वैभव सूर्यवंशीला आपली कार देणार नाही! रोहित शर्मा असं का म्हणाला? नेमकं कारण काय? जाणून घ्या
न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात वैभव सूर्यवंशीला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली. दुसरीकडे, रोहित शर्माने वैभवचं नाव घेत केलेलं विधान चर्चेत आहे. त्याला कार देणार नाही, असं त्याने स्पष्ट केलं. पण का तेही सांगितलं.
October 24, 2026 02:08 PM
वैभव सूर्यवंशीला आपली कार देणार नाही! रोहित शर्मा असं का म्हणाला? नेमकं कारण काय? जाणून घ्या (Photo: ANI)
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्मा आता फक्त वनडे क्रिकेट खेळतो. टी20 आणि कसोटी संघातून निवृत्ती घेतल्यानंतर त्याचं संपूर्ण लक्ष वनडे क्रिकेटवर आहे. वनडे क्रिकेटमध्ये वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून संघात स्थान मिळावं यासाठी प्रयत्नशील आहे. असं असताना रोहित शर्माची क्रिकेट कारकिर्द पाहिली तर त्याची मैदानातील विधानं कायम चर्चेत आली आहेत. त्याचा बिनधास्त अंदाज क्रीडाप्रेमींना कायम भावला आहे. असं असताना त्याचं मैदानाबाहेरील एक विधान चर्चेत आलं आहे. कारण त्याने सध्या भारतीय संघातील उदयोन्मुख खेळाडू असलेल्या वैभव सूर्यवंशीचं नाव घेतलं. एका कार्यक्रमात त्याला एक प्रश्न विचारला गेला. त्यात त्याने थेट वैभवचं नाव घेतलं आणि कारणही सांगून टाकलं. रोहित शर्माला विचारलं की, जर नवीन गाडी विकत घेतली तर कोणत्या खेळाडूला चालवण्यासाठी देणार नाही. रोहित शर्माने क्षणाचाही विलंब न करता वैभव सूर्यवंशीचं नाव घेतलं. इतकंच काय तर त्याचं वय नसल्याचं सांगितलं.
काय म्हणाला रोहित शर्मा?
रोहित शर्मा सोनी टीव्हीवर फॅमिली फुल हाऊस कार्यक्रमात होस्ट करत आहे. या कार्यक्रमात येणाऱ्या पाहुण्यांना बोलतं करत आहे. या दरम्यान रोहितला प्रश्न विचारला गेला. नवी गाडी घेतली तर कोणाला चालवायला देणार नाही? त्यावर रोहित शर्माने वैभवचं नाव घेतलं. वैभव सूर्यवंशी आता 15 वर्षांचा आहे हे त्याने सांगितलं. भारतात गाडी चालवण्यासाठी वयाची 18 वर्षे पूर्ण करणं गरजेचं आहे. 18 वर्षे वय झालं की गाडी चालवण्याचा परवाना मिळतो. रोहित शर्माने हाच संदर्भ पकडून मिश्किलपणे म्हणाला की, त्याच्याकडे लायसन्स नाही यासाठी त्याला गाडी देणार नाही.
[caption id="attachment_1068807" align="aligncenter" width="800"] वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने चार वर्षानंतर भारतीय संघात पदार्पण केलं. पण पहिल्या सामन्यात काही खास करू शकला नाही. ...
वैभव सूर्यवंशीकडे कार
वैभव सूर्यवंशीचं वय कमी असलं तरी त्याच्याकडे कार आहे. वैभव सूर्यवंशीने आयपीएल 2026 स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली होती. त्यामुळे त्याला टाटा सिएरा एसयुव्ही मिळाली होती. पण ही गाडी चालवू शकत नाही. वय वर्षे 18 पूर्ण झाल्यानंतर त्याला लायसन्स मिळेल. वैभव सूर्यवंशी कमी वयातच क्रीडाप्रेमींचं लक्ष वेधलं आहे. आक्रमक खेळीमुळे क्रीडाप्रेमींचा आवडता खेळाडू ठरला आहे. आता भविष्यात त्याच्याकडून बऱ्याच अपेक्षा आहेत.
[caption id="attachment_1068670" align="aligncenter" width="800"] भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात पहिला वनडे सामना होत आहे. हा सामना वडोदरात होत