एसटी महामंडळाला दिलासा देणारी बातमी, दिवाळी गोड होण्यासाठी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार

एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच यंदाचा दिवाळी बोनस येणार आहे. एसटी महामंडळाच्या अध्यक्षांनी त्या दृष्टीने निर्देश दिले आहेत.

मुंबई: दिवाळीसाठी अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. अशातच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाकडून कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होण्याच्या अनुषंगाने पाऊल टाकली जात आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचा दिवाळी सण आनंदामध्ये जाण्यासाठी परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिवाळी बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळात सध्याच्या घडीला तब्बल 83 हजार अधिकारी आणि कर्मचारी काम करतात. या सर्व कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी नोव्हेंबर महिन्याचा वेतन दिवाळीपूर्वी देण्याचे निर्देश मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत.



एसटी महामंडळातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे वेतन दर महिन्याच्या साधारणत: 7 ते 10 तारखेदरम्यान दिले जाते. यंदा दिवाळी सणाला 6 नोव्हेंबरपासून सुरूवात होत आहे. त्यामुळे दिवाळीची तारीख आणि वेतनाची तारीख लक्षात घेता एसटी महामंडळांतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. दिवाळी सणाच्या आधीच कर्मचार्‍यांना सणापूर्वीच वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. दिवाळीच्या सणासाठी कुटुंबीयांसह खरेदी, घरगुती खर्च आणि इतर नियोजन करता यावे, यासाठी कर्मचाऱ्यांच्या हातात वेळेत पगार पडणे महत्त्वाचे आहे. ही बाब लक्षात घेऊन मंत्री सरनाईक यांनी प्रशासनाला वेतनासाठी आवश्यक ती पावले उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत.



दिवाळीपूर्वी वेतन देण्यासाठी एसटी महामंडळाच्या अर्थ- नियोजन विभागाने तातडीने शासनाकडे पाठपुरावा करावा. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी आवश्यक असलेले अनुदान तसेच मागील महिन्यातील विविध प्रवासी सवलत योजनांच्या प्रतिपूर्तीपोटी शासनाकडून मिळणारी प्रलंबित रक्कम वेळेत उपलब्ध होण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असेही निर्देश देण्यात आले आहेत. एसटी महामंडळाच्या आर्थिक अडचणींमुळे कर्मचाऱ्यांच्या सणाच्या आनंदावर विरजण पडू नये, त्या करिता प्रशासनाने या विषयाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाकडून आवश्यक निधी उपलब्ध होण्यासाठी महामंडळाच्या अर्थ- नियोजन विभागाने समन्वय साधून वेतन वितरणाचे नियोजन करावे आणि दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना पगार मिळेल, या दृष्टीने दक्षता घ्यावी, असे निर्देश सरनाईक यांनी दिले आहेत.

Comments
Add Comment

Pune Lonavala Local : पुणे-लोणावळा लोकलच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! 4 लोकल रद्द, एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

Pune News: पुणे-लोणावळा उपनगरीय रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रविवार, 25

बीडमधील हृदयद्रावक घटना: कुत्रा भुंकल्याने घाबरलेल्या ३ वर्षीय चिमुकलीचा गरम दूध अंगावर पडून मृत्यू

बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील नांदूर हवेली गावातून एक अत्यंत मन हेलावून टाकणारी आणि काळीज पिळवटून

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर 12 दिवस वाहतूक ब्लॉक; मुंबईकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी वेळापत्रक पाहूनच प्रवास करा!

Samruddhi Mahamarg: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची

Solapur Crime News : सोलापूरमध्ये कौटुंबिक वादातून जावयाची हत्या; सासऱ्याने डोक्यात दगड घातल्याचा आरोप

Solapur Crime News: सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात कौटुंबिक वादातून एका व्यक्तीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना

"आरोप- प्रत्यारोप नको, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला जा"; उपमुख्यमंत्री शिंदे यांचे शिवसेनेच्या सर्व आमदार- मंत्र्यांना आदेश

मुंबई: एकमेकांवर सुरू असलेले आरोप- प्रत्यारोप थांबवा आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला जा, असे निर्देश

आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण द्या; मंत्री डॉ. अशोक वुईके यांचे शिक्षकांना आवाहन

नाशिक: आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देत त्यांचे