम थांबवले गेले. पण अधिकारी जाताच पुन्हा एकदा कामाला सुरुवात झाली. त्यामुळे यावर कारवाई होत नाही तोपर्यंत हा मुद्दा राखून ठेवावा अशी मागणी केली.
यावर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी दोन्ही हरकतीचे मुद्दे राखून ठेवत रस्ते धुळीने माखलेले असतात म्हणून धुळमुक्त करण्यासाठी टँकरच्या पाण्याने धुण्यासाठीचा प्रस्ताव दप्तरी दाखल केला. पण दुसरीकडे प्रशासन जर अशा बाबींकडे पाहत नसेल तर ही बाब गंभीर आहे. त्यामुळे यासाठी कठोर नियम बनवण्याची गरज आहे. त्याकरता नवीन नियमावली बनवण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला शिंदे यांनी दिले.





