Shani Gochar 2027: 3 जून 2027 पासून या राशीला साडेसाती, तर कुंभ राशी फेऱ्यातून सुटणार! जाणून घ्या
ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठरावीक कालावधीनंतर राशी बदल करतो. ग्रहांचा गोचर कालावधी हा वेगवेगळा आहे. शनि महाराज एका राशीत अडीच वर्षे राहतात. असं असताना 3 जूनपासून कोणत्या राशीला साडेसाती आणि अडीचकी लागणार ते जाणून घेऊयात..
October 26, 2026 03:02 PM
Shani Gochar 2027: 3 जून 2027 पासून या राशीला साडेसाती, तर कुंभ राशी फेऱ्यातून सुटणार! जाणून घ्या (Photo: AI)
ऑक्टोबर महिन्याचे शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत. तर नववर्ष 2027 सुरू होण्यासाठी अवघ्या दोन महिन्यांचा कालावधी आहे. असं असताना येतं वर्ष ज्योतिषशास्त्रानुसार कसं असेल? याबाबत आतापासून गणितं बांधली जात आहे. वर्ष 2027 मध्ये ज्योतिषशास्त्रातील सर्वात महत्त्वाचा ग्रह असलेल्या शनिचा गोचर होणार आहे. 3 जून 2027 रोजी शनिदेव मीन राशीतून मेष राशीत गोचर करणार आहे. त्यामुळे साडेसाती आणि अडीचकीची सर्व गणितं बदलणार आहेत. 3 जून 2027 पासून कुंभ,मीन आणि मेष राशीला साडेसाती असणार आहे. पण शनिदेवांनी 3 जून 2027 रोजी वृषभ राशीत प्रवेश करताच कुंभ राशीची साडेसाती सुटणार आहे. तर वृषभ राशीला साडेसतीचा पहिला टप्पा सुरू होणार आहे.
या राशींवर पडणार शनिचा प्रभाव
मेष: या राशीच्या जातकांना पुढच्या साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. त्यामुळे या टप्प्यात कोणतेही व्यवहार करताना काळजी घेणं गरजेचं आहे. आर्थिक जोखीम घेताना जरा सावधच राहावं. कोणत्याही ठिकणी गुंतवणूक करताना विचार करावा. घाई गडबडीत घेतलेला निर्णय अंगलट येऊ शकतो. परिस्थितीचं भान ठेवून पुढचे निर्णय घ्यावेत.
वृषभ : या राशीच्या जातकांना साडेसातीचा पहिला टप्पा सुरू होणार आहे. या दरम्यान कौटुंबिक पातळीवर वाद होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. खर्चावर नियंत्रण ठेवावं आणि आर्थिक व्यवहार करताना कोणताही शब्द देताना जरा जपूनच राहावं. आपल्यावर असलेल्या जबाबदारीचं भान ठेवावं.
मीन: या राशीच्या जातकांचा साडेसातीचा शेवटचा टप्पा आहे. त्यामुळे या अडीच वर्षात बरंच काही मिळणार आहे. म्हणजेच पाच वर्षात जे अनुभव आले आहेत, त्यातून बरंच काही शिकायला मिळणार आहे. पण या अडीच वर्षात संयम बाळगावा लागणार आहे.
सोमवार, 26 ऑक्टोबर 2026 हा दिवस मेष ते मीन या 12 राशींसाठी नोकरी, व्यवसाय, आर्थिक व्यवहार, आरोग्य आणि नातेसंबंधांच्या दृष्टीने कसा असेल, याबाबत अनेकांना ...
कोणत्या राशींची अडीचकी संपणार?
सिंह आणि धनु राशीच्या लोकांची अडीचकी 3 जून 2027 रोजी पूर्णपणे समाप्त होईल.मकर आणि कन्या राशीच्या लोकांसाठी शनीची अडीचकी सुरू होईल. मकर राशीच्या लोकांसाठी शनि चौथ्या स्थानात असेल.कन्या राशीच्या लोकांसाठी शनि आठव्या स्थानात असेल. ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा गोचरचा शनि जन्मराशीपासून चौथ्या किंवा आठव्या स्थानात येतो, तेव्हाच अडीचकीचा काळ सुरू होतो.
Disclaimer: या बातमीतील माहिती धार्मिक श्रद्धा आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. प्रहार डॉट इन त्याचे समर्थन करत नाही.