Sunday, October 25, 2026

ST Bus Fare Hike: सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा! परिवहन मंत्र्यांचा भाडेवाढीला नकार...

सध्या महाराष्ट्रातील दुष्काळ आणि महागाईची परिस्थिती पाहता सर्व सामान्य जनतेवर हंगामी भाडेवाढ करून आर्थिक भार टाकणे योग्य नसल्याचे मत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आहे.

मुंबई: एसटी महामंडळाच्या अध्यक्षांनी आणि परिवहन मंत्र्यांनी सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा दिला आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती आहे. राज्यातली सध्याची दुष्काळ आणि महागाईची परिस्थिती पाहता महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेवर हंगामी भाडेवाढ करून आर्थिक भार टाकणे योग्य नसल्याचे मत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आहे. त्यामुळे महत्त्वाचा निर्णय घेत त्यांनी दिवाळी सणादरम्यान केली जाणारी, हंगामी भाडेवाढ रद्द केली आहे. परिवहन मंत्र्यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ(एसटी महामंडळ)च्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून हंगामी भाडेवाढ करण्याच्या निर्णयाबद्दल पोस्ट शेअर केलेली आहे.

एसटी महामंडळाकडून अधिकृत पोस्ट शेअर करत, भाडेवाढीच्या प्रस्ताव नामंजूर करण्यात आल्याची माहिती सर्वसामान्य प्रवाशांना दिली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, "दुष्काळाच्या संकटात जनतेला दिलासा, भाडेवाढीला नकार, दुष्काळ आणि महागाईमुळे आधीच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य जनतेवर आणखी आर्थिक भार टाकणे योग्य नाही. त्यामुळे दिवाळीच्या हंगामासाठी प्रस्तावित 15% हंगामी भाडेवाढीचा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला आहे. एसटी महामंडळ आर्थिक तोट्यात असले, तरी त्याचा भार सर्वसामान्य प्रवाशांवर टाकण्याऐवजी आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी पर्यायी उपाययोजना शोधण्याला आमचे प्राधान्य असेल. जनतेच्या अडचणीच्या काळात तिच्या पाठीशी उभे राहणे, हेच आमचे कर्तव्य आहे."

 

प्रताप सरनाईक सध्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष आणि परिवहन मंत्री आहेत. राज्य सरकारने एसटी महामंडळाचा कायापालट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अस्वच्छ प्रसाधन गृहे, अस्वच्छ बस डेपो आणि परिसर शिवाय, उत्तम स्थितीमध्ये असलेली लालपरी या माध्यमातून एसटी महामंडळाकडून कायापालट केला जात आहे. इतरत्र सुद्धा सुविधा नागरिकांना एसटी महामंडळाकडून दिली जात आहे. ॲपच्या माध्यमातून सोबतच टेक्नॉलॉजीच्या माध्यमातूनही एसटी महामंडळाचा कायापालट केला जात आहे. एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवाशांची संख्या फार कमी झालेली होती. प्रवाशांचा सर्वाधिक कल खासगी ट्रॅव्हलकडे होता. प्रवाशांना सरकारकडे ओढण्यासाठी सरकारकडून नवनवीन युक्त्या शोधताना सध्याच्या घडीला दिसत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >