सूर्याचे नक्षत्र परिवर्तन; 24 ऑक्टोबरपासून 'या' चार राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ

24 ऑक्टोबर रोजी सूर्य राहूच्या स्वाती नक्षत्रात प्रवेश करणार असून 6 नोव्हेंबरपर्यंत याच नक्षत्रात राहील. मिथुन, तूळ, वृश्चिक आणि कुंभ या चार राशींसाठी हा काळ आर्थिक लाभाचा मानला जात आहे.

मुंबई: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे नक्षत्र परिवर्तन अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. 24 ऑक्टोबर 2026 रोजी सूर्यदेवाने आपले नक्षत्र बदलले असून त्यांनी चित्रा नक्षत्रातून बाहेर पडून राहूच्या अधिपत्याखालील 'स्वाती नक्षत्रात' प्रवेश केला आहे. या नक्षत्रात सूर्य 6 नोव्हेंबरपर्यंत मुक्कामाला असेल आणि त्यानंतर विशाखा नक्षत्रात प्रवेश करेल. विशेष म्हणजे, याच दिवशी शुक्र ग्रहाचेदेखील नक्षत्र परिवर्तन होत असल्याने या खगोलीय बदलाचे महत्त्व अधिक वाढले आहे.


ज्योतिषीय अभ्यासानुसार, सूर्याचे हे नक्षत्र परिवर्तन सर्व 12 राशींच्या जातकांवर कमी-अधिक प्रमाणात प्रभाव टाकणार आहे. मात्र, या बदलाचा सर्वाधिक शुभ प्रभाव चार राशींच्या लोकांवर पडणार असून, त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत लाभदायक ठरणार आहे.



1. मिथुन रास


सूर्याच्या या नक्षत्र बदलामुळे मिथुन राशीच्या लोकांच्या आत्मविश्वासात मोठी वाढ होईल. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा काळ खूप अनुकूल असून, कार्यक्षेत्रात त्यांच्या नेतृत्वाची प्रशंसा होईल. बऱ्याच दिवसांपासून अडकलेली कामे मार्गी लागतील. या काळात आर्थिक लाभाचे योग जुळून येत असून, उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात.



2. तूळ रास


तूळ राशीच्या जातकांसाठी हा काळ अत्यंत भाग्यशाली ठरणार आहे. प्रत्येक कामात नशिबाची भक्कम साथ लाभेल. रखडलेली आणि अपूर्ण राहिलेली कामे पुन्हा वेगाने पूर्ण होतील. व्यापारी वर्गाला मोठा आर्थिक फायदा मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात सुख-शांति नांदेल आणि मानसिक शांतता लाभेल.



3. वृश्चिक रास


वृश्चिक राशीच्या व्यक्तींच्या व्यावसायिक आयुष्यात मोठी प्रगती पाहायला मिळेल. कामाच्या ठिकाणी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचे आणि कष्टांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक केले जाईल. नोकरीत बढती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची दाट शक्यता आहे. व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी हा काळ अत्यंत उपयुक्त ठरेल.



4. कुंभ रास


कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ यश आणि समृद्धी घेऊन आला आहे. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात सुरू असलेल्या समस्या दूर होण्यास मदत होईल. रखडलेले पैसे परत मिळाल्यामुळे आर्थिक चणचण भासणार नाही.


(टीप: ज्योतिषीय माहिती केवळ सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. कोणत्याही विशिष्ट निर्णयासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेणे उचित ठरते. यातील कोणत्याही दाव्यांची अथवा तथ्यांची पुष्टी 'प्रहार' करत नाही.)

Comments
Add Comment

साखर आयातीस केंद्राकडून दोन महिन्यांची मुदतवाढ; ३१ डिसेंबरपर्यंत शून्य शुल्कात आयात

परकीय व्यापार महासंचालनालयाने (DGFT) दहा लाख मेट्रिक टन कच्च्या साखरेच्या शुल्कमुक्त आयातीसाठीची मुदत दोन

CA Inter Result 2026 : महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा ! CA इंटरमिजिएट परीक्षेत नाशिकची साक्षी आणि मुंबईचा नील शहा यांची बाजी

CA Inter Result 2026 : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) तर्फे सप्टेंबर २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या सीए

CA Intermediate : CA इंटरमिजिएट सप्टेंबर 2026 चा निकाल आज जाहीर होणार? विद्यार्थ्यांचे लक्ष अधिकृत वेबसाइटकडे

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) च्या CA इंटरमिजिएट सप्टेंबर 2026 परीक्षेच्या निकालाची विद्यार्थी

Bengaluru : विधान सौधमध्ये बॉम्बस्फोटाचा बनावट AI व्हिडिओ व्हायरल; बिहारमधील मजुराला अटक

बंगळूर: कर्नाटकातील बंगळूर येथील विधान सौधमध्ये बॉम्बस्फोट झाल्याचा दावा करणारा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI)

Reliance Industries : मार्को रूबियो आणि सर्जियो गोर यांची जामनगर रिफायनरीला भेट; ऊर्जा आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भागीदारीवर चर्चा

Business News: अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रूबियो आणि भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांनी गुजरातमधील

SBI च्या डेटा लीकवर बँकेची पोस्ट; खात्यातील पैसे सुरक्षित असल्याची दिली ग्वाही!

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या ३,८९७ ग्राहकांची वैयक्तिक माहिती डार्क वेबवर उघड झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला