Pune Crime : रिल्स डिलिट केले अन्... नववीच्या विद्यार्थ्याने अल्पवयीन मुलीवर चालवला चाकू; धक्कादायक घटनेने परिसरात तणाव!

या हल्ल्यात मुलगी जखमी झाली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Pune News: सोशल मीडियावरील व्हिडिओ आणि त्यातून निर्माण होणारे वाद आता शाळकरी मुलांमधील संघर्षाचे गंभीर कारण ठरत असल्याचे समोर येत आहे. पुण्यातील बावधन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाळुंगे गावात एका अल्पवयीन मुलीवर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात मुलगी जखमी झाली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती आहे.



सहलीतील व्हिडिओवरून झाला वाद


पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, महाळुंगे गावातील एका शाळेची सहल 17 आणि 18 ऑक्टोबर रोजी पाचगणी-महाबळेश्वर येथे गेली होती. या सहलीदरम्यान एका कार्यक्रमात मुली नृत्य करत असतानाचा व्हिडिओ इयत्ता नववीत शिकणाऱ्या एका विधिसंघर्षित बालकाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला होता. या व्हिडिओवरून संबंधित मुलांमध्ये वाद झाला. त्यानंतर त्या मुलाला व्हिडिओ डिलीट करावा लागला होता.


याच वादाचा राग मनात धरून संबंधित मुलाने आज दुपारी सव्वादोनच्या सुमारास मुलीवर चाकूने हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेत मुलगी जखमी झाली असून, तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या देखरेखीखाली तिच्यावर उपचार सुरू आहेत.



पोलिसांकडून तपास सुरू


घटनेनंतर बावधन पोलिसांनी जखमी मुलीचा जबाब नोंदवला असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे. हल्ला केल्याचा आरोप असलेल्या विधिसंघर्षित बालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमागील नेमकी कारणे आणि हल्ल्याचा घटनाक्रम यांचा पुढील तपास पोलीस करत आहेत.


दरम्यान, संबंधित शाळा आणि दोन्ही कुटुंबांची पार्श्वभूमी उच्चशिक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. मुलाच्या पालकांनाही आपल्या मुलाकडून असे टोकाचे पाऊल उचलले जाईल, यावर विश्वास बसत नसल्याचे सांगितले जात आहे.


या घटनेमुळे अल्पवयीन मुलांमधील सोशल मीडियाचा वापर, ऑनलाइन वाद आणि रागावर नियंत्रण ठेवण्याबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत. मात्र, या घटनेमागे मोबाईल किंवा रिल्सचा थेट प्रभाव असल्याचे तपासातून स्पष्ट होणे आवश्यक आहे.


Comments
Add Comment

Nitesh Rane: तलावातील गाळ काढण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, मंत्री नितेश राणे यांचे अधिकाऱ्यांना आदेश

अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तलावांतील गाळ काढण्यासाठी विशेष

Nitesh Rane: मच्छीमार बांधवांच्या मदतीसाठी सरकार पुढे, मंत्री नितेश राणे यांनी जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या समस्या

अहिल्यानगर: संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळामध्ये होरपळून निघत आहे. महाराष्ट्र दुष्काळाच्या सावटाखाली असताना

Simhastha Kumbhmela 2027: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याचे राज्यपालांना निमंत्रण

[caption id="attachment_1068653" align="aligncenter" width="800"] नाशिक- त्र्यंबकेश्वर मध्ये 31 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपती महोदयांच्या प्रमुख उपस्थितीत

CPA International : राहुल नार्वेकर यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी झेप; राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या कार्यकारी समितीवर निवड

मुंबई: महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची राष्ट्रकुल संसदीय मंडळ (CPA) आंतरराष्ट्रीय संस्थेच्या

Solapur Accident News: तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना कंटेनरची धडक; एकाचा मृत्यू, 6 जण जखमी

Solapur News: तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भाविकांना कंटेनरने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण

Nashik : नाशिकला भारताची आध्यात्मिक राजधानी बनवणार - शेखर सिंह

- सुहास शेलार इंट्रो - सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे सुमारे ३५ हजार कोटी