
मुंबई: दिवाळीसाठी अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. अशातच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाकडून कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होण्याच्या अनुषंगाने पाऊल टाकली जात आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचा दिवाळी सण आनंदामध्ये जाण्यासाठी परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिवाळी बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळात सध्याच्या घडीला तब्बल 83 हजार अधिकारी आणि कर्मचारी काम करतात. या सर्व कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी नोव्हेंबर महिन्याचा वेतन दिवाळीपूर्वी देण्याचे निर्देश मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत.
नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची औपचारिक सुरुवात ३१ ऑक्टोबर रोजी ध्वजारोहणाने होणार आहे. या ध्वजारोहणासाठी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी ...
एसटी महामंडळातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे वेतन दर महिन्याच्या साधारणत: 7 ते 10 तारखेदरम्यान दिले जाते. यंदा दिवाळी सणाला 6 नोव्हेंबरपासून सुरूवात होत आहे. त्यामुळे दिवाळीची तारीख आणि वेतनाची तारीख लक्षात घेता एसटी महामंडळांतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. दिवाळी सणाच्या आधीच कर्मचार्यांना सणापूर्वीच वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. दिवाळीच्या सणासाठी कुटुंबीयांसह खरेदी, घरगुती खर्च आणि इतर नियोजन करता यावे, यासाठी कर्मचाऱ्यांच्या हातात वेळेत पगार पडणे महत्त्वाचे आहे. ही बाब लक्षात घेऊन मंत्री सरनाईक यांनी प्रशासनाला वेतनासाठी आवश्यक ती पावले उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Pune News: पुणे-लोणावळा उपनगरीय रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रविवार, 25 ऑक्टोबर रोजी मध्य रेल्वेच्या पुणे ...
दिवाळीपूर्वी वेतन देण्यासाठी एसटी महामंडळाच्या अर्थ- नियोजन विभागाने तातडीने शासनाकडे पाठपुरावा करावा. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी आवश्यक असलेले अनुदान तसेच मागील महिन्यातील विविध प्रवासी सवलत योजनांच्या प्रतिपूर्तीपोटी शासनाकडून मिळणारी प्रलंबित रक्कम वेळेत उपलब्ध होण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असेही निर्देश देण्यात आले आहेत. एसटी महामंडळाच्या आर्थिक अडचणींमुळे कर्मचाऱ्यांच्या सणाच्या आनंदावर विरजण पडू नये, त्या करिता प्रशासनाने या विषयाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाकडून आवश्यक निधी उपलब्ध होण्यासाठी महामंडळाच्या अर्थ- नियोजन विभागाने समन्वय साधून वेतन वितरणाचे नियोजन करावे आणि दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना पगार मिळेल, या दृष्टीने दक्षता घ्यावी, असे निर्देश सरनाईक यांनी दिले आहेत.




