जमशेदपूर: भारतीय रेल्वेचं निर्ढावलेपण पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. मुंबई सीएसएमटी- हावडा गीतांजली एक्स्प्रेसमध्ये एका कॅन्सरग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतरही सहप्रवाशांना रेल्वेचं सहकार्य मिळालं नाही. त्यामुळे प्रवासी सुविधा आणि आपत्कालीन सेवांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. भारतीय रेल्वेमध्ये प्रवाशासोबत घडलेल्या ह्या संपूर्ण प्रकारामुळे सर्वत्र प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. मुंबईहून हावडाला जाणाऱ्या गीतांजली एक्स्प्रेसमध्ये शनिवारी (24 ऑक्टोबर) एका 45 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बिनोद पासवान असं त्या प्रवाशाचं नाव होतं, जो पश्चिम बंगालच्या भाटपारा जिल्ह्यातील रहिवाशी होता. तो कॅन्सर पेशंट होता.
देहरादूनमध्ये महर्षि वाल्मिकी प्रकटोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा देहरादून : ऋषी-मुनींची पवित्र भूमी असलेल्या उत्तराखंडची राजधानी देहरादून येथे ...
प्रवाशाच्या नातेवाईकांचा आरोप आहे की, आम्ही आमच्या नातेवाईकाच्या मृत्यूची माहिती ट्रेनमधील टीटीईला सकाळीच दिली होती. तरीही देखील 12 तास होऊन सुद्धा कोणीही रेल्वे कर्मचारी मदतीला आले नाही. मृतदेह खाली उतरवण्यासाठी कुटुंबीयांना तब्बल 12 तास वाट पाहावी लागली. प्रवाशांना आणि नातेवाईकांना 12 तास मृतदेहाजवळ बसून प्रवास करायला भाग पडले. शनिवारी रात्री 08.26 वाजता एक्स्प्रेस टाटानगर स्टेशनवर पोहोचली त्यावेळी एक्स्प्रेसमधून मृतदेह खाली उतरवण्यात आला. मन हेलावून टाकणाऱ्या घटनेमुळे रेल्वेच्या आपत्कालीन प्रतिसादावर आणि प्रवाशांना वेळेवर मदत पुरवण्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एवढ्या गंभीर परिस्थितीची माहिती देऊनही, तात्काळ मदत मिळत नाही, म्हणजे परिस्थिती गंभीर आहे, असा प्रवाशांचा आणि नागरिकांचा आरोप आहे.
बंगालच्या उपसागरात तयार झालेले अर्णब चक्रीवादळ वेगाने तीव्र होत आहे. हे वादळ आंध्रप्रदेशच्या दिशेने सरकत असून उपग्रहाद्वारे घेतलेल्या ...
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिनोद पासवान गीतांजली एक्सप्रेसच्या M-1 कोचमधून मुंबई ते हावडा प्रवास करत होते. शनिवारी सकाळी सुमारे 8 वाजता, नातेवाईकांना आणि प्रवाशांना त्यांचे निधन झाल्याची माहिती मिळाली. त्याचवेळी तात्काळ नातेवाईकांनी आणि इतर प्रवाशांनी एक्स्प्रेसमधील टीटीईला गंभीर परिस्थितीची माहिती दिली होती. रेल्वे कर्मचार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांनी मृत्यूची पुष्टी केल्यानंतरच पुढील प्रक्रिया पूर्ण केली जाईल. मात्र, कुटुंबीय आणि सहप्रवाशांकडून आरोप केला जात आहे की, माहिती देऊनही बराच वेळ आवश्यक वैद्यकीय मदत पुरवण्यात आली नाही, तसेच गाडीतून मृतदेह बाहेर काढण्याची प्रक्रियाही पूर्ण झाली नाही. या काळात प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.
झाशी : उत्तर प्रदेशातील झाशी येथे एका नवविवाहित महिलेचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मुस्कान सिमोलिया (वय २८) ही पती ...
या घटनेमुळे पुन्हा रेल्वेच्या गलथान कार्यपद्धतीवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. ट्रेनमध्ये प्रवाशाच्या मृत्यूची घटना घडतेय, अशा आपत्कालीन परिस्थितीत संबंधित विभागाने तात्काळ कारवाई करायला हवी, असं प्रवाशांचे म्हणणे आहे. जेणेकरून आवश्यक औपचारिकता पूर्ण करून मृतदेह लवकरात लवकर हलवता येईल. सकाळी माहिती मिळूनही रात्रीपर्यंत वाट पाहिल्याने रेल्वेच्या आपत्कालीन प्रतिसादावर आणि यंत्रणेच्या सज्जतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केला जात आहे. या प्रकरणी अद्याप रेल्वेकडून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. संबंधित घटनेबद्दल रेल्वेकडून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून काय कारवाई करण्यात येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.