नर्मदा जलविवाद निवाड्यानुसार महाराष्ट्राला पाच टीएमसी पाणी मिळणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : नर्मदा जलविवाद निवाड्यानुसार महाराष्ट्राच्या वाट्याचे उकाई धरणातील पाच टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचना नर्मदा नियंत्रण प्राधिकरणाच्या पुनर्विचार समितीच्या बैठकीत देण्यात आल्या. मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीत महाराष्ट्राची बाजू मांडून या पाण्याची मागणी केली. केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी यावर तात्काळ निर्देश दिले. नर्मदा नियंत्रण प्राधिकरणाच्या उच्चस्तरीय पुनर्विचार समितीची बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. दूरदृष्यप्रणालीद्वारे झालेल्या या बैठकीसाठी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहनलाल यादव, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा हे उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या बैठकीमध्ये महाराष्ट्राच्या नर्मदा प्रकल्प दायित्वाच्या अनुषंगाने कार्यवाहीची माहिती दिली.



नर्मदा जलविवाद निवाड्यात महाराष्ट्राला दहा टीएमसी पाणी मंजूर आहे. त्यापैकी पाच टीएमसी पाणी वळण कालव्याद्वारे मिळणार असून, उर्वरित पाच टीएमसी पाणी उकाई धरणातून देण्याचे ठरले होते. त्यानुसार मान्यता देण्याची मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री आणि गुजरातच्या मुख्यमंत्र्यांकडे केली.


केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमवेत यापूर्वी झालेल्या बैठकीमध्ये नियमनानुसार पाणी महाराष्ट्राला देण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार उकाई धरणातून महाराष्ट्राला पाणी मिळणे अपेक्षित आहे, अशी भूमिका मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडलेल्या भूमिकेनुसार महाराष्ट्राला त्याच्या वाट्याचे पाणी उपलब्ध व्हावे , असे केंद्रीय जनशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी स्पष्ट केले. यावेळी मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा व जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले उपस्थित होते.

Comments
Add Comment

दिव्यांगांसाठी जिल्हा नियोजन निधीतील एक टक्का राखीव; जलसंपदा विभागात 39 हजार 722 पदांचा आकृतीबंध

मुंबई : दिव्यांगांचे पुनर्वसन व सक्षमीकरण, जलसंपदा विभागाची प्रशासकीय पुनर्रचना, औद्योगिक विकास आणि ग्रामीण

दुष्काळी भागांत मत्स्यबीजासाठी ‘डीपीडीसी’मधून निधी; मंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश

मुंबई : दुष्काळग्रस्त भागांतील मत्स्य व्यवसायाला उभारी देण्यासाठी मत्स्यबीज उपलब्ध करून देण्याकरिता जिल्हा

Navi Mumbai Airport: चिपी- नवी मुंबई विमानसेवेला 100 टक्के व्यवहार्यता तफावत निधी, पालकमंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावरून नवी मुंबईसाठी हवाई प्रवासाचा मार्ग मोकळा करण्याच्या दृष्टीने

MP Sunil Tatkare News: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करा, खासदार सुनिल तटकरे यांचं कार्यकर्त्यांना आवाहन

मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांना सरकारने दिलासा दिला आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावरच राज्यातील शेतकऱ्यांवर दुष्काळाचं

शेतकऱ्यांना 5 हजारांचे अग्रीम, रोजगाराच्या संधींसह मंत्रिमंडळ बैठकीतील अनेक मोठे निर्णय जाणून घ्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली २७ ऑक्टोबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण

Devendra Fadnavis : शेतकऱ्यांकडून सक्तीने कर्जवसुली केल्यास फौजदारी कारवाई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त सुमारे दीड कोटी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांची अग्रीम मदत