Rashmika Mandanna Vijay Deverakonda : "होय, मी माझ्या जोडीदाराच्या प्रेमात वेडी आहे..." ट्रोलर्सना रश्मिका मंदानाची ८ पानांची चपराक; तर विजय देवरकोंडाची सुद्धा ट्रोल्सवर सडकून टीका

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandhana) आणि अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Devarkonda) यांच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर सुरू असलेल्या जोरदार चर्चेवर आणि टीकेवर अखेर रश्मिकाने मौन सोडले आहे. तिने एका लांबलचक ८ पानांच्या नोटमधून विरोधकांना आणि ट्रोल्सना अत्यंत सडेतोड उत्तर दिले आहे. नुकतेच करण जोहरच्या शोमध्ये रश्मिकाने तिच्या प्रेमप्रकरणाबद्दल काही खुलासे केले होते. तिने सांगितले होते की, विजय देवरकोंडाला लग्नासाठी तयार करण्यासाठी तिने त्याला तब्बल एक वर्षभर आणि जवळपास १०० वेळा विचारले होते. या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला. नेटिझन्सनी दोघांच्या नात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, विजयला 'रेड फ्लैग' म्हटले, तर काहींनी त्यांच्या घटस्फोटाची भविष्यवाणी सुद्धा केली. यावरच रश्मिकाने ही ८ पानांची पोस्ट लिहून आपले मत मांडले आहे.



रश्मिकाच्या नोटमधील ७ महत्त्वाचे मुद्दे कोणते ?




१. "माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला"


रश्मिकाने स्पष्ट केले की, सहसा ती ट्रोल्सवर प्रतिक्रिया देत नाही कारण प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. मात्र, यावेळी तिच्या एका वाक्याचा (मी विजयला १०० वेळा विचारले) चुकीचा अर्थ काढून हुल्लडबाजी माजवली गेली. विजयला खात्री करायची होती की, दोघेही जीवनातील चढ-उतारांसाठी खरोखर तयार आहेत का आणि त्यासाठी दोघांना हवा असलेला वेळ देण्याबाबत तो आग्रही होता.


२. "मी भावनाप्रधान आहे आणि तो प्रॅक्टिकल"


आपल्या आणि विजयच्या स्वभावातील फरकाबद्दल बोलताना ती म्हणाली, "मला काय हवे आहे हे मला ठाऊक होते आणि विजयला प्रत्येक गोष्टीचा प्रॅक्टिकल विचार करण्यासाठी थोडा वेळ हवा होता, यात काहीच गैर नाही. मी मनाने खूप भावनिक आहे आणि तो बुद्धीने विचार करणारा आहे, आणि आमच्या दोघांच्या आयुष्यात याच संतुलनाची गरज होती." तिच्यासाठी लग्न म्हणजे गुडघ्यावर बसून अंगठी घालणे नसून, एकत्र येऊन भविष्य घडवणे हे आहे.


३. "मी माझ्या जोडीदाराच्या प्रेमात वेडी आहे, यात वाईट काय?"


आपल्या प्रेमाची उघडपणे कबुली देत रश्मिकाने लिहिले, "होय, मी माझ्या जोडीदाराच्या प्रेमात पूर्णपणे वेडी आहे आणि यात वाईट काय आहे? ज्याच्याशी मी लग्न करणार आहे, त्याच्यावरच मी प्रेम करत नसेल तर मी लग्न कशाला करू?" विजयला तिने वारंवार लग्नासाठी विचारणे म्हणजे तिच्या प्रेमाची अफाट खोली दाखवण्याचा मार्ग आहे.


४. "आम्ही दोघे समजूतदार आहोत आणि आमचा निर्णय पक्का आहे"


ज्या लोकांनी त्यांच्या नात्यावर स्वतःचे मत लादण्याचा प्रयत्न केला, त्यांना सुनावताना रश्मिका म्हणाली की, ते दोघेही सुजाण आणि समजदार आहेत. त्यांचे आयुष्य कसे जगावे आणि कोणासोबत जगावे हे ठरवण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. त्यांची लव्हस्टोरी कोणाच्या चौकटीत बसत नसेल, तर त्यात चिंता करण्याचे कारण नाही.


५. "दोन वर्षांपूर्वीच्या कठीण काळात तुम्ही नव्हते, तो होता"


ज्या मैत्रिणी किंवा हितचिंतक तिला या नात्यातून बाहेर पडण्याचा सल्ला देत होते, त्यांना उद्देशून ती म्हणाली, "तुमच्या काळजीबद्दल धन्यवाद, पण काश, तुम्ही दोन वर्षांपूर्वी तिथे असता जेव्हा गोष्टी खूप कठीण होत्या. त्या वेळी तुम्ही कोणीच तिथे नव्हता, फक्त तो तिथे होता आणि आजही तोच माझ्यासोबत उभा आहे." कोणत्याही नात्याची खरी कसोटी सोशल मीडियावरील चर्चा नसून कठीण काळ असते.


६. "माझ्या कठीण प्रसंगी तो सावलीसारखा सोबत असतो"


आपले वैयक्तिक आयुष्य मांडताना रश्मिका अतिशय भावूक झाली. तिने लिहिले: "जेव्हा माझी हाडं फ्रॅक्चर होतात, तेव्हा तुम्ही तिथे नसता, तो असतो. "जेव्हा दरमहा मला शारीरिक वेदना होतात, तेव्हा तुम्ही नसता, तो असतो." "जेव्हा मी मध्यरात्री एंग्जायटीमुळे घाबरून जागी होते, तेव्हा तुम्ही मदतीला येत नाही, तो येतो." "मला जेव्हा सल्ला, सुरक्षा आणि मानसिक आधाराची गरज असते, तेव्हा तोच माझ्या पाठीशी उभा असतो."


७. "माझ्या कुटुंबाला या विवादात ओढणे म्हणजे गुंडगिरी आहे"


टीका करताना ज्यांनी तिच्या कुटुंबालाही या वादात ओढले, त्यांना धारेवर धरत ती संतापली. ती म्हणाली, "माझ्याबद्दल तुम्हाला हवे तेवढे वाईट बोला, मी सहन करेन. पण माझ्या कुटुंबाला न ओळखता त्यांच्यावर बोलणे म्हणजे फेमिनिज्म नाही, तर तो निव्वळ गुंडगिरीचा प्रकार आहे." शेवटी तिने आपले कन्नड फॅन्स आणि वर्षानुवर्षे प्रेम करणाऱ्या चाहत्यांचे मनापासून आभार मानले आहेत. रश्मिकाने ट्रोल्सना स्पष्ट शब्दामध्ये सुनावले आहे की, बाहेर बसून कोणाच्याही वैयक्तिक आयुष्यावर ताशेरे ओढणे सोपे असते, पण खरी साथ काय असते हे तिला आणि विजयला चांगले ठाऊक आहे.



"माझी पत्नी, माझी जवळची मैत्रीण..."; विजय देवरकोंडाची ट्रोल्सवर सडकून टीका!



 रश्मिका मंदानापाठोपाठ आता अभिनेता विजय देवरकोंडानेही आपल्या नात्याबद्दल उघडपणे भाष्य करत टीकाकारांना खडे बोल सुनावले आहेत. रश्मिकाला आपला सर्वात जवळचा जोडीदार संबोधत, ती आपल्या आयुष्यात असल्याबद्दल त्याने आनंद व्यक्त केला. तसेच, ज्या लोकांना त्यांच्या नात्याची काळजी वाटत होती, त्यांना त्यांच्या नात्याबद्दल आश्वस्त करत विजयने एक अत्यंत भावनिक आणि तितकीच आक्रमक नोट लिहिली आहे. आपल्या संदेशात विजयने लिहिले, "माझी बेस्ट फ्रेंड, माझी पत्नी, माझी महिला... माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट, जी मला अगदी योग्य लाभली आहे. ज्यांना आमच्याबद्दल काळजी वाटत होती, त्यांना सांगू इच्छितो की आम्ही दोघेही अतिशय आनंदी आहोत. मी खूप भाग्यवान आहे. जर ही लढाई 'मी आणि ती विरुद्ध संपूर्ण जग' अशी असेल, तर तीही मंजूर आहे. जे लोक प्रेमाचा आणि साध्या जगण्याचा आनंद साजरा करतात, त्या सर्वांचे मनापासून प्रेम." यासोबतच, टीकाकारांवर कोणतीही दयामाया न दाखवता विजयने अत्यंत सडेतोड शब्दांत त्यांना सुनावले. तो पुढे म्हणाला, "आता कोणत्याही प्रकारच्या आदराशिवाय किंवा समजुतीशिवाय, बाकीचे सर्व जण खड्ड्यात जाऊ शकतात (go fk themselves)!" - देवरेकोंडा विजय साई.
Comments
Add Comment

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण : २२ वर्षांच्या इंजिनिअरला मध्य प्रदेशातून अटक; जामिनावर सुटताच रचला होता नवा कट!

मुंबई : बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) याच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या तपासात मुंबई

Prajakta Mali: प्राजक्ता माळीची इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत; नेटकऱ्यांकडून ट्रोलिंग!

[caption id="attachment_1069276" align="alignnone" width="800"] मराठसिनेसृष्टीतील अभिनेत्री प्राजक्ता माळी तिचा लुकमुळे आणि चित्रपटांमुळे कायमच

Bigg Boss 20 : बिग बॉसच्या घरात राडा झाल्यानंतर काशवी बॅकफूटवर; म्हणाली, दुसऱ्याच्या चारित्र्यावर...माफी मागितली पण लव गिलच्या नावासमोर मौन!

मुंबई : प्रसिद्ध गेमिंग स्टार स्काउटची (ScoutOp) गर्लफ्रेंड काशवी हिरानंदानी हिने 'बिग बॉस २०' (Bigg Boss 20) च्या एका वादग्रस्त

गोविंदाने सुनीतासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर सोडलं मौन; म्हणाला, ‘मी हिंदू, आमच्याकडे 'घटस्फोट' शब्द…’

मुंबई: बॉलिवूडमधील हिरो नंबर 1 म्हणून फेमस असलेला अभिनेता गोविंदा अहुजा गेल्या काही दिवसांपासून वैयक्तिक

‘रामायण’च्या प्रमोशनसाठी रणबीर-साई पल्लवी ‘KBC’मध्ये; अमिताभ बच्चन यांचा किस्सा ऐकून हसू आवरेना!

अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री साई पल्लवी यांच्या रामायण चित्रपटाचे प्रमोशन जोरदार सुरु आहे. चित्रपटातील

Shilpa Rao: बॉलिवूड म्युझिक प्रोजेक्टमध्ये शिल्पा राव यांच्या अपमानाचा ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनने व्यक्त केला निषेध

शनिवारी (२४ ऑक्टोबर) मुंबईच्या बॉलिवूड म्युझिक प्रोजेक्ट मध्ये गायिका शिल्पा राव आपला कार्यक्रम पूर्ण करू शकली