
नाशिक: ज्या क्षणाची नाशिककर आतुरतेने वाट पाहत होते, अखेर तो क्षण आज आला आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आज, कोजागरी पौर्णिमेच्या मुहूर्तावर रविवार (25 ऑक्टोबर) शंखनाद करण्यात आला. 501 जणांच्या सामुहिक शंखनादातून नाशिकच्या रामकुंडावर गोदातिरी ऐतिहासिक विश्वविक्रम रचण्यात आला. देवमामलेदार पटांगणाजवळ हा भव्य दिव्य ऐतिहासिक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून गोदातीरावर धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरण निर्माण झालं होतं.
मुंबई: दिवाळीसाठी अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. अशातच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाकडून कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होण्याच्या अनुषंगाने ...
501 शंखाच्या गजरात विश्वविक्रम
एकाच वेळी तब्बल 501 जणांनी एकत्र शंखाचा निनाद केल्यामुळे विश्वविक्रम प्रस्थापित करण्याचे ध्येय समोर ठेवण्यात आले होते. अखेर हे ध्येय कोजागरी पौर्णिमेच्या सायंकाळी पूर्ण झाले आहे. यापूर्वी एकाचवेळी 303 जणांनी विश्वविक्रम केल्याचा विश्वविक्रम होता. आता हाच रेकॉर्ड मोडत एकाच वेळी 501 जणांनी शंखनाद केल्याची नोंद आयोजकांचा मानस होता. अखेर त्यांचे हे ध्येय पूर्ण झाले आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या पथकाकडून सहभागींची उपस्थिती आणि आवश्यक निकषांची पडताळणी केल्यानंतर 501 शंखाचा निनाद करण्यात आला. नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण आणि गुणगौरव न्यास संचालित अनंत विजय शंखनाद पथक यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला.
View this post on Instagram
31 ऑक्टोबरला ध्वजारोहणावेळीही शंखनाद
शंखनादानंतर गोदातिरावर सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास गोदा आरती देखील पार पडली. भाविकांना आणि पर्यटकांना यावेळी, रामकुंडावर सामूहिक शंखनाद आणि गोदा आरतीमुळे गोदातीरावर भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाला. दरम्यान, सायंकाळी चार वाजल्यापासून कार्यक्रमस्थळी सहभागी शंखवादकांची नोंदणी, उपस्थिती तपासणी आणि पडताळणी सुरू होती. त्यानंतर गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या निकषांनुसार विश्वविक्रमाचा प्रयत्न करण्यात आला. सायंकाळी सुमारे 05.50 वाजेच्या सुमारास सामूहिक शंखनाद पार पडले. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याशी या उपक्रमाची सांगड घालण्यात आली आहे. ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ध्वजारोहणाच्या क्षणी याच समूहातील 251 शंखवादकांकडून सामूहिक शंखनाद करणार आहे. त्यामुळे कुंभमेळ्याच्या मंगलारंभावेळी पारंपरिक शंखनादातून धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडणार आहे.
नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची औपचारिक सुरुवात ३१ ऑक्टोबर रोजी ध्वजारोहणाने होणार आहे. या ध्वजारोहणासाठी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी ...
शंखनाद ही भारतीय परंपरेची ओळख
भारतीय धार्मिक परंपरेत शुभकार्याच्या प्रारंभी शंखनाद करण्याला विशेष महत्त्व आहे. धार्मिक विधी, उत्सव आणि मंगलकार्यांमध्ये शंखनादाला पवित्रतेचे प्रतीक मानले जाते. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून प्राचीन परंपरेचा जागर करण्यासोबतच नाशिकच्या सांस्कृतिक वारशाला व्यापक व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनीही या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. 501 जणांनी एकत्रित शंखनाद करणे हा नाशिककरांसाठी विशेष क्षण होता. विश्वविक्रमाचा प्रयत्न करतानाच भारतीय सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा व्यापक स्तरावर प्रसार व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ध्वजारोहणाच्या वेळीही शंखनाद होणार असल्याने या परंपरेला सिंहस्थाच्या मंगलारंभाशी जोडण्याची संधी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.





