Friday, October 23, 2026

4,4,4,4,4,4,4,4,4,4,4,4,4,4,4! झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात प्रतिका रावलचं झंझावाती शतक

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारताने विजय मिळवला. भारताने 1 गडी गमवून विजयासाठी दिलेल्या 198 धावा गाठल्या. या सामन्यात प्रतिका रावलचं झंझावाती शतक पाहायला मिळालं.

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने खिशात घातली आणि 1-0 ने आघाडी घेतली. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी निवडली आणि 197 धावा केल्या. तसेच विजयासाठी 198 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान भारातने 27.1 षटकात सहज गाठलं. या विजयी योगदानात भारताची सलामीवीर प्रतिका रावलचं योगदान महत्त्वाचं ठरलं. प्रतिका रावलने या सामन्यात शतकी खेळी केली आणि भारताचा विजय निश्चित केला. प्रतिका रावलने 96 चेंडूत 15 चौकारांच्या मदतीने नाबाद 100 धावांची खेळी केली. 15 चौकाराने तिने 60 धावा केल्या. यावेळी तिचा स्ट्राईक रेट 104.17 चा होता. पहिल्या विकेटसाठी प्रतिका रावलने कर्णधार स्मृती मंधानासोबत 93 चेंडूत 94 धावांची भागीदारी केली. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी शफाली वर्मासोबत 70 चेंडूत नाबाद 107 धावांची विजयी भागीदारी केली.

काय म्हणाली प्रतिका रावल?

प्रतिका रावलने तिच्या वनडे क्रिकेट कारकिर्दीतील तिसरं शतक ठोकलं आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेनंतर प्रतिका रावल फॉर्म पुन्हा गवसण्यासाठी प्रयत्न करत होती. अखेर तिला झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात सूर गवसला आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या शतकी खेळीसाठी प्रतिका रावलला सामनावीराचा पुरस्काराने गौरविण्यात आलं. सामनावीराचा पुरस्कार मिळाल्यानंतर प्रतिका रावल म्हणाली की, 'आजचा दिवस खूप आनंदाचा होता. पुन्हा संघात परत येऊन खूप छान वाटलं, शक्य तितका वेळ फलंदाजी करून धावा करणे आणि संघाच्या विजयात योगदान देणे नेहमीच आनंददायी असते. फलंदाजीला जाण्यापूर्वी, मी टीव्हीवर न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याचे हायलाइट्स पाहिले आणि मला वाटले की तोच सामना होता ज्यात मी माझे शेवटचे शतक केले होते... हे शतक खूपच छान होते.'

प्रतिकार रावल या खेळीबाबत पुढे म्हणाली की, 'गोष्टी सोप्या ठेवा. पहिली गोष्ट म्हणजे दुखापती आणि विश्रांती हे खेळाचाच एक भाग आहेत हे स्वीकारणे, त्यामुळे त्यावर ताण घेण्यात काही अर्थ नाही. मला एक चांगला पाठिंबा आहे.हा काही परिपूर्ण डाव नव्हता आणि एक फलंदाज म्हणून तुम्हाला त्यातून शिकावे लागते. पण आजचा दिवस असा होता की चेंडू मला हव्या त्या ठिकाणी गेला. सुदैवाने, आज सर्व काही खूप चांगले झाले.'

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >