IND vs NZ, 3rd T20: नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने, श्रेयस अय्यर गोलंदाजी घेत प्लेइंग 11 बाबत म्हणाला..

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा टी20 सामना वेलिंग्टननच्या हेनरी स्टेडियममध्ये होत आहे. हा सामना न्यूझीलंडसाठी करो या मरो, तर भारतासाठी मालिका विजयाची संधी देणारा आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल पुन्हा एकदा भारताच्या बाजूने लागला. भारताचा कर्णधार श्रेयस अय्यर याने क्षणाचाही विलंब न करता प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. मागच्या दोन्ही सामन्यात भारताने विजयी धावांचा पाठलाग केला होता. आता तिसऱ्या सामन्यातही भारतीय संघ तसंच करणार आहे. भारताची मागच्या दोन सामन्यातील कामगिरी पाहता भारतीय संघ सहज विजयी लक्ष्य गाठेल असंच दिसत आहे. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला की, 'आम्ही गोलंदाजी करणार आहोत. काही बाबींमध्ये आम्हाला निश्चितपणे सुधारणा करत राहण्याची गरज आहे. मैदानाचे आकारमान आणि परिस्थिती वेगळी आहे, त्यामुळे आम्ही जेवढ्या लवकर जुळवून घेऊ, तेवढे आमच्यासाठी चांगले. जेव्हा खेळाडू सुरुवातीच्या संघात नसतात, तेव्हा ते समजून घेण्याइतके बरेच खेळाडू परिपक्व असतात. आमचा संघ तोच ​​असणार आहे.'



काय म्हणाला मिचेल सँटनर?


भारताने प्लेइंग 11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही. पण न्यूझीलंडने मागच्या दोन सामन्यातील पराभवातून धडा घेत प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केला आहे. मिचेल सँटनर म्हणाला की, 'ही आणखी एक चांगली खेळपट्टी दिसतेय, चेंडूला थोडा वेग आणि उसळी आहे. वारा नाहीये, ही एक चांगली गोष्ट आहे. आम्ही जिथून आलो आहोत, त्यापेक्षा खेळपट्टीचे आकारमान थोडे वेगळे आहे. आम्हाला माहित आहे की भारत एक महान संघ आहे, त्यामुळे तुम्ही तुमचा वेग कमी करू शकत नाही. तीन बदल संघात केले आहेत. मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन आणि नॅथन स्मिथ बाहेर गेले आहेत. तर मॅथ्यू फिशर , काईल जेमिसन आणि ॲडम मिल्ने यांचा संघात समावेश झाला आहे.'



दोन्ही संघांची प्लेइंग 11


न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): टिम सेफर्ट (विकेटकीपर), फिन ऍलन, डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, बेव्हॉन जेकब्स, मायकल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), काईल जेमिसन, ऍडम मिल्ने, जेकब डफी, मॅथ्यू फिशर.


भारत (प्लेइंग इलेव्हन): संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, नमन धीर, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव.

Comments
Add Comment

WTC 2027: ऑस्ट्रेलिया दक्षिण अफ्रिका तिसऱ्या कसोटी सामन्यातील निकाल न्यूझीलंडसाठी महत्त्वाचा! भारतावर असा होणार परिणाम

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 अंतिम फेरीत जागा मिळवण्यासाठी आता चुरशीची लढाई आहे. या स्पर्धेत एकूण नऊ संघ होते.

भुवनेश्वर कुमारच्या अपयशाचे कारण काय? प्रशिक्षकाने दिला मोलाचा सल्ला, म्हणाले...

स्विंगचा किंग असलेल्या भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीची जादू काही पहिल्या दोन टी20 सामन्यात चालली नाही. खरं तर चार

IPL 2027: कोणत्या खेळाडूंना संघ कायम ठेवणार? रिटेन्शनची शेवटचा तारीख जाहीर, गोव्यात होणार ऑक्शन

[caption id="attachment_1069478" align="aligncenter" width="800"] आयपीएल 2027 अर्थात 20व्या पर्वाची जोरदार तयारी सुरू झाली आहे.आयपीएल 2027 साठी सर्व संघांनी

IND vs NZ 3rd T20I : ईशान किशन OUT! वैभव सूर्यवंशीला पुन्हा संधी; फलंदाजी क्रमात बदल होणार?

वेलिंग्टन (न्यूझीलंड): भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज ईशान किशन दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नसल्याने

न्यूझीलंडसाठी करो या मरोची स्थिती! तर भारताला मालिका विजयाची संधी, तिसरा टी20 सामना कुठे पाहणार? जाणून घ्या

भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर असून पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यावर

India A vs NZ A Test: देवदत्त पडिक्कलचं द्विशतक एका धावेने हुकलं! अंपायरच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह; 199 धावांवर बाद

लिंकन, न्यूझीलंड : भारत अ आणि न्यूझीलंड अ यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या अनधिकृत कसोटी सामन्यात भारतीय फलंदाज