500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपबाबत मंत्री राधाकृष्ण विखेंचा महायुतीच्या नेत्यांना सबुरीचा सल्ला

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदे दरम्यान चालवलेल्या कथित ऑडिओ क्लिपवरून महायुतीत सुरू असलेल्या अंतर्गत वादावर राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महायुतीतील नेत्यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. या ऑडिओ क्लिपप्रकरणी स्वतः मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले असून, त्यातून 'दूध का दूध आणि पाणी का पाणी' समोर येईल, असे मत त्यांनी आज नगरमध्ये माध्यमांशी बोलताना मांडले.


अहिल्यानगर येथे माध्यमांशी संवाद साधताना विखे पाटील म्हणाले की, चौकशी पूर्ण होईपर्यंत महायुतीमधील नेत्यांनी एकमेकांवर चिखलफेक करणे आणि संशयाचे राजकारण करणे थांबविले पाहिजे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी अशी वक्तव्ये करताना भान ठेवायला हवे होते, अशी परखड भूमिका त्यांनी मांडली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बदनाम करण्यासाठी पद्धतशीर डाव आखल्याचे सांगितले जात असले, तरी ते कपोलकल्पित आहे. या ऑडिओ क्लिपमधून कोणीतरी जाणीवपूर्वक खोडसाळपणा केल्याचे त्यांनी नमूद केले. जोपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या चौकशीतून सत्य समोर येत नाही, तोपर्यंत महायुतीमध्ये सुरू असलेला विनाकारण संशयास्पद वाद पूर्णपणे थांबायला हवा, असे सांगत विखे पाटील यांनी नेत्यांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.



तसेच, यावेळी माध्यमांशी संवाद साधताना कर्जत येथील जलविद्युत प्रकल्पावरून सुरू असलेल्या वृक्षतोडीच्या चर्चेवर बोलताना विखे म्हणाले की, राज्याच्या विकासाचा वेग आणि वाढती औद्योगिक गुंतवणूक लक्षात घेता हा हायड्रो प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रकल्पासाठी जेवढी झाडे तोडली जातील, त्यापेक्षा दुप्पट झाडे लावण्याचे कायदेशीर बंधन संबंधित कंपन्यांवर घालण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी २०१४ ते १९ या काळात मराठा साजाला दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयातही टिकले होते. मात्र, त्यानंतर आलेल्या अडीच वर्षांत महाविकास आघाडीच्या सरकारने त्याचे वाटोळे केले, अशी टीका विखे यांनी केली. पुढे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी पुन्हा मराठा आरक्षणासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. सुमारे ५००० हजार तरुणांना सरकारी सेवेत न्याय मिळवून दिला. महायुतीचे सरकार मराठा समाजाच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे विखे यांनी नमूद केले.

Comments
Add Comment

कॉम्प्युटर प्रिंटलाही लाजवेल असं हस्ताक्षर! नेपाळच्या प्रकृती मल्लाची जगभर चर्चा

आजकालच्या या फास्ट युगात पेनपेक्षा मोबाईल आणि कीबोर्ड जास्त हाताळले जातात. मुलं भराभर टायपिंग करतात, पण जेव्हा

WTC 2027: ऑस्ट्रेलिया दक्षिण अफ्रिका तिसऱ्या कसोटी सामन्यातील निकाल न्यूझीलंडसाठी महत्त्वाचा! भारतावर असा होणार परिणाम

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 अंतिम फेरीत जागा मिळवण्यासाठी आता चुरशीची लढाई आहे. या स्पर्धेत एकूण नऊ संघ होते.

Mumbai Local: मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत, साडे सात तासानंतर सेवा टप्प्याटप्प्याने पूर्ववत

मुंबई: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सकाळी 9.30 च्या दरम्यान मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. मध्य

युएईच्या किनाऱ्यावर तेलाचे लोट; सागरी पर्यावरणाला मोठा धोका, अनेक समुद्रकिनारे बंद

मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीचा फटका आता सागरी पर्यावरणाला बसू लागला आहे. संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE)

प्रेतासोबत 12 तासांचा प्रवास! गीतांजली एक्स्प्रेसमध्ये कँसरग्रस्त यात्रेकरूचा मृत्यूनंतर धक्कादायक प्रकार, तक्रार केली पण...

जमशेदपूर: भारतीय रेल्वेचं निर्ढावलेपण पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. मुंबई सीएसएमटी- हावडा गीतांजली

पेट्रोलला पर्याय म्हणून E100 इंधनाला मंजुरी; केंद्राचे नवे नियम लागू!

रस्ते आणि वाहतूक महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) केंद्रीय मोटार वाहन नियमांमध्ये सुधारणा अधिसूचित केल्या असून,