Namdev Dhasal Biopic: कवी नामदेव ढसाळ यांचा बायोपिक रूपेरी पडद्यावर येतोय, मुख्य भूमिकेत कोण?

"मी ढसाळ, नामदेव ढसाळ.... आणि मी एक दलित आहे!" ढसाळ चित्रपटाचा टीझर समोर ललित प्रभाकर दिसणार नवीन भूमिकेत

दलित पँथर आणि विद्रोही कवी नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित 'ढसाळ' या बहुप्रतीक्षित चरित्रपटाची घोषणा काही महिन्यांपूर्वी करण्यात आली होती. तेव्हापासूनच या सिनेमाच्याबाबतची चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. त्यातच या सिनेमात मुख्य भूमिकेत मराठमोळा अभिनेता ललित प्रभाकर मुख्य भूमिका साकारणार असल्याचं समजताच, सिनेमाबाबतची उत्सुकता आणखी वाढली. आत्ताच नामदेव ढसाळ यांच्या चरित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. यामध्ये ललित प्रभाकरच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्यानं साकारलेला ढसाळांचा बंडखोर आणि तडफदार आविष्कार खरंच रुपेरी पडद्यावर पाहण्याजोगा आहे.(LALIT PRABHAKAR)



उज्वल निकम यांच्या आयुष्यावर आधारित 'प्रहार' सिनेमातलया दहशतवादी कसाबची भूमिका ललित प्रभाकरने गाजवली. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तेवढी कामगिरी केली नसली तरी, या सिनेमात ललित प्रभाकरनेजी कसाबची भूमिका साकारली त्या भूमिकेला भरभरून प्रतिसाद मिळाला. ललितने साकारलेला कसाब तेवढीच चिड आणणारा आणि खरा वाटत होता. जरी त्या पात्राचा राग येत असला, तरीसुद्धा ती भूमिका पडद्यावर तितक्याच ताकदीने उभी करणाऱ्या ललित प्रभाकरला प्रेक्षकांनी कौतुकाची थाप मिळाली. मराठी चित्रपटसृष्टी पुरता मर्यादित न राहत त्याने हिंदी चित्रपटसृष्टी सुद्धा गाजवली. अशातच, आता विद्रोही कवी नामदेव ढसाळ यांच्या भूमिकेत ललित फारच कमाल दिसत आहे. गेलया काही दिवसांपासून वेगवेगळ्या भूमिकांमधून ललित प्रभाकरने सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडले.






नामदेव ढसाळ यांचा खेड्यातील महारवाड्यात झालेला जन्म, मुंबईतील कामाठीपुरामधील बालपण, त्यांच्या विद्रोही कविता, अन्यायाविरुद्ध उठवलेला आवाज आणि १९७० च्या दशकातील 'दलित पँथर' चळवळीचा धगधगता इतिहास यात दाखवला जाणार आहे. 'ढसाळ' सिनेमातून दलित पँथर चळवळीचे प्रणेते, विद्रोहीकवी पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या संघर्षमय आणि ज्वलंत जीवनप्रवासाचे वास्तववादी चित्रण पाहायला मिळणार आहे. संजय पांड्ये आणि दि बायोस्कोप फिल्म्स प्रस्तुत वरुणा मदनलाल राणा निर्मित सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन वरुणा राणा यांनी केलंय. तर, प्रताप गंगावणे यांनी या सिनेमाचे संवाद लिहिलेत. या चित्रपटाला देशातील दिग्गज दाक्षिणात्य संगीतकार इलैयाराजा यांचे संगीत लाभले आहे. हिंदी सिनेसृष्टितील प्रसिद्ध गीतकार इर्शाद कामील, तसेच मराठीतील गुरु ठाकूर यांनी या चित्रपटाची गाणी लिहिलेली आहेत. या सिनेमात ललित प्रभाकरचे नामदेव ढसाळायांचा रूपात रूपांतर प्रख्यात रंगभूषाकार श्रीकांत देसाई यांनी केले आहे.(DHASAL)

Comments
Add Comment

ब्रिटिश साम्राज्याला थेट ललकारणारा ‘फौजी’! प्रभासच्या वाढदिवसावर चाहत्यांना धमाकेदार ट्रीट

मुंबई: सुपरस्टार प्रभासच्या आगामी ‘फौजी’ या चित्रपटाचा टीझर रिलीज होताच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. ‘फाइल

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील सुरत कनेक्शन समोर; मुंबई क्राइम ब्रँचने 2 बंदुका, 10 काडतुसे जप्त

मुंबई: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबार प्रकरणामध्ये दिवसेंदिवस नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत.

Jay Bhanushali emotional reaction : जय भानुशालीची भावनिक प्रतिक्रिया; घटस्फोटानंतर पोटगी नाकारणाऱ्या माही विजसाठी म्हणाला, 'पैसा कधीच महत्त्वाचा नव्हता!'

मुंबई : टेलिव्हिजन विश्वातील अत्यंत लोकप्रिय जोडी असलेल्या जय भानुशाली (Jay bhanushali) आणि माही विज (Mahi Vij)  यांच्या

Udta Teer Movie: आयुष्मान-सारा यांच्या ‘उडता तीर’ची बॉक्स ऑफिसवर एन्ट्री; पहिल्या दिवशी किती कमाई?

आयुष्यमान खुराना आणि सारा अली खान यांच्या 'उडता तीर' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर माफक कमाई केली. या स्पाय कॉमेडीला

Rohit Shetty Bigg Boss 20 : रोहित शेट्टीचा पारा चढला! ‘ब्लैंकेट मसाज’ प्रकरणावरून स्काउट आणि लव गिलची स्टेजवरच कानउघडणी

मुंबई : सध्या ‘बिग बॉस २०’ (Bigg Boss 20) हा शो प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय बनला आहे. घरातील स्पर्धकांची बदलती समीकरणे आणि

Bagulbuva : मराठी चित्रपटसृष्टीत AI चा नवा प्रयोग! ‘बागुलबुवा’चा टायटल टीझर प्रदर्शित; अभिजीत खांडकेकर मुख्य भूमिकेत

Entertainment News: आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात AI चा वापर आता मनोरंजन क्षेत्रातही वेगाने वाढत आहे. चित्रपट निर्मितीमध्ये