एसटी बसस्थानकं चकाचक ठेवण्याची जबाबदारी विभाग नियंत्रकांचीच; अस्वच्छतेवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा स्पष्ट इशारा

एसटी बसस्थानकांवरील प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली असून, हलगर्जीपणा आढळल्यास थेट विभाग नियंत्रकांना जबाबदार धरण्याचा सज्जड इशारा दिला आहे.

मुंबई: एसटी बसस्थानकांवरील प्रसाधनगृहांची स्वच्छता राखण्यात हलगर्जीपणा झाल्यास संबंधित विभाग नियंत्रकांना थेट जबाबदार धरले जाईल, असा स्पष्ट इशारा परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. प्रवाशांना स्वच्छ, निरोगी आणि आरोग्यदायी प्रसाधनगृहे उपलब्ध करून देणे ही एसटी महामंडळाची मूलभूत जबाबदारी असून, त्यात कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नसल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.



अधिकाऱ्यांची हयगय खपवून घेणार नाही


एसटी महामंडळाच्या मुख्यालयात आयोजित स्वच्छता आढावा बैठकीत मंत्री सरनाईक बोलत होते. यावेळी महामंडळाचे सर्व विभागप्रमुख, प्रादेशिक व्यवस्थापक आणि विभाग नियंत्रक उपस्थित होते. सर्वसामान्य प्रवाशांकडून स्वच्छता अधिभार आकारला जात असताना, त्याबदल्यात त्यांना किमान स्वच्छतेच्या सुविधा मिळणे अपेक्षित आहे. बसस्थानकांवरील प्रसाधनगृहे अस्वच्छ असतील, तर त्याचा थेट परिणाम एसटीच्या प्रतिमेवर होतो. त्यामुळे स्वच्छतेच्या बाबतीत कोणतीही कुचराई चालणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.



कंत्राटदारांवरच मदार नाही, अधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष ठेवावे


बसस्थानकांवरील प्रसाधनगृहांची नियमित तपासणी करावी आणि संबंधित कंत्राटदार संस्थांकडून करारानुसार योग्य प्रकारे स्वच्छता करून घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले. केवळ कंत्राटदारांवर जबाबदारी ढकलून चालणार नाही, तर संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील स्वच्छतेवर स्वतः लक्ष ठेवणे आवश्यक आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. प्रवाशांना सुरक्षित आणि सुखकर प्रवासासोबतच स्वच्छ परिसर देणे प्रशासनाची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.

Comments
Add Comment

पूर्व महाराष्ट्राच्या विकासाला मोठी चालना; पायाभूत प्रकल्पांसाठी 6.17 कोटी मेट्रिक टन राखेच्या वापराचा ऐतिहासिक सामंजस्य करार

मुंबई : राज्यातील पर्यावरण संवर्धनाला हातभार लावत पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण

सामायिक सातबारा जमीन विक्रीबाबत राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय, नेमक काय ते वाचा..

मुंबई: महाराष्ट्रात सामाईक नावे असलेल्या 7/12 जमिनींच्या हिस्से विक्रीवरून सहहिस्सेदारांमध्ये निर्माण होणारे

Maharashtra Weather News : महाराष्ट्रात ऑक्टोबरमध्येही उकाडा कायम; मुंबईसह उत्तर महाराष्ट्रात दमट हवामानाचा त्रास

M

Ravan Dahan 2026 : आतषबाजीने आसमंत उजळला; ढोल-ताशांचा निनाद, घोड्यांचा ठेका अन्‌ नेत्रदीपक आतषबाजी

अहिल्यानगर (प्रतिनिधी) : विजयादशमी निमित्त एमआयडीसी नवनागापूर येथील श्री रेणुकामाता देवस्थान ट्रस्टच्या वतीने

NMC MBBS Rules : MBBS विद्यार्थ्यांना दिलासा! प्रथम वर्षासाठी अतिरिक्त परीक्षेची संधी, कोणाला मिळणार लाभ?

नाशिक: राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या हिताचा मोठा निर्णय घेत, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने

Water Shortage: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईचे गावनिहाय कृती आराखडे 25 ऑक्टोबरपर्यंत सादर करा; पाणीपुरवठा मंत्र्यांचे निर्देश

मुंबई : नागपूर, अमरावती आणि कोकण विभागांतील संभाव्य पाणीटंचाईच्या सर्व टप्प्यांचे वस्तुनिष्ठ व गावनिहाय कृती