बनावट ऑडिओ क्लिप तयार करणाऱ्या संजय राऊतांवर गुन्हा दाखल करण्यात यावा - भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांची मागणी

गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रात गाजत असलेली 500 कोटींची बनावट ऑडिओ क्लिप जनाब संजय राऊत यांच्या वॉर रूममध्ये एआयच्या सहाय्याने तयार करून छत्रपती संभाजीनगरातील एका व्यक्तीमार्फत मनोज जरांगे पाटील यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आल्याची धक्कादायक आणि गंभीर बाब समोर येत असल्याने संजय राऊत यांच्याविरोधात तातडीने गुन्हा दाखल करून त्यांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


संजय राऊत यांच्या टीममार्फत साधारणतः गेल्या दोन महिन्यांपासून ही ऑडिओ क्लिप तयार करण्याचे काम करण्यात येत होते. त्यासाठी या ऑडिओ क्लिपमध्ये आवाज असलेल्यांचे यूट्यूबवरील ऑडिओ सॅम्पल घेऊन ही ऑडिओ क्लिप बनवण्यात आली असण्याची दाट शक्यता आहे. भाजपा, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांचे नुकसान करायचे असल्याने या तिघांचीही प्रतिमा मलीन करण्यासाठी हे षडयंत्र संजय राऊत यांनी रचले. सामनाच्या संपादकीय कार्यालयात बसून कोणाचे डायलॉग काय असावेत, याची संपूर्ण स्क्रिप्ट स्वतः संजय राऊत यांनी लिहिली. त्या स्क्रिप्टनुसार, सुरुवातीला 100 कोटींचा उल्लेख करावा अशी त्यांची इच्छा होती. मात्र 500 कोटींची ऑडिओ क्लिप तयार केल्यास त्याचे गांभीर्य वाढेल आणि प्रसारमाध्यमांमध्ये तो मुद्दा चालेल, यासाठी संजय राऊत यांनी रकमेचा आकडा 100 कोटींऐवजी 500 कोटी केला. या सगळ्या ऑडिओ क्लिपचे कर्तेधर्ते, मास्टरमाइंड आणि सर्वेसर्वा स्वतः संजय राऊत आहेत. ही वॉर रूम वाशी परिसरात उभारण्यात आल्याची माहितीही माझ्याकडे आहे. या सगळ्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी एसआयटीची घोषणा केली असल्याने या संदर्भात संजय राऊत यांची तातडीने चौकशी करावी, अशी मागणी  बन यांनी केली.



बन पुढे म्हणाले, मनोज जरांगे पाटील, भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या संबंधात भांडण आणि बिघाड व्हावा आणि त्यांची बदनामी व्हावी, यासाठी हे सगळे षड्यंत्र राऊत यांच्यामार्फत रचण्यात आले आहे. कारण भाजपाची बदनामी करण्याची सुपारी संजय राऊत यांनी राहुल गांधी यांच्याकडून घेतली आहे. गेल्या काही दिवसांत संजय राऊत सातत्याने राहुल गांधी यांचा अजेंडा रेटण्याचा प्रयत्न करताहेत. या ऑडिओ क्लिपमुळे फक्त आणि फक्त उबाठा गट आणि काँग्रेस या दोनच पक्षांना फायदा होणार, हे संजय राऊत यांना चांगलेच माहिती होते. त्यामुळे त्यांनी राहुल गांधींकडूनही काही फंडिंग घेतले का, याचाही तपास होणे गरजेचे आहे.


मनोज जरांगे पाटील यांना या ऑडिओ क्लिपची सत्यता - असत्यता माहिती नसल्याने त्यांनीही या प्रकरणात एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली असल्याचे सांगत श्री. बन म्हणाले, मीही पहिल्या दिवशी या प्रकरणात चौकशीची मागणी केली होती. परंतु, आता जी माहिती मिळते आणि जी शक्यता दिसते, त्यानुसार संजय राऊत यांनी हे सगळे कुंभाड रचले असण्याची शक्यता आहे. मुळामध्ये ही ऑडिओ क्लिप खरी आहे की एआय जनरेटेड आहे, याचा शोध घेणे गरजेचे आहे. जोपर्यंत आपण एखाद्या संपादकाचे नाव टाकत नाही, तोपर्यंत मीडियामध्ये ते गांभीर्याने घेतले जाणार नाही म्हणून संजय राऊत यांनी स्क्रिप्ट लिहिताना एका संपादकाचाही जाणीवपूर्वक उल्लेख केला. ही ऑडिओ क्लिप बारकाईने ऐकली तर लक्षात येते की 500 कोटींचा उल्लेख येतो त्या ठिकाणी गॅप आहे. 100 कोटींऐवजी तिथे 500 कोटींचा उल्लेख केल्याने त्या ऑडिओ ब्रिजेसमध्ये गॅप आहे. कोणकोणत्या व्यक्तींचा वाद होऊ शकतो आणि कोणकोणत्या व्यक्तींची नावे यात आल्यानंतर त्याचा फायदा होऊ शकतो, क्लिपमध्ये कोणकोणते कॅरेक्टर असावेत, याची निवडही संजय राऊत यांच्या माध्यमातून करण्यात आल्याची माहितीही बन यांनी दिली.

Comments
Add Comment

लय भारी! लिओनेल मेस्सीला मिळाला असा प्रतिष्ठित सन्मान, पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

ओव्हिएदो (स्पेन): अर्जेंटिनाचा जागतिक फुटबॉलचा बादशहा लिओनेल मेस्सीचे स्पेनमध्ये अत्यंत जंगी आणि दिमाखदार

Nashik Kumbh Mela : नाशिकच्या गोदातीरावर उद्या घुमणार 501 शंखांचा निनाद, विश्वविक्रमासाठी शंखवादक सज्ज

Nashik Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये उद्या, रविवार (दि. २५ ऑक्टोबर)

Digital Agriculture Mission: देशात 11 कोटी फार्मर आयडी बनवण्याचे लक्ष्य पाच महिने आधीच पूर्ण

नवी दिल्ली: केंद्र सरकारने निर्धारित मुदतीपूर्वीच देशात 11 कोटी शेतकरी विशिष्ट डिजिटल ओळखपत्रे (Farmer ID) तयार

भुवनेश्वर कुमारच्या समोरच अर्शदीप सिंगने त्याचा विक्रम मोडला, नेमकं काय झालं? वाचा

[caption id="attachment_1068914" align="aligncenter" width="800"] न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात डावखुऱ्या वेगवा गोलंदाज अर्शदीप सिंगने

महिनाभर भारत फिरण्यासाठी नोकऱ्या सोडल्या! वंदे भारतच्या अनुभवाची सोशल मीडियावर चर्चा

आपल्या मैत्रिणीसोबत भारतभर प्रवास करणाऱ्या एका लिथुआनियन पर्यटकाने वंदे भारत एक्सप्रेसमधील आपला पहिला अनुभव

Philippines Air Crash: दोन लष्करी विमानांचा अपघात, चार वैमानिकांचा मृत्यू

मनिला: फिलिपिन्समध्ये एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक दुर्घटना घडली आहे. येथील हवाई तळावर नियमित प्रशिक्षण