जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक लॅब आणि सायबर सेलकडून चौकशी व्हावी - मंत्री उदय सामंत यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे मागणी

मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांसमोर ऐकवलेली ऑडिओ क्लिप गंभीर असून मराठा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या या ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक आणि सायबर सेलकडून चौकशी व्हावी, अशी मागणी मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. या क्लिपमधील चर्चा करणाऱ्या व्यक्ती भाजप पक्षाशी संबधित असून त्यांच्या आवाजाचे नमुने फॉरेन्सिक लॅबकडे पाठवून त्याचे सत्य समोर आले पाहिजे. ही क्लिप म्हणजे एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या बदनामीचे षडयंत्र असून त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे, असे मंत्री सामंत यांनी म्हटले आहे. कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


मंत्री सामंत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाचे आंदोलन चांगल्या पद्धतीने हाताळले होते, त्यांनी मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतली होती, मात्र त्यांच्याबद्दल बदनामीकारक वक्तव्य या पूर्ण आडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळतात. या ऑडिओमध्ये भाजपच्या सोशल मीडियाशी संबधित श्वेता शालिनी, आमदार अतुल भातखळकर, युट्यूबर सुशील कुलकर्णी यांच्यासारखा आवाज आहे. या ऑडिओ क्लिपमधून समाजा-समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. ही ऑडिओ क्लिप कोणी रेकॉर्ड केली, कशासाठी व्हायरल केली व त्यात मराठा समाजाचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न होता का, याची चौकशी केली गेली पाहिजे, असे मंत्री सामंत म्हणाले.



ते पुढे म्हणाले की, यात काही संबंध नसताना खा. श्रीकांत शिंदे यांचा उल्लेख करण्यात आला. श्रीकांत शिंदे यांचा उल्लेख केल्यानंतर एकनाथ शिंदे बदनाम होतील, शिवसेना बदनाम होईल, अशा प्रकारचे षडयंत्र ऐकायला मिळते, हे दुर्देवी आणि गंभीर आहे, असे मंत्री सामंत म्हणाले. या ऑडिओ क्लिपमध्ये श्रीकांत शिंदे यांनी ५०० कोटी रुपये जरांगे पाटील यांना दिले, असे वक्तव्य भाजपशी संबधित असलेल्या श्वेता शालिनी या महिलेने केले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा देण्याचे काम खासदार शिंदे यांनी केले, मात्र त्यांचीही बदनामी करण्याचा प्रयत्न या क्लिपमध्ये झालाय. खासदार शिंदेंचा उल्लेख करणाऱ्या महिलेने याचे पुरावे सादर केले पाहिजेत, अशी मागणी मंत्री सामंत यांनी केली आहे. क्लिपमध्ये जे कोणी बोललेत त्यांचा आवाज खरा की खोटा यासाठी क्लिप फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवून त्याचे सत्य जनतेसमोर आले पाहिजे. त्यांचा आवाज खरा असेल तर त्यांच्यावर काय कारवाई करणार हे भारतीय जनता पक्षाने स्पष्ट केले पाहिजे, असे मंत्री सामंत म्हणाले.


एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजासाठी चांगल काम करत असताना मराठा समाजाविरोधात षडयंत्र करणे हे योग्य आहे का, महायुतीमध्ये शिवसेना आणि मराठा समाजात जाणीवपूर्वक दुही निर्माण करण्याचा कोणी प्रयत्न करतेय का, याचा खुलासा संबधित यंत्रणेकडून होणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. हे प्रकरण गंभीर असून पोलीस, सायबर सेल, फॉरेन्सिक विभाग आणि पक्षाच्या स्तरावर या ऑडिओ क्लिपची चौकशी होणे आवश्यक आहे, असे मंत्री सामंत यांनी म्हटले आहे.

Comments
Add Comment

हरभजन सिंगचा खळबळजनक गौप्यस्फोट; 'तो' भारतीय क्रिकेटचा सर्वात काळा काळ, ग्रेग चॅपेलने...

भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंगने ग्रेग चॅपेल यांच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या

Vehicle Registrations: वाहन खरेदीलाही दुष्काळाचा फटका; पुणे आघाडीवर, मुंबईत किती वाहनांची नोंदणी किती?

मुंबई: साडेतीन मुहूर्तापैकी एक असणाऱ्या दसरा सण अलीकडेच महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात साजरा केला. दसरा सणाच्या

Attack On Saudi Airport: सौदी अरेबियातील विमानतळावर हल्ला; भारतीयासह दोघांचा मृत्यू, 8 जण जखमी

बुधवारी (21 ऑक्टोबर) संध्याकाळी सौदी अरेबियातील दम्माम येथील विमानतळावर झालेल्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला

IND vs NZ T20: संजू सॅमसनचा न्यूझीलंडमध्ये झंझावात, अवघ्या 23 चेंडूत अर्धशतक ठोकलं; पण चौथ्यांदा...

[caption id="attachment_1068346" align="aligncenter" width="800"] भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या

IND vs NZ 1st T20: नितीश कुमार रेड्डीचा मोठा गोंधळ! फ्री-हिटवर झेल टिपून साजरा केला जल्लोष, नंतर जी चूक लक्षात आली...

क्राइस्टचर्च (न्यूझीलंड) : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्यात एक अतिशय रंजक आणि हसण्यावारी

CA Inter Result 2026 : महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा ! CA इंटरमिजिएट परीक्षेत नाशिकची साक्षी आणि मुंबईचा नील शहा यांची बाजी

CA Inter Result 2026 : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) तर्फे सप्टेंबर २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या सीए