पाकिस्तानात ट्राय सीरिज मालिका सुरू आहे. या मालिकेत अंतिम फेरी गाठण्यासाठी पाकिस्तान, श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. या मालिकेतील तिसरा सामना श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यात पार पडला. हा सामना सर्वार्थाने विक्रमी ठरला. कारण या सामन्यात 859 धावा झाल्या. श्रीलंकेने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. इंग्लंडने या संधीचा फायदा घेतला आणि श्रीलंकने गोलंदाजांवर तुटून पडले. इंग्लंडने 50 षटकात 4 गडी गमवून 429 धावा केल्या आणि विजयासाठी 430 धावांचं आव्हान दिलं. इतकी मोठी धावसंख्या पाहून हा सामना इंग्लंडच जिंकेल असं क्रीडाप्रेमींना वाटलं. पण श्रीलंकने या सामन्यात मोठा उलटफेर केला. विजयासाठी दिलेल्या 430 धावा 8 गडी गमवून 49.5 षटकात पूर्ण केल्या.
श्रीलंका आणि इंग्लंड विक्रमी सामना
वनडे क्रिकेटच्या इतिहासात 400 पार धावा करणं आणि त्या गाठणं हे दुर्मिळ आहे. पण श्रीलंका आणि इंग्लंड सामन्यात हे पाहायला मिळालं. यात जोहान्सबर्ग (2006) आणि रावलपिंडी (2026) पार पडलेला सामना क्रीडाप्रेमींच्या स्मरणात आहे. क्रिकेटमधील सर्वोच्च यशस्वी पाठलागाचा विश्वविक्रम दक्षिण आफ्रिकेच्या नावावर आहे. दक्षिण अफ्रिकेने 2006 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 434 धावांचा यशस्वी पाठलाग करत 438 धावा केल्या होत्या. तर ऑक्टोबर 2026 मध्ये श्रीलंकेने इंग्लंडविरुद्ध 429 धावांचा यशस्वी पाठलाग या यादीत दुसरे स्थान मिळवले. भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध 2026 मध्ये 406 धावा गाठल्या होत्या. भारतीय संघ या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.
दोन्ही संघांची विक्रमी धावसंख्या
रावलपिंडीती श्रीलंका इंग्लंड सामना क्रिकेट इतिहासातील सर्वोच्च धावसंख्येच्या सामन्यांमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. यात दोन्ही संघांनी मिळून तब्बल 859 धावांचा पाऊस पाडला. या यादीत अव्वल स्थानी दक्षिण अफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया सामना असून 2006 मध्ये एकत्रित 872 धावा झाल्या होत्या.
भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत पहिला विजय मिळवला आहे. यासह मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. खरं तर न्यूझीलंडने दिलेलं 225 ...
विजयी संघातील फलंदाजापेक्षा जास्त धावा करूनही पराभव
विजयासाठी 400 पार धावा दिल्या असताना त्याचा यशस्वी पाठलाग क्वचित होतो. पण या धावांच्या महासंग्रामात अनेकदा फलंदाजांची खेळी वाया जाते. यात पराभूत संघातून सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या केल्याचा अनोखा विक्रम जन्माला येतो. यात इंग्लंडच्या हॅरी ब्रूकने 2026 मध्ये श्रीलंकेविरुद्ध केलेली 202 धावांची द्विशतकी खेळी अव्वल स्थानी आहे. तर 2009 मधील चार्ल्स कॉव्हेंट्रीच्या नाबाद 194 धावांच्या 16 वर्षे जुन्या रेकॉर्डला मागे टाकले आहे.