‘मन की बात’ला 12 वर्षे पूर्ण; पंतप्रधान मोदींचा आत्मनिर्भर भारत आणि ‘व्होकल फॉर लोकल’चा संदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाला 12 वर्षे पूर्ण झाली आहेत. 139 व्या भागात त्यांनी देशवासीयांच्या योगदानाचे कौतुक करत स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देण्याचे आवाहन केले. महाराष्ट्रातील ‘शबरी नेचुरल्स’च्या पॅकेजिंगला जपानचा ‘गुड डिझाइन पुरस्कार’ मिळाल्याचाही त्यांनी उल्लेख केला.

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रिय ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमाला 12 वर्षे पूर्ण झाली आहेत. विजयादशमीच्या पवित्र मुहूर्तावर सुरू झालेल्या या प्रवासाला 12 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त, पंतप्रधान मोदींनी 'मन की बात'च्या 139 व्या भागातून देशवासीयांशी संवाद साधला. हा प्रवास आणि देशातील लोकांच्या योगदानाला वंदन करणे हा माझ्यासाठी तीर्थयात्रेइतकाच पवित्र अनुभव असल्याचे त्यांनी सांगितले.



‘व्होकल फॉर लोकल’मुळे साकार होणार आत्मनिर्भर भारताचे स्वप्न


येत्या सण-उत्सवांच्या काळात कुटुंबीयांसाठी खरेदी करताना स्थानिक कारागिरांनी तयार केलेल्या वस्तूंना प्राधान्य द्यावे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे. तुमच्या खरेदीमुळे स्थानिक कारागिरांचा उत्साह वाढेल आणि ‘व्होकल फॉर लोकल’ अभियानाला बळ मिळेल. हे अभियान जितक्या वेगाने पुढे जाईल, तितक्याच वेगाने आत्मनिर्भर भारताचे स्वप्नही साकार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



लोकशक्तीची आराधना आणि आत्मीयतेची पुंजी


“गेल्या 12 वर्षांत देशाच्या कानाकोपऱ्यातून असे अनेक सामान्य लोक समोर आले आहेत, जे राष्ट्रासाठी जगतात. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी देशातल्या लोकशक्तीची आराधना करतो,” असे पंतप्रधान म्हणाले. “मन की बात ऐकल्यानंतर जणू पंतप्रधान आमच्याच कुटुंबात बसून संवाद साधत आहेत, अशा आशयाचे शेकडो संदेश मला मिळाले आहेत. श्रोत्यांची ही आत्मीयता हीच माझ्यासाठी अमूल्य पुंजी आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.



स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश


भारताची प्राचीन परंपरा असलेल्या निसर्ग आदर, परिसर स्वच्छता आणि जलस्रोतांची काळजी घेण्याच्या मुद्द्यावरही त्यांनी भर दिला. अवघ्या काही दिवसांवर आलेल्या दिवाळी आणि छठ या सणांच्या निमित्ताने ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली जात असून, आपले छोटे प्रयत्नही मोठा बदल घडवू शकतात, असे पंतप्रधान म्हणाले.



महाराष्ट्रातील ‘शबरी नेचुरल्स’च्या पॅकेजिंगला जपानचा ‘गुड डिझाइन पुरस्कार’


महाराष्ट्रातील आदिवासी समुदायाने ‘शबरी नेचुरल्स’ या उपक्रमाद्वारे मध, मोहफुले, चारोळी आणि बांबूपासून तयार केलेली उत्पादने बाजारात आणली आहेत. या उत्पादनांच्या पॅकेजिंगवर आदिवासी कलेची सुंदर छाप असून, या पॅकेजिंगला जपानचा प्रतिष्ठित ‘गुड डिझाइन पुरस्कार’ मिळाला आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी कौतुकाने दिली. तसेच, कर्नाटकातील ‘बॅम्बू’ नावाचे स्टार्टअप बांबू व शेतीच्या अवशेषांपासून पॅकेजिंग साहित्य तयार करत असल्याचे सांगत त्यांनी देशातील तरुणांच्या नवनवीन प्रयोगांचे कौतुक केले.

Comments
Add Comment

Elon Musk Ukraine News: इलॉन मस्क यांचा युक्रेनवर गंभीर आरोप; म्हणाले, स्टारलिंकचा वापर लोकांना मारण्यासाठी...

वॉशिंग्टन: अब्जाधीश उद्योगपती इलॉन मस्क यांनी युक्रेनवर त्यांच्या स्टारलिंक सेवेच्या अटींचे उल्लंघन केल्याचा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा ड्रग्ज माफियांना इशारा! ‘तरुणाईशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही’; ड्रग्ज तस्करांविरुद्ध मोठी कारवाई?

नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय सीमांचा गैरवापर करून देशाच्या युवा पिढीला अमली पदार्थांच्या विळख्यात अडकवणाऱ्या

अल्पसंख्याकांच्या हक्कांवरून भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानला फटकारले; 'सेन्याचे हुकूम बजावण्यापेक्षा स्वतःच्या जनतेच्या कल्याणावर लक्ष द्या'

नवी दिल्ली: संयुक्त राष्ट्र महासभेच्या (UNGA) तिसऱ्या समितीमधील एका संवादात्मक चर्चेदरम्यान भारताने पुन्हा एकदा

New Railway Rule: रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित होणार! २७ ऑक्टोबरपासून नवा नियम लागू

जेव्हा स्वस्त आणि आरामदायी प्रवासाचा विषय येतो, तेव्हा भारतीय रेल्वे अग्रस्थानी असते. दररोज लाखो लोक रेल्वेने

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ घोंघावणार! २८ ऑक्टोबरला आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता

भारतीय हवामान विभागाने आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टी भागांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. बंगालच्या

Indian Air Force : इंडो-पॅसिफिकमधील घडामोडींवर भारताचे बारकाईने लक्ष; राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी हवाई दल सज्ज

Indian Air Force: इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील अलीकडील घडामोडींमुळे अधिक सतर्क राहण्याची आणि प्रादेशिक सहकार्य वाढवण्याची