12 चेंडूत अर्धशतक ठोकण्यात अपयशी..! युवराज सिंगने टोमणा मारला, अभिषेक शर्मा दिली मजेशीर प्रतिक्रिया

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात अभिषेक शर्माने झंझावाती शतक ठोकलं. यासह त्याने काही विक्रमही नोंदवले. पण युवराज सिंगचा 12 चेंडूत अर्धशतक ठोकण्याचा विक्रम अबाधित राहिला. यावरून गुरूचेल्यात सोशल मीडियावर मिश्किल शेरेबाजी झाली.

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात अभिषेक शर्माने 35 चेंडूत शतक ठोकलं. त्याच्या आक्रमक खेळीमुळे भारताचा विजय निश्चित झाला. या विजयी खेळीनंतर युवा फलंदाज अभिषेक शर्मा आणि गुरू युवराज सिंग यांच्यात मिश्किल शेरेबाजी पाहायला मिळाली. युवराज सिंगने अभिषेक शर्माला 12 चेंडूत अर्धशतक ठोकलं नाही, यावरून टोला हाणला. मजेशीर अंदाजात 12 चेंडूत अर्धशतक करता आलं नाही असं सांगितलं. इतकंच काय तर त्याच्या खेळीचं कौतुक करण्यासही विसरला नाही. त्याला या कामगिरीसाठी शुभेच्छाही दिल्या. युवराज सिंगने 2007 टी20 वर्ल्डकप स्पर्धेत 12 चेंडूत 50 धावा केल्या होत्या. या दरम्यान त्याने सहा चेंडूत सहा षटकार मारले होते. सामना झाल्यानंतर युवराज सिंगला आयती संधीच मिळाली होती. युवराज सिंगने याबाबत अभिषेक शर्माला डिवचलं. यानंतर अभिषेक शर्मा हसला आणि सांगितलं की 12 चेंडूत 50 धावा करणं वाटतं तितकं सोपं नाही.



अभिषेक शर्माने युवराज सिंगला काय उत्तर दिलं?


अभिषेक शर्माने युवराज सिंग मजेशीर अंदाजात उत्तर देत सांगितलं की, 'तो त्यावेळी कोणत्या प्रकारचा क्रिकेट खेळत होता हे मला माहीत नाही, पण ते अजिबात सोपे नाही. जर एखाद्या फलंदाजाला मैदानावर जाऊन तशी फलंदाजी करायची असेल, तर ते अजिबात सोपे नसते. तुम्ही सहजच मैदानावर जाऊन 12 चेंडूंमध्ये 50 धावा करू शकत नाही. असे फक्त कधीकधीच घडते.' सामन्यानंतर अभिषेक शर्माला सामनावीराचा पुरस्काराने गौरविण्यात आलं. यावेळी त्याने सांगितलं की, 'ही फक्त पडद्यामागची तयारी आहे. मी खासकरून माझ्या प्रशिक्षकांचं नावे घेईन कारण साइडआर्ममुळे.. आम्ही त्यांचा खूफ सामना केला आहे. मला एक फलंदाज म्हणून ही तयारी खूप महत्त्वाची वाटते.'



अभिषेक शर्मा म्हणाला की, "फलंदाज म्हणून आम्ही विक्रमांच्या मागे लागत नाही. आम्हाला नेहमी संघासाठी सामने जिंकायचे असतात आणि संपूर्ण मालिकेत आम्हाला तेच करायचे होते आणि ते चांगले झाले." अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी यांनी विजयासाठी दिलेल्या धावांचा पाठला करताना 7.1 षटकात 133 धावांची भागीदारी केली. भारताने पहिल्या पाच षटकातच 100 धावांचा पल्ला गाठला होता. पॉवरप्लेमध्ये 118 धावा केल्या होत्या. हा टी20 क्रिकेटमध्ये पहिल्या सहा षटकात इतक्या धावा करण्याचा सर्वोत्तम विक्रम आहे.

Comments
Add Comment

भारताविरुद्धचा तिसरा टी20 सामना कुठे गमावला? न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर म्हणाला की...

न्यूझीलंडच्या वेलिंग्टनमध्ये तिसरा टी20 सामना पार पडला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला आणि

अभिषेक शर्माने मोडला ख्रिस गेलचा षटकारांचा विक्रम, नेमका काय रेकॉर्ड केला ते जाणून घ्या

[caption id="attachment_1069764" align="aligncenter" width="800"] अभिषेक शर्माने वेलिंग्टन टी20 क्रिकेटमध्ये 11 षटकार मारले. यासह टी20 आंतरराष्ट्रीय

IND vs NZ 3rd T20: विजयाचे श्रेय फलंदाजांना, पण गोलंदाजांना श्रेयस अय्यरने नेमकी काय दिली होती वॉर्निंग?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यानंतर भारताने

भारताने तिसऱ्या सामन्यानंतरच न्यूझीलंडविरुद्धची मालिका जिंकली, अभिषेक शर्माचं वादळ घोंघावलं

न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 टीम इंडियाने 3-0 ने आघाडी घेतली आणि मालिका खिशात घातली. तिसऱ्या

अभिषेक शर्माने न्यूझीलंडच्या गोलंदाजांना फोडला घाम, 35 चेंडूत ठोकलं झंझावती शतक

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात अभिषेक शर्मा नावाचं वादळ घोंघावलं. न्यूझीलंडने भारतासमोर विजयासाठई

IND vs NZ 3rd T20: लाईव्ह सामन्यात टळला मोठा अनर्थ! मिचेलच्या फटक्याने जीव जाता जाता राहिला

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यातही नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला. कर्णधार श्रेयस अय्यरने