Mumbai- Nagpur Holiday Special Train: मुंबई- नागपूर प्रवशांना रेल्वेचा दिलासा, विशेष गाड्यांच्या सेवांमध्ये नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत वाढ

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने मुंबई सीएसएमटी- नागपूर मार्गावर एकमार्गि विशेष गाडी आणि अधिसूचित विशेष गाड्यांच्या सेवांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये कोणत्या एक्स्प्रेसचा समावेश आहे, जाणून घेऊया...

मुंबई: मुंबई- नागपूर मार्गावर एकमार्गी विशेष गाडीसाठी होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून मुंबई सीएसएमटी ते नागपूर स्थानकादरम्यान एकमार्गी विशेष गाडी चालवण्यासाठी विशेष गाड्यांच्या सेवांमध्ये नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. याचा तपशील रेल्वेकडून पुढीलप्रमाणे देण्यात आला आहे.


गाडी क्रमांक 01157 एकमार्गी विशेष गाडी ही मुंबई सीएसएमटी स्थानकावरून दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी मध्यरात्री 12.25 वाजता सुटेल आणि नागपूर स्थानकावर त्याच दिवशी दुपारी 03.30 वाजता पोहोचेल. ह्या एक्स्प्रेसचा पुन्हा परतीचा प्रवास नसेल. एकमार्गीच प्रवास ह्या एक्स्प्रेसचा असेल. ही विशेष एक्स्प्रेस, दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या प्रमुख स्थानकांवर ही एक्स्प्रेस थांबेल.


ह्या एक्स्प्रेससाठी रेल्वेकडून 4 सेकंड क्लास एसी कोचेस, 8 थर्ड क्लास एसी कोचेस, 6 स्लीपर क्लास कोचेस आणि 2 जनरल सेकंड क्लास कोचेस सह गार्ड्स ब्रेक व्हॅन अशा कोचेसची संरचना करण्यात आली आहे. यामुळे मुंबई सीएसएमटी- नागपूर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता, मध्य रेल्वे अनेक विशेष एक्स्प्रेसच्या सेवांमध्ये विस्तार करण्यात येणार आहे. त्या सर्व विशेष एक्स्प्रेस सध्याचा मार्ग, वेळापत्रक, प्रवास- मार्ग, डब्ब्यांची संरचना, थांबे आणि भाडे दरांप्रमाणेच चालवण्यात येणार आहे.



26 नोव्हेंबर 2026 पर्यंत विस्तारित केलेल्या एक्स्प्रेस



  • गाडी क्रमांक 01105 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- लातूर एक्सप्रेस

  • गाडी क्रमांक 01106 लातूर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस

  • गाडी क्रमांक 01201 नागपूर- हडपसर एक्सप्रेस

  • गाडी क्रमांक 01417 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- कोल्हापूर एक्सप्रेस

  • गाडी क्रमांक 01418 कोल्हापूर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस


 


इतरत्र कालावधीत विस्तारित केलेल्या एक्स्प्रेस



  • गाडी क्रमांक 01403 पुणे- अमरावती एक्सप्रेस 24 नोव्हेंबर 2026 पर्यंत विस्तारित

  • गाडी क्रमांक 01404 अमरावती- पुणे एक्सप्रेस 25 नोव्हेंबर 2026 पर्यंत विस्तारित

  • गाडी क्रमांक 01202 हडपसर- नागपूर एक्सप्रेस 27 नोव्हेंबर 2026 पर्यंत विस्तारित

  • गाडी क्रमांक 01209 नागपूर- हडपसर एक्सप्रेस आणि गाडी क्रमांक 02139 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- नागपूर एक्सप्रेस 28 नोव्हेंबर 2026 पर्यंत विस्तारित

  • गाडी क्रमांक 01210 हडपसर- नागपूर एक्सप्रेस आणि गाडी क्रमांक 02140 नागपूर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस 29 नोव्हेंबर 2026 पर्यंत विस्तारित

  • गाडी क्रमांक 01451 कोल्हापूर- कलबुर्गी एक्सप्रेस आणि गाडी क्रमांक 01452 कलबुर्गी- कोल्हापूर एक्सप्रेस 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत विस्तारित




एकमार्गि विशेष गाडी क्रमांक 01157 आणि वरील सर्व विस्तारित विशेष गाड्यांचे आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर प्रवाशांना उपलब्ध आहे. अनारक्षित डब्यांचे तिकीट बुकिंग सामान्य दरांसह युटीएस प्रणालीद्वारे प्रवाशांना करता येईल. प्रवासी तिकिटे बुक करण्यासाठी 'रेलवन' ॲप देखील डाउनलोड करू शकतात. या विशेष गाड्यांच्या थांब्यांवरील सविस्तर वेळेसाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा 'एनटीईएस' ॲप डाउनलोड करा.
Comments
Add Comment

FDA Raids : राज्यभरात अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; 35 टनांहून अधिक असुरक्षित अन्नसाठा जप्त

मुंबई: अन्न व औषध प्रशासनाने (FDA) घेतलेल्या राज्यव्यापी विशेष तपासणी मोहिमेत अन्न सुरक्षेचे नियम पायदळी

Mumbai Local Megablock: प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! रविवारी मेगाब्लॉक; कधी, कुठे असेल? जाणून घ्या वेळापत्रक

मुंबई: प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. येत्या रविवारी अर्थात, 25 ऑक्टोबर 2026 रोजी मध्य रेल्वे आणि

Mumbai Local Update: रविवारी मुंबई लोकलचा प्रवास कसा असेल? दिवसा दिलासा, मध्यरात्री जम्बो ब्लॉक! जाणून घ्या वेळ

मुंबई: पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आगामी रविवार, 25 ऑक्टोबर 2026 रोजी

Kalyan- Kasara Megablock: कल्याण-कसारा विशेष ब्लॉकचा प्रवाशांना मनस्ताप, लोकलसह मेल- एक्स्प्रेस उशिराने धावणार; वाचा संपूर्ण वेळापत्रक

ठाणे: कल्याण- कसारा मार्गावरील तिसऱ्या मार्गिकेच्या कामात अडथळा ठरत असलेल्या 110 kv हाय- टेन्शन टॉवर्स हटवण्याच्या

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांचा ‘जलसा’ बंगला बॉम्बने उडवण्याची धमकी; मुंबईत खळबळ!

Mumbai News: अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराच्या प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच, आता बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन

Devendra Fadnavis : मुंबईकरांचे जीवन अधिक सुलभ करणे हेच पायाभूत सुविधा विकासाचे उद्दिष्ट, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईला जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा असलेले आधुनिक आणि भविष्यासाठी सज्ज महानगर