IND vs NZ: तिलक वर्माने सामना काढला, पण कर्णधार श्रेयस अय्यरने या खेळाडूवर उधळली स्तुतीसुमनं; म्हणाला...

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात विजयाचा शिल्पकार ठरला तो तिलक वर्मा.. पण या विजयाचं विश्लेषण करताना कर्णधार श्रेयस अय्यरने तिलक वर्माचं कौतुक केलं. पण नमन धीरच्या छोट्या खेळीचं योगदान महत्त्वाचं होतं, हे सांगण्यास विसरला नाही.

भारताने दुसऱ्या टी20 सामन्यात न्यूझीलंडला 4 गडी राखून पराभूत केलं. तसेच पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे. या विजयाचा शिल्पकार ठरला तो अर्धशतकी खेळी करणारा तिलक वर्मा.. त्याच्या खेळीमुळे भारताचा विजय पक्का झाला. या विजयानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने त्याचं कौतुक केलं. भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने विजयानंतर प्रतिक्रिया देताना सांगितलं की, 'मला वाटतं की आपल्या खेळातील प्रत्येक खेळाडू सामना-विजेता असतो आणि आज आपण त्याचं उदाहरण पाहिलं. खरं सांगायचं तर, जेव्हा आमच्या विकेट्स पडल्या, विशेषतः एकापाठोपाठ एक, तेव्हा आम्हाला वाटलं की सामना आमच्या हातून निसटत आहे. पण तिलक आणि रेड्डी यांनी जबरदस्त जिद्द दाखवली, आणि नमन धीरनेही एक शानदार छोटी खेळी केली. मायदेशात वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या काही सामन्यांमध्ये आपण त्याला पाहिलं आहे. तो एक उत्कृष्ट गोलंदाजही आहे आणि जेव्हा फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही बाबतीत तो सरस ठरतो. तेव्हा मला वाटतं की तो संघाला एक वेगळीच ओळख देतो आणि जेव्हा तुम्ही त्याला क्षेत्ररक्षणात फिरताना पाहता तेव्हा तो मुळात एक अष्टपैलू खेळाडू आहे.'



निर्धाव चेंडू आणि श्रेयस अय्यरची प्रतिक्रिया


न्यूझीलंडचे फिरकी गोलंदाज मिचेल सँटनर आणि मायकल ब्रेसवेल यांनी निर्माण केलेल्या आव्हानावर श्रेयस अय्यर म्हणाला की, 'मला वाटतं की सुरुवातीला आम्ही खूप निर्धाव चेंडू खेळलो आणि त्यामुळे धावगतीही वाढली. तसेच, जेव्हा आम्ही फलंदाजीला उतरलो, तेव्हा आम्हाला आरामात खेळायचे होते, पण त्यांनी अप्रतिम गोलंदाजी केली, विशेषतः ब्रेसवेल आणि सँटनर यांनी, ज्या प्रकारे त्यांनी मधल्या फळीत खेळावर नियंत्रण ठेवले. चेंडू मारणे सोपे नव्हते, पण मला वाटतं की जर आम्ही फटक्यांमध्ये जागा शोधून चौकार मारण्याचा प्रयत्न केला असता, तर आम्ही सहज विजय मिळवू शकलो असतो. पण दुर्दैवी. तुम्हाला माहीत आहे, असं घडतंच. हा फक्त एक सामान्य दिवस आहे आणि मला खात्री आहे की आम्ही जोरदार पुनरागमन करू.'



क्षेत्ररक्षणावर काय म्हणाला श्रेयस अय्यर?


भारताच्या क्षेत्ररक्षणाच्या प्रयत्नांवर आणि प्रतिस्पर्धी संघाला दोन धावा घेण्यापासून रोखण्याच्या प्रयत्नांवर श्रेयस अय्यर म्हणाला की, 'मला वाटतं, संघातील प्रत्येक खेळाडूला हाच संदेश देण्यात आला की, तुमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक चेंडूचा अंदाज घ्या आणि तुम्ही एकेरी धावा देणार आहात यावर विश्वास ठेवा. तसेच, चेंडूच्या दिशेने धावत जा, जेणेकरून प्रतिस्पर्धी संघ दोन धावा घेण्याआधी दोनदा विचार करेल.'

Comments
Add Comment

भुवनेश्वर कुमारच्या समोरच अर्शदीप सिंगने त्याचा विक्रम मोडला, नेमकं काय झालं? वाचा

[caption id="attachment_1068914" align="aligncenter" width="800"] न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात डावखुऱ्या वेगवा गोलंदाज अर्शदीप सिंगने

IND vs NZ: डेथ ओव्हर्सचा नवा राजा तिलक वर्मा! सातव्या गड्यासाठी विक्रमी भागीदारीसह रचला इतिहास

भारताने न्यूझीलंडविरुद्धचा हा दुसरा टी20 सामना यशस्वीरित्या जिंकून इतिहास रचला असून या विजयात तिलक वर्मा आणि

IND vs NZ: तिलक वर्माचं विजयी अर्धशतक, न्यूझीलंडला नमवलं; आता मालिका विजयाच्या तीन संधी हातात

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामन्यात भारताने विजय

0,0,0,0,0,0..! संजू सॅमसनने पहिल्याच षटकात नकोसा विक्रम रचला, झालं असं की..

न्यूझीलंडने दुसऱ्या टी20 सामन्यात विजयासाठी 180 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. या धावांचा पाठलाग करताना भारताची

IND vs NZ T20: अभिषेक शर्माचा खेळ 27 धावांवर ओव्हर! पण एक षटकार मारत मोठा विक्रम रचला

क्राइस्टचर्चच्या हॅगले ओव्हल मैदानात भारत न्यूझीलंड यांच्यात दुसरा टी20 सामना सुरू आहे. या सामन्यात भारताने

India A vs New Zealand A : न्यूझीलंड दौऱ्यावर जाताच टीम इंडियाचा धुव्वा, अवघ्या 113 धावांवर पत्ता कट

लिंकन (न्यूझीलंड): न्यूझीलंडविरुद्ध लिंकन येथे सुरू असलेल्या पहिल्या अनधिकृत कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी