
केप टाऊन: क्रिकेट विश्वातून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. भारत असो वा परदेश, खेळाडूंच्या दुखापती संघांचे गणित बिघडवत असतात. आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी तिसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिका संघाला तसाच मोठा धक्का बसला आहे. त्यांचा घातक वेगवान गोलंदाज ॲनरिच नोरखिया मांडीच्या दुखापतीमुळे संपूर्ण सामन्यातून बाहेर पडला आहे. विशेष म्हणजे, दोन्ही संघांमधील तीन सामन्यांची ही मालिका सध्या 1-1 अशी अत्यंत रोमांचक टप्प्यावर पोहोचली असून, या निर्णायक सामन्यापूर्वी स्टार खेळाडू बाहेर पडल्याने आफ्रिकन संघाचे टेन्शन चांगलेच वाढले आहे.
लिंकन (न्यूझीलंड): न्यूझीलंडविरुद्ध लिंकन येथे सुरू असलेल्या पहिल्या अनधिकृत कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय 'अ' संघाच्या स्टार फलंदाजांनी ...
दुसऱ्या कसोटीत वाढली डोकेदुखी
ग्वेबरहा येथील सेंट जॉर्ज पार्कवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी नोरखियाला मांडीची दुखापत झाली. तो आपल्या चौथ्या षटकाच्या मध्यातच वेदनेने विव्हळत मैदान सोडत थेट ड्रेसिंग रूममध्ये गेला. साडेतीन वर्षांहून अधिक काळ कसोटी क्रिकेटपासून लांब राहिल्यानंतर त्याने डर्बनमधील पहिल्या कसोटीतून दमदार पुनरागमन केले होते. पहिल्या सामन्यात त्याने 40 षटके टाकत प्रत्येकी दोन बळीही घेतले. मात्र, सलग दुसरी कसोटी खेळवणे अंगाशी आले असून कर्णधार टेंबा बावुमाने हा निर्णय जोखमीचा असल्याचे आधीच मान्य केले होते.
न्यूझीलंडने दुसऱ्या टी20 सामन्यात विजयासाठी 180 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. या धावांचा पाठलाग करताना भारताची सुरूवात काही खास झाली नाही. पॉवरप्लेमध्ये ...
बदली खेळाडू आणि अंतिम सामन्याचे चित्र
दक्षिण आफ्रिकेने अद्याप नोरखियाच्या जागी नवीन खेळाडूची घोषणा केलेली नाही. जेराल्ड कोएत्झी, कॉर्बिन बॉश किंवा डेन पॅटरसन यांच्यापैकी एकाला अंतिम संघात संधी मिळू शकते. फिरकीचा पर्याय म्हणून सेनुरन मुथुसामीचाही विचार होऊ शकतो. फलंदाजीचा क्रम कायम राहण्याची शक्यता आहे. मंगळवारी सुरू होणाऱ्या या अंतिम सामन्यात मालिका कोण जिंकणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.





