ठाणे: कल्याण- कसारा मार्गावरील तिसऱ्या मार्गिकेच्या कामात अडथळा ठरत असलेल्या 110 kv हाय- टेन्शन टॉवर्स हटवण्याच्या कामासाठी रात्रकालीन मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. आसनगाव आणि आटगाव स्थानकांदरम्यानच्या 'अप' आणि 'डाऊन' ईशान्य मार्गिकांवर रात्रकालीन विशेष मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. येत्या 24 ऑक्टोबर आणि 25 ऑक्टोबरच्या मध्यरात्री 02.10 ते 03.55 वाजेपर्यंत वासिंद आणि आटगाव स्थानकांदरम्यान 'अप' आणि 'डाऊन' मार्गासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. रात्रकालीनच्या ब्लॉकच्या काळात, अनेक लोकल सेवा आणि मेल-एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून, कल्याण- कसारा मार्गावरील तिसऱ्या मार्गिकेच्या कामात अडथळा ठरत असलेल्या 110 kv हाय- टेन्शन टॉवर्स हटवण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. वासिंद ते आठगाव स्थानकादरम्यान, मध्यरात्री 02.10 ते 03.55 वाजेपर्यंत 'अप' आणि 'डाऊन' ईशान्य मार्गिकांवर रात्रकालीन विशेष मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मुंबई सीएसएमटी स्थानकावरून सुटणारी मध्यरात्री 12.08 वाजता सुटणारी मुंबई सीएसएमटी- कसारा उपनगरीय रेल्वे सेवा टिटवाळा स्थानकापर्यंतच चालवली जाणार आहे. रात्रीच्या वेळेतील अनेक एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल केला जाणार आहे. त्यामुळे जर तुम्ही रात्रीच्या वेळात प्रवास करण्याच्या विचारात असाल, तर एकदा हे टाईमटेबल नक्कीच वाचा.
Mumbai News: अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराच्या प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच, आता बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या मुंबईतील ‘जलसा’ बंगल्याला ...
ब्लॉकमुळे मेल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या नियमात होणारे बदल
- 02139 डाऊन मुंबई सीएसएमटी- नागपूर विशेष गाडी खडवली स्थानकाजवळ 02:00 ते 03:55 या वेळेमध्ये थांबवण्यात येणार आहे.
- 11044 अप बलिया दादर एक्सप्रेस आणि 11048 अप गोरखपुर- दादर एक्सप्रेस या गाड्या आटगाव स्थानकाजवळ 02:10 ते 03:55 या वेळेत थांबवण्यात येणार आहे. त्यामुळे पुढे या सर्व एक्स्प्रेस 1 तास 45 मिनिटे उशिराने पोहोचतील.
- 12102 अप शालीमार लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेसला खर्डी स्थानकावर 02:10 ते 03:50 या वेळेमध्ये थांबवण्यात येणार आहे. त्यामुळे पुढे ही एक्स्प्रेस 1 तास 40 मिनिटे उशिरा पोहोचेल.
- 18030 अप शालीमार लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेसला इगतपुरी स्थानकावर 01:35 ते 03:10 या वेळेमध्ये थांबवण्यात येणार आहे. त्यामुळे पुढे ही एक्स्प्रेस 1 तास 35 मिनिटे उशिरा पोहोचेल.
- 12810 अप हावडा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेसला इगतपुरी स्थानकावर 01:45 ते 03:15 या वेळेमध्ये थांबवण्यात येणार आहे. त्यामुळे पुढे ही एक्स्प्रेस 1 तास 30 मिनिटे उशिरा पोहोचेल.
मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईला जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा असलेले आधुनिक आणि भविष्यासाठी सज्ज महानगर बनविण्याच्या दृष्टीने रस्ते, किनारी ...
भुसावळ विभागामध्ये पुढील गाड्या वेळेप्रमाणे चालवण्यात येणार
- 11032 अलीपुरद्वार पनवेल अमृत भारत एक्सप्रेस
- 11203 नागपूर मडगाव एक्सप्रेस
- 12132 साईनगर शिर्डी दादर एक्सप्रेस
- 20104 गोरखपुर लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
- 11002 बल्लारशाह छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस
- 12152 शालीमार लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
- 12174 प्रतापगड लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
- 12545 रक्सौल लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
- 02140 नागपूर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष गाडी
- 01052 बनारस लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी
- 01144 दानापुर लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी
- 05585 सहरसा लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी
मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयातील औषधाचे दुकान चालवण्याची जागा पुन्हा एकदा निविदा न मागवता परस्पर पाच वर्षांनी करार ...
एकापाठोपाठ मेल- एक्स्प्रेस असल्यामुळे 'या' मागील एक्स्प्रेसला विलंब होण्याची शक्यता आहे.
- 22358 अप गया लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
- 12112 अप अमरावती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस
- 12106 अप छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गोंदिया एक्सप्रेस
- 12618 अप हजरत निजामुद्दीन एर्नाकुलम एक्सप्रेस
याव्यतिरिक्त, जर इतर कोणत्याही मेल/एक्सप्रेस किंवा पॅसेंजर गाड्या उशिरा चालवण्यात येत असतील, तर त्यांचे परिचालन सोयीनुसार नियंत्रित केले जाईल किंवा त्यांना शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल. पायाभूत सुविधांची देखभाल आणि सुरक्षिततेसाठी हा देखभाल ब्लॉक घेणे आवश्यक आहे. यामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे.